पुनर्जन्माच सत्य : जॉन राफेल आणि टावर झाड
पुनर्जन्म आतापर्यंत एक वादग्रस्त विषय राहिला आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास आहे तर काहींचा यावर विश्वास नाही. परंतु अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्या आपला पुनर्जन्मावरचा विश्वास दृढ करतात. अशाच काही पुनर्जन्माच्या कथा पाहुयात.
बर्मिंघम, इंग्लंडमधील पीटर हूम ला १६४६ मध्ये स्कॉटिश सीमेवरील आपल्या सैनिक म्हणून नियुक्ती सम्बंधी स्वप्ने पडू लागली. तो क्रोम्वेल सेनेचा सैनिक होता आणि त्याचं नाव जॉन राफेल होतं. संमोहन केल्यावर हूमला अन्य जागा आणि परिस्थिती आठवली. ज्या जागा त्याला आठवल्या, त्या जागांवर त्याने आपल्या भावासोबत जाण्यास सुरुवात केली. हॉर्स स्पर्स सारख्या त्या काळी वापरात असलेल्या अनेक वस्तू त्यांना मिळाल्या.
एका गावातील इतिहासकाराच्या मदतीने त्याने एका चर्चबद्दल खुलासा केला. त्याने सांगितलं की या चर्चजवळ एक टावर होता ज्याच्याखाली एक सदापर्णी झाड होतं. ही माहिती सार्वजनिक नव्हती आणि इतिहासकारही हैराण झाला की हूमला हि गोष्ट कशी माहीत कारण चर्च टावर १६७६ मधे तोडण्यात आला होता. स्थानिक माहितीप्रमाणे जॉन राफेलने चर्चमध्ये लग्न केले होते. एक गृहयुद्ध इतिहासकार रोनाल्ड हट्टन ने याबाबत तपास केला आणि हूम ला संमोहनाच्या मदतीने काही प्रश्न विचारले. हूमला मागील जन्माच्या फार आठवणी आहेत यावर हट्टन चा विश्वास बसला नाही कारण हूम अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.