भयंकर बाहुल्या : पुपा
बऱ्याच लहान मुलामुलींसाठी बाहुली ही एका खेळण्यापेक्षाही खूप काही असते. ती एक मैत्रीण.....आता वाचूया ज्यांच्यासोबत खेळावंसं वाटणार नाही अशा भयंकर बाहुल्यांबद्दल...
पुपा (बाहुलीसाठीचा लॅटीन शब्द) ही १९२०मध्ये तिच्या इटालियन मालकासारखी दिसायला हवी म्हणून बनवण्यात आली होती. तो कल आजही दिसतो जशा की अमेरिकन “जस्ट लाईक यु” (अगदी तुमच्यासारख्या) ओळींसोबत येणाऱ्या बाहुल्या, पण त्या दिवसांत अशा बाहुल्या बहुमतांशी मालकाचे केस वापरायच्या.
पुपाच्या मालकाने असा दावा केलं की पुपा तिच्याशी बोलायची. २००५ मध्ये मालकाच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी पुपाला काचेच्या पेटीत ठेवलं, आणि निकालानुसार ती बाहुली काही काळाने स्वतःची जागा बदलते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही बदलतात, ती काचेच्या पेटीवर जणू बाहेर काढायला सांगत असल्याप्रमाणे थापही मारते. तिच्या नजरेच्या टप्प्यातल्या गोष्टीही तिने हलवल्याचं सांगितलं गेलं आहे.