पुनर्जन्माच सत्य : रूथ सिम्मंस
पुनर्जन्म आतापर्यंत एक वादग्रस्त विषय राहिला आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास आहे तर काहींचा यावर विश्वास नाही. परंतु अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या आपला पुनर्जन्मावरचा विश्वास दृढ करतात. अशाच काही पुनर्जन्माच्या कथा पाहुयात.
रूथ सिम्मंसची गोष्ट पुनर्जन्माची एक सुरेख गोष्ट आहे. १९५२ मधे त्याने संमोहनाच्या काही सत्रांमध्ये भाग घेतला. तिथे त्याची थेरपिस्ट मोरे बेर्न्स्तीनने तिला त्याच्या जन्माच्या वेळची आठवण करून दिली. ती अचानक आयरिश ढंगात बोलू लागली आणि १९ व्या शतकातील बेलफास्ट आयरलैंडच्या ब्रैडी मर्फी प्रमाणे ओळख दाखवू लागली. तिने जे काही सांगितलं त्याची खातरजमा होऊ शकली नाही. परंतु तिने २ माणसे - श्रीमान जॉन कार्रिगन आणि श्रीमान फर्र यांची ओळख सांगितली ज्यांच्याकडून ती जेवण विकत घेत असे. १८६५-६६ च्या शहर निर्देशिकेमध्ये या दोन व्यक्ती दुकानदार म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. ही घटना १९५६ चा चित्रपट " द सर्च फॉर ब्रैडी मर्फी " मध्ये दाखवली आहे.