passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
अंगात येणे : न्युरॉसीस
अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे "स्वयंभू" किंवा "जागृत" मानली जातात तेथे अनेक भक्तांच्या "अंगात" येते. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते.
अंगात येणे हा एक सौम्य प्रकारचा मानसिक आजार आहे. त्याला "न्युरॉसीस" म्हणतात. या अंगात येण्याचेही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अंगात येण्याचे ढोंग. हे अंगात येणे म्हणजे अंगात "आणलेले" असते. येथे अंगात येणे हा धंद्याचा भाग असतो. अशा अंगात आलेल्या व्यक्ती जी मागणी करेल पुरवली जाते, ज्या सूचना करेल त्या पाळल्या जातात व त्यातुन त्या व्यक्तीला आपला किंवा आपल्या माणसांचा स्वार्थ सहजपणे साधता येतो.
. . .