७ भारतीय रहस्ये
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

७ भारतीय रहस्ये : सिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान

हि १० अशी भारतीय रहस्ये आहेत ज्याबद्दल लोक बलायला सुद्धा कचरतात. अनेक देशी विदेशी लोकांनी ह्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण यश आज पर्यंत आले नाही.

नेताजी बोस ह्यांचा मृत्यू   जगातील पहिले विमानउड्डाण

हिमालयाच्या उदरात अनेक रहस्ये आहेत. त्यापैकी सिद्धाश्रम हि एक आहे. पृथ्वीवरील अनेक चिरंजीव लोक जसे हनुमान वगैरे हिमालयातील ह्या गुप्त शहरांत राहतात अशी समजूत आहे. फक्त प्रचंड ज्ञान प्राप्ती केलेल्या लोकांनाच इथे प्रवेश आहे. हे स्थान अश्या प्रकारे वसवले गेले आहे कि अगदी उपग्रहातून सुद्धा ते स्पष्ट दिसू शकत नाही.

तिबेट आणि भारतातील अनेक साधू भिक्षु लोकांनी सिद्ध्लोकाबद्दल लिहून ठेवले आहे आणि काही जन आपला मृत्यू जवळ येताच तिथे निघून गेले आहेत. हिमालयांत दुर्ग्रोहण करणाऱ्या लोकांना येती किंवा इतर सिद्ध लोक खूप वेळा दिसून येतात पण नंतर शोडले असता ते सापडत नाहीत.

हनुमाना शिवाय इथे वसिष्ठ, विश्वामित्र, भीष्म, कृपाचार्य, शंकराचार्य, कणाद, परशुराम इत्यादी विभूती ध्यान मग्न आहेत. सदर शहराचे रक्षण व्हावे म्हणून ४ प्रकारचे जीव गस्ती वर असतात. येती शिवाय अर्ध मानव आणि अर्ध पक्षी प्रकारचे जीव सुद्धा ह्या कामात आहेत.चुकून एखादा मानव तिथे पोचलाच तर त्याला त्या शहरांतच सर्व सुख सुविधा घेवून जीवन व्यतीत करावे लागते अशी सुरक्षा योजना आहे. दर रात्री अश्या मानवांची स्मरणशक्ती रिसेट होते आणि त्यांना वाटते कि ते आजच सिद्ध लोकांत पोचले आहेत. शेकडो वर्षे पर्यंत हे मानव त्याच शहरात अडकून राहतात. 




. . .