भयंकर बाहुल्या : लेट्टा एक जिप्सी बाहुली
बऱ्याच लहान मुलामुलींसाठी बाहुली ही एका खेळण्यापेक्षाही खूप काही असते. ती एक मैत्रीण.....आता वाचूया ज्यांच्यासोबत खेळावंसं वाटणार नाही अशा भयंकर बाहुल्यांबद्दल...
पुपा क्रिस्टल, ट्रू, मोनिका, शार्ला, इसाक, लिली, अॅश्ले आणि कॅमेरॉन
१९७२ मध्ये केरी वॉल्टन त्याच्या आजीच्या प्रेतसंस्कारासाठी ऑस्ट्रेलियातील घरी आला होता. या काळात त्याने लहानपणापासून ज्या भीतीने त्याला ग्रासलं होतं त्या एकाकी इमारतीत जाण्याच्या भीतीला सामोरं जाण्याचं ठरवलं. जेव्हा तो ह्या घरात गेला तेव्हा त्याला व्हरांड्यात एक कळसूत्री बाहुली सापडली. त्याला ती बाहुली घरी घेऊन जाण्याचा मोह झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ते दोघं एकत्र आहेत.
मानसशास्त्रीयांनुसार ती बाहुली २०० वर्षांपूर्वी एका रोमानियन जिप्सीने त्याच्या वाहून गेलेल्या मुलासाठी बनवली होती. जिप्सी लोकं आत्म्याच्या स्थानांतरावर विश्वास ठेवतात त्यामुळे ती बाहुली मरण पावलेल्या व्यक्तीकरता जणू काही एक घर होती. त्या बाहुलीला खरे माणसाचे केस होते, आणि डोक्याच्या त्वचेखाली माणसाच्या डोक्याच्या अस्तित्वाची शक्यता होती. युरोपियन जिप्सी वारशामुळे त्याला लेट्टा किंवा लेड्डा असं नाव ठेवण्यात आलं किंवा ती बाहुली मधेच “लेट्टा मी आउट” (मला बाहेर काढा) असं ओरडत असल्यामुळे असेल.
सध्याच्या वर्षांत या बाहुलीच्या जवळपास काहीही सैतानी गोष्टी आढळून आलेल्या नाहीत. उलट ही बाहुली मिळाल्यापासून वॉल्टनचं नशीब सुधारलंय आणि त्याच्या व्यवसायाची भरभराट झाली आहे. पण तरीही काही आरोप लेट्टाला घेरून आहेतच. जेव्हा त्याला बाहेर काढलं जातं तेव्हा पाऊस येतो, जेव्हा तो खोलीत येतो तेव्हा टांगलेली छायाचित्रं पडतात असं म्हटलं जातं. जेव्हाही कुत्रे लेट्टाच्या आसपास असतात तेव्हा भुंकायला लागतात आणि चावायला बघतात, लोकांनी हेही सांगितलंय की ते जेव्हा लेट्टाला पाहतात तेव्हा त्यांना खूप भीती किंवा अगदी वाईट वाटायला लागतं. लेट्टा हा स्वतःला हवं तिथे फिरू शकतो, बसल्याजागी जागा बदलू शकतो आणि पकडल्यानंतर आपल्या नाडीच्या ठोक्यांप्रमाणे ठोके निर्माण करू शकतो.