भयंकर बाहुल्या : जॉलिएट
बऱ्याच लहान मुलामुलींसाठी बाहुली ही एका खेळण्यापेक्षाही खूप काही असते. ती एक मैत्रीण.....आता वाचूया ज्यांच्यासोबत खेळावंसं वाटणार नाही अशा भयंकर बाहुल्यांबद्दल...
जर एखादी झपाटलेली छोटी बाहुली तुमच्या कुटुंबाच्या वारसाचा भाग असेल तर तुम्ही काय कराल? एका लहान बाहुलीची ‘आई’ असलेल्या अॅना नामक स्त्रीचं आयुष्यही सध्या असंच आहे. गेल्या चार पिढ्यांपासून अॅनाच्या कुटुंबातील स्त्रियांना एक क्रूर परंपरा जपण्याचा शाप आहे. प्रत्येक स्त्री ही दोन दोन बाळांना जन्म देते, एक मुलगा आणि एक मुलगी. ह्या अशा परिस्थितीत मुलगा आश्चर्यकारक पद्धतीने जन्मल्यापासून तिसऱ्या दिवशी मृत्यू पावायचा. अॅनाला सांगितलं गेलं की जॉलिएट तेव्हाच्या तिच्या गरोदर पणजीला एका खुनशी मित्राने दिली होती. त्यानंतर लगेच तिच्या पणजीने एका मुलाला जणू तीन दिवसांनी मरण्यासाठीच जन्म दिला.
त्या बाहुलीमधून रात्रीच्या वेळी हसण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू यायचे. त्यांच्या कुटुंबीयांनी तर हेही सांगितलं की वेगवेगळ्या तान्ह्या बाळांचं रडणंही ऐकू यायचं, आणि ती बाहुली जणू गमावलेल्या प्रत्येक लहान मुलासाठी एक माध्यम बनली होती.