भुताच्या गोष्टी
स्तोत्रे Updated: 15 April 2021 07:30 IST

भुताच्या गोष्टी : घाटातील भूत

Horror and ghost stories in Marathi. Courtesy https://www.facebook.com/bhutachyagoshti

आत्महत्या   आमराईतील भूत

माझं नाव विवेक म्हात्रे खोपोली येथे राहतो.

या गोष्टीला तसा फार अवधी झाला नाही

मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात घडलेला प्रसंग आहे,

त्या वेळी मी कामाला लोणावळा मधील एका चिक्कीच्या दुकानात होतो. त्या दिवशी कामावरून सुटल्यावर माझ्या मित्राचा वाढदिवस असल्याने आम्ही टायगर पॉईंट ला जाऊन वाढदिवस साजरा केला आणि हॉटेल ला जेवायला गेलो. बाकी मित्र तिथलेच होते मला उशीर होत असल्याने मी तेथून त्यांचा निरोप घेऊन निघालो.लोणावळा मधून खोपोलीत येण्यासाठी मी जुन्या रस्त्याने जात आणि येत असे.

रात्रीचे एक - दीड वाजले होते अमावश्या असूनही धुक्याने अस्पष्ट दिसत होते. जुन्या रोड ला तश्या रात्रीच्या गाड्या कमी असतात आणि थंडीचे दिवस असल्याने लोणावळ्यात खूप थंडी असते त्यामुळे कोणी बाहेर कामाशिवाय निघत नाही. मी लोणावळ्यातुन माझी palsar220 घेऊन घाटातुन उतरत असताना एका वळणावर एक 22 ते 25 वर्ष वयाची मुलगी उभी होती, धुक असूनही बाईकच्या उजेडात ती स्पष्ट दिसत होती, ती हात करून मला लिफ्ट मागत होती तिचे डोळे खूप चमकत होते मला ते वेगळाच प्रकार वाटलं म्हणजे घाटात लुटमारी होत असते त्यामुळे मी गाडी थांबविली नाही आणि तेथून न थांबता पुढे जाऊ लागलो मला गाडी चालवताना गाडीमागे काहीतरी मागे येत असल्याचे जाणवले म्हणून मी सहजच आरश्यात पहिले तर ती मुलगी माझ्या गाडीमागे धावताना दिसत होती काळोखातही ती प्रकाशित होत होती मी जशी गाडी फाष्ट केली तशी ती ही जोरात धावू लागली 70, 80 ,90 च्या स्पीडनेही ती धावत होती, मी घाटात वळणावर गाडी स्लो करावी लागली आणि ती मुलगी तर आता माझ्या बाईक च्या बरोबर धावू लागली , ती माझ्या कडे पाहतच धावत होती पुढे तर तिने पहिलेच नाही, मी खूप घाबरलो होतो हा भुताडकीचा प्रकार आहे हे मी ओळखले होते कारण ती खूप अंगातून उजेड सोडत होती आणि एवढ्या स्पीडने साधारण मुलगी पुढे ना पाहता धाउच शकत नाही, ती मला काहीतरी म्हणत होती पण गाडी फाष्ट असल्याने व हेल्मेट घातल्याने मला काहीच आवाज येत नव्हते. ती इतकी भयानक दिसत होती की मी शब्दात तर सांघुच शकत नाही. माझी तर बिकट अवस्था झाली होती, काय करावे डोकं कामाचं करत नव्हतं मी फक्त फाष्ट गाडी चालवत होतो अचानक ती दिसेनासी झाली मी आता खोपोलीत पोहोचलो होतो.

घरी पोहोचताच मला खूप ताप झाला होता, घरच्यांना झालेली घटना सांघितलं तर ते हि घाबरले. मला तर रात्रभर झोपच लागली नाही तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता, त्यानंतर 4 दिवस मी आजारी होतो, मला नंतर समजलं की माझ्या सारखं अनेक जणांना ती मुलगी गाडीसोबत धावताना दिसली आहे आणि ज्याने लिफ्ट दिली वा थांबला कि त्याला ती झपाटते. आता मी लोणावळ्याला कामाला जात नाही इथे खोपोलितच कामाला आहे.

मित्रांनो तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या

आभार:-विवेक म्हात्रे.

टीप:-या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.

@#भुताच्या_गोष्टी
. . .