पुनर्जन्माच सत्य : डच क्लॉक
पुनर्जन्म आतापर्यंत एक वादग्रस्त विषय राहिला आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास आहे तर काहींचा यावर विश्वास नाही. परंतु अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या आपला पुनर्जन्मावरचा विश्वास दृढ करतात. अशाच काही पुनर्जन्माच्या कथा पाहुयात.
ब्रूस व्हित्तिएरला वारंवार असं स्वप्न पडायचं की तो एक यहूदी असून आपल्या घरात आपल्या परिवारासोबत लपून बसला आहे. त्याचं नाव स्टेफन होरोवित्ज होतं, एक यहूदी ज्याला कुटुंबासकट शोधून काढून ऑस्च्वित्जला नेण्यात आल जिथे त्याचा मृत्यू झाला. स्वप्न पडल्यावर खूप घाबरून, घुसमटून तो जागा होई. त्याने आपली स्वप्न लिहून ठेवायला सुरुवात केली. एका रात्री त्याला स्वप्नात एक घड्याळ दिसलं आणि सकाळी उठल्यावर त्याने त्या घड्याळाच चित्र काढलं.
व्हित्तिएरने स्वप्नात ते घड्याळ एका पुराण वस्तू भांडारात असल्याचं पाहिलं आणि तो त्या दुकानात ते घड्याळ पाहायला गेला. घड्याळ खिडकीतून दिसत होत आणि त्याला स्वप्नात दिसलेलं ते हेच घड्याळ होतं. त्याने दुकानदाराला विचारलं की घड्याळ कुठून आणलं? दुकानदाराने ते घड्याळ नेदार्लंडमधून एका सेवानिवृत्त जर्मन मेजरकडून विकत घेतलं होतं. त्यामुळे व्हित्तिएरला खात्री पटली की खरोखरीच त्याचा पूर्व जन्म होता.