स्तोत्रे
Updated: 15 April 2021 07:30 IST
भुताच्या गोष्टी : आत्महत्या
Horror and ghost stories in Marathi. Courtesy https://www.facebook.com/bhutachyagoshti
हि गोष्ट आपल्यातील एका वाचकाने आपल्याला पाठविली आहे.
नमस्कार मी अमित शिंदे अलिबाग मधील छोट्याश्या गावात राहतो. हि गोष्ट तेंव्हाही आहे जेंव्हा मी 12 वी ला होतो हे मी याच्यासाठी सांघतोय कारण या वयात खरं खोटं ओळखता येण्याची जाणीव असते.
त्या वेळी माझी घराची परिस्थिती तशी हालाकीची होती,
मी कॉलेज ला सकाळी जायचो आणि दुपारी कामाला जायचो,
कामाला म्हणजे घराला रंगकाम करण्याचे काम करायचो,
रंगकाम हे माझा शेठ जसे ऑर्डर भेटेल त्या ठिकाणाचा घ्यायचा, कधी कधी तर खूप लांब हि जावे लागायचे
एक दिवस कॉलेज सुटल्यावर शेठ च्या घरी गेलो, शेठ ची जुनी मारुती 800 होती त्यातून आम्ही जिथे रंग लावयाचा काम मिळाला असेल तिथे जायचो
त्या दिवशी शहरातील एका ब्लॉक ला रंग काम करण्याचे काम भेटले होते. मी आणि शेठ गाडीतून निघालो पुढील *****या नाक्यावर केशव म्हात्रे आणि हृषीकेश रणपिसे आमची वाट पाहत होते. केशव आणि हृषीकेश माझ्या सोबत 12 वी ला माझ्या वर्गातच होते त्यांना त्यांच्या नाक्यावरून घेतल्यावर आम्ही एका कॉलनीत येऊन पोहोचलो .
कॉलनी तशी जुनीच वाटत होती, माझ्या शेठ ने रूम मालकाला कॉल केला तेंव्हा 10 ते 15 मिनिटांनी तो मालक आला मालक च जवळच फोर व्हीलर च ग्यारेज होत. मग त्याच्या मागे मागे आम्ही तिसऱ्या माळ्यावर असणाऱ्या त्याच्या रुम मध्ये पोहोचलो , रूम मध्ये खूप कचरा होता आणि घाण वास देखील येत होत बहुदा ती खूप दिवस बंद असावी असे प्राथमिक अंदाज मी मनातल्या मनात लावला.
रुम मालकाने ती रूम आत्ताच कोणाकडून तरी विकत घेतली होती, रूम मालक माझ्या शेठ ला कोणत्या रूम मध्ये कोणता कलर मारायचा ते सांघु लागला आणि पैसे देऊन तो निघून घेला. आम्ही येताना गाडीत पॉलिश पेपर व झाडू आणले होते
आम्हा तिघांना ते देऊन रूम साफ करून पॉलिश पेपरने भिंत घासायला सांघितलं मग आम्ही लगेच कपडे बदलून कामाला लागलो. शेठ कलर आणायला गेले
मी आणि केशव हॉल मधील भिंत घासू लागलो तर हृषीकेश हा किचन मधील भिंत साफ करत होता. खूप दिवस रूम बंद असल्याने खूप जाळे पसरले होते रूम मध्ये. मी हॉल मध्ये असताना मला आणि केशवाला जोरात खोकण्याचा आवाज आला केशव मला म्हणाला अचानक किती जोरात खोखायला लागला रे हा हृषीकेश चल जाऊन त्याला पाहूया म्हणून आम्ही काम सोडून त्याला पाहायला किचनमध्ये गेलो तर हृषीकेश आमच्याकडेच येत होता. मी हृषीकेश ला म्हणालो किती जोरात खोकतोस रे तर तो म्हणाला मी कुठे खोकलो मला पण आवाज आला म्हणून तर मी काम सोडून तुम्हाला बघायला येत होतो. थोडं वेळ आम्ही तिघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायला लागलो इतक्यात जोरात तसाच खोकण्याचा आवाज आला तसं आम्ही डचकलो, आपल्या तिघांशीवाय ब्लॉक मध्ये कोणीतरी आहे याची जाणीव झाली आणि घाबरत बेडरूम कडे वळलो पण बेडरूम चा दरवाजा तर बाहेरून बंद होता मी दरवाजा उघडला तसा जोरात खोकण्याचा आवाज आला आम्ही तिघेही घाबरलो आणि ओरडत बाहेर पळालो ब्लॉक चा दरवाजा तसाच उघडा ठेऊन खाली उतरायला लागलो. समोरून शेठ रंग घेऊन वरचं येत होता त्याला घडलेला प्रकार सांघितलं, शेठ म्हणाला चला पाहू कोण आहे बेडरूम मध्ये तस आम्ही घाबरत मागे मागे निघालो शेठ ने बेडरूम चा दरवाजा आत ढकलला तसं आत पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि कसला आवाज हि येत नव्हता शेठ म्हणाला बाजूच्या रूम मधून तुम्हाला आवाज आला असेल रंग आणलंय चला कामाला लागा
पण आम्हा तिघांना ठाऊक होत कि ते आवाज बेडरूम मधूनच आल होत. शेठ त्यांच्या कामानिमित्त निघून गेले.
संध्याकाळ होत आली तरी आम्ही भिंत पॉलिशच करत होतो हॉल पॉइश करून झाला मी बाथरूम मध्ये पॉलिश आणि झाडू मारण्यासाठी गेलो बाथरूम मध्ये एक ट्यूब लावली होती मी पॉलिश पेपर ने भिंत घासत असताना अचानक काहीतरी पडण्याचा आवाज झाला आणि बाथरूम मध्ये अंधार झाला तसा मी धावत किचन कडे पळालो केशव आणि हृषीकेश मला एकदाच म्हणाले काय झालं. मी म्हणतो काय समजलं नाही पण काहीतरी पडलं आणि अंधार झाला आम्ही बघायला घाबरत घाबरत मोबाईल च्या उजेडात पाहायला गेलो तर ट्यूब पडली होती पण ती फुटली नव्हती तिला काहीच झालं नव्हतं. ट्यूब च तुम्हाला माहीतच असेल तर ती लावताना फिरवून लावायची असते चालू ट्युब पडणे म्हणजे सहज सहजी शक्य नसते आणि त्यातल्या त्यात ट्यूब एवढ्या उंचावरून पडून तिला काहीच होत नाही ही बाब मला खटकली. ट्यूब लावून आम्ही किचनकडे वळलो आम्ही ठरवलं की काही होउदे आता एकत्र काम करायचं, तेव्हड्यात कोणीतरी केशवच्या जोरात मागून डोक्यावर टपली मारली केशवने मागे पाहिले तर कोणीच नव्हते आणि आम्ही हि त्याच्यापासून लांब होत तेव्हड्यात हृषीकेश च्या हि डोक्यात टपली मारली आणि माझ्याही सोबत तसंच झालं तिघे हि म्हणालो कोणीतरी डोक्यात मारलं आता तर आमची चांगलीच टरकली होती
मी म्हणालो चला इथून जाऊ तस बेडरूम मधून पुन्हा खोकण्याचा आवाज आला आणि एका माणसाचं ओरडण्याचा आवाज आला हे माझं घर आहे इथून जा नाहीतर तुम्हाला सोडणार नाय. हृषीकेश तर रडायला लागला मी हिम्मत करून बेडरूम कडे गेलो आत पाहतो तर एक माणूस फॅन ला फाशी लावलेल्या अवस्थेत लटकून होता त्याच्या तोंडातून रक्त येत होत, डोळे पांढरे झालेले होते हे इतकं भयानक दिसत होतं की हृषीकेश तिथेच बेशुद्ध झाला मी आणि केशव ने त्याला तसाच उचलून खाली नेलं व्हॉचमन ने आम्हाला अडवलं आणि विचारलं काय झालं म्हणून आम्ही त्याला झालेला प्रकार सांघितलं मग त्याने हृषीकेश च्या तोंडावर पाणी शिंपडल आणि सांघु लागलकी,
त्या रुम मध्ये एक नवरा बायको राहत होत त्यांचं नुकताच लग्न झालं होतं आणि थोड्या महिन्यात बायको ने दुसर्या सोबत पळून जाऊन दुसरं लग्न केलं त्यामुळे तो व्यक्ती खूप आजारी पडला आणि टेन्शन मध्ये येऊन त्याने आत्महत्या केली पण त्याची आत्मा त्याच ब्लॉक मध्ये आहे , त्याचे शेजारी म्हणतात आम्हाला त्याच्या खोकण्याचा आणि ओरडण्याचा कधीकधी आवाज येतो म्हणून पण तो कोणाला त्रास देत नाही त्याच्या वडिलांनी तो ब्लॉक विकायला काढला पण तो ब्लॉक कोणीही विकत घेत नव्हता. आता एकाने खूप कमी किंमतीत तो घेतलाय पण त्याला तिथे ते भूत राहू देणारच नाय...
आम्ही परत त्या ब्लॉक मध्ये गेलो नाय
माझं आता शिक्षण पूर्ण होऊन माझा स्वताचा इंपोट एक्स्पोर्ट चा व्यवसाय आहे
पण त्या कॉलनी जवळून जाताना मला त्या दिवसाची आठवण येते.
मित्रांनो तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्या
आभार:-अमित शिंदे.
टीप:-या पेजवरील गोष्ट म्हणजे कोणासोबत घडलेला प्रसंग असतो, ती लिहिणारा हा कुशल लेखक नसतो. वाचताना त्याच्या नजरेने वाचा आणि काहीही कमेंट करताना थोडं नीट विचार करा नाहीतर आपल्या पेजला कोणीच अनुभव पाठवणार नाही.
@#भुताच्या_गोष्टी

. . .