भूत बंगला
Horror Editor Updated: 15 April 2021 07:30 IST

भूत बंगला : रहस्य

भूत कथा. गूढ कथा . Marathi Horror Gudh Katha and bhutachya goshti

गहिरा अंधार ---- भयकथा   तो परत उठला आहे या कबरीमधून

तो रात्रीचा किरर अंधार होता. वाडा जणू त्या अंधारात हैवानी ताक्तिनी लखलखत होता..आकाशात विजांच्या गर्जना चालू होत्या.. ढग एकमेकावरती आदळत होते संपतराव वाड्यातील तळघरात होता.. त्या वाड्याच्या रौद्र रुपास पाहून आपल्या हातातील थैलीत काहीतरी भरून तो तळघरातून वाड्याच्या बाहेर पडला . एखादा लालसी माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता जवळ चोरलेल्या अथवा त्या मिळालेल्या धनाची फिकीर फक्त करत धावतोय असा तो धावत होता आणि कशापासून तरी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता… जीवाच्या आकांताने तो वाडा सोडून जंगलाच्या मिळेल त्या वाटेने तो पळत सुटला होता…पळता पळता श्वास भरत सारखे सारखे तो मागे पाहत होता असे वाटत होते कोणीतरी त्याच्या मागावर होते… त्याच्या मागावर होते कि त्याच्या हातातील थैलीत असलेल्या त्या धातूच्या आणि काचेच्या तुकड्यासाठी त्याचा पाठलाग करीत होते कोणास ठाऊक.

पळता पळता तो दगडास ठेच लागून धडपडून तोंडावरती पडला. पडल्या नंतर त्याला जाणवले कि जे कोणी आपल्या मागावर होते ते नक्कीच जवळ आलेले असणार … असा विचार करीत संपत ने मागे पहिले. पण मागे पाहताक्षणी त्याला कोणाचेच चिन्ह दिसेनासे झाले… भीतीने त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता.. मागे कोणी नाही आहे पाहून तो जरासा सावरला..आणि हात जमिनीवर टेकवून उठू लागला ..आणि त्याचक्षणी संपत च्या समोर त्याला कोणीतरी उभे असेलेल दिसले… पुढ्यात उभा असणाऱ्या त्या संदिग्ध व्यक्तीचे ते रक्तानी भरलेले लालभडक पाय…अंगात पांढरा शुभ्र कपडा पण तो हि रक्ताच्या सड्यात भिजलेला.. ते काय होत स्त्री कि पुरुष ठाऊक नव्हते.. संपतच्या हातातील ती थैली आधीच धडपडीने पडून फाटली होती..आणि त्यातील वस्तू खाली जमिनीवर विखुरल्या गेल्या होत्या.. संपत स्वतःला सावरत उठला.. आणि त्याची त्या समोरील गोष्टीशी नजरानजर झाली त्याचे फक्त काचेच्या गोटीसारखे पांढरे डोळे.. चेहरा पूर्णपणे डोक्याच्या तापटसर काळ्या केसांनी झाकलेला होता.. संपत त्याच्या डोळ्यात पाहत होता.. ते डोळे एकवेळ संपत कडे आणि एकवेळ खाली पडलेल्या त्या धातूच्या तुकड्याकडे पाहत होते .. संपत पुढील काही कृती करणार तेवढ्यात.. तो मागे असलेल्या झाडाकडे आपोआप खेचला जाऊ लागला.. त्याचा आवाज निघेनासा झाला होता.. झाडातून एक वाळलेली फांदी अनुखुचीदार रीत्या बाहेर डोकावत आली होती आणि त्या संदिग्ध शक्तीने संपत ला एक जोरदार धक्का दिला त्या धक्याने संपत झाडास जाऊन धडकला आणि धडकताच ती फांदी त्याच्या छातीच्या आरपार झाली… आरपार होता क्षणी….संपतचे डोळे लालबुंद पडले..तोंडातून लाळेवाटे जणू रक्त बाहेर टपकु लागले संपत ने हळूवार आपली मान खाली झुकवली आणि तसाच राहून संपत..गतप्राण झाला.. त्याच्या छातीतून रक्ताचे ओघोळ त्याच्या अंगावरती ओघळत खाली येत होते आणि पायावरून जमिनीवर पाण्यासारखे त्याचे थर जमा होऊ लागले.. मान खाली टाकून.. संपतच प्रेत त्या झाडास अडकून राहिले.. इकडे ती संदिग्ध शक्ती ती विलक्षण गोष्ट.. नाहीशी झाली आणि त्या सोबतच ते धातूचे आणि काचेचे तुकडे देखील…

***

सुनील हातात पांढरा कंदील घेऊन त्या तळघरात जाणाऱ्या गूढ अंधारातील पायऱ्याच्या सुरुवातीच्या टोकास उभा होता.. खाली जाणाऱ्या कोणास तरी हाका मारून तो थांबवण्याचा प्रयत्न करीत होता.. अनि मला सोडून जाऊ नकोस .. मित्रा अस नकोस करू मला सोडून जाऊ नकोस … थांब अनिरुद्ध थांब… असे तो झोपतेच बेड वर पडून ओरडत होता कि अचानक .. ट्रिंगट्रिंगssss…ट्रिंगट्रिंगssss.. अंथरुणात पहुडलेला सुनील.. त्या खनखन करणाऱ्या आवाजाने खडबडून जागा झाला..आत पडलेल्या स्वप्नाने तो बावरून गेला होता ते स्वप्न रोज त्याला येऊन सारखे असे त्याला जाणवून द्यायचे कि त्याचा जवळचा मित्र अनिरुध्द कसल्यातरी संकटात आहे ते इकडे तो फोन वाजत होता सुनील ने स्वतःस सावरले चेहऱ्यावरील घाम पुसला आणि बाजूला असलेल्या ग्लासाने घटाघटा पाणी प्यायला व थोडा श्वास घेऊन सुनील फोन उचलला तिकडून जणू कोणत्यातरी उच्चपदाधिकाऱ्याच्या आदेश ऐकत असल्यासारखा.. सुनील फोन वर सर्व काही ऐकत होता.. आणि आदेश फक्त मानत असल्यासारखाच.. आदराने इकडून होकारार्थी उत्तरे देत होता.. .. सुनील एक व्यवसायाने.. सरकारी चाकरच म्हणा पोलीस खात्यात.. एक प्रशस्थ असा डिटेक्टीव्ह जासूस होता.. आणि त्याने.. आपल्या जीवनात बऱ्याच गुन्हेगारांना त्याच्या गुन्हानकरिता गजाआड केले होते… पण यावेळी त्याचा सामना कोणत्या गुन्हेगाराशी होणार होता यापासून.. तर सुनील अनभिद्न्य होता. त्या फोनवर सुनीलला त्याची एक नवीन केस त्याला मिळाली होती. आणि ती केस होती.. रामचंद्रराव यांच्या थोरल्या मुलाच्या म्हणजे संपतराव यांच्या खुनाची.. केस होती ती.. तीच केस सोडवण्यास आजच्या आजच .. सुनीलला निघायचे होते..बऱ्याच दिवसांनी त्याला वाटू लागले एक मेंदूस कसरत करायला लावणारी केस आहे वाटते हि… आणि सकाळी आपले सर्व उरकून सामान सार बांधून सुनील त्या ठिकाणी जाण्यास निघाला जिथे.. गूढ अंधाराची अनुमती घेतल्याशिवाय उजेडाचा किरण प्रवेश करत नाही. जिथे अंधाराचे साम्राज्य त्या वाड्यापासून सुरु होते आणि उजेडाचे राज्य तेथेच येऊन संपते.. एक काळे रहस्य जे वाड्याच्या गर्भात होते.. असे रहस्य भेदण्यास सुनील त्या गावी जात होता.. आणि त्या गावाचे नाव होते. “दिजाखेड”…. सुनील सकाळच्या ट्रेन ने बसला आणि मजल दरमजल करीत ट्रेन त्या ठिकाणी पोहोचली…. उतरता सुनील त्या गावचा नजारा पाहत भारावूनच गेला होता.. सर्वत्र उंच डोंगरे हिरवी शाल पांघरून गाढ झोपलेली आहेत असी वाटत होती…. वाऱ्याच्या नादाने त्याला साथ देत देत झुलणारी झाडे थिरकणारी झुडपे.. एक थंड गारवा सुनीलच्या अंगास झोंबत होता… सुनील त्या मनमोहक वातावरणाचा लुफ्त घेतच होता कि उतरता क्षणी एक टांगेवाला टांग्याच्याजवळ उभा असलेला एक वृद्ध लंगडा माणूस जरासा कान्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करीत इकडे तिकडे पाहत सुनील कडे येऊ लागला…. तो सुनील जवळ पोहचला.. आणि त्याने आपल्या कोरड्या दमात विचारले.. तुम्ही सुनील का? सुनील म्हणाला “हो मीच सुनील आणि आपण कोण ?” त्यावर तो समोर उभा असलेला वृद्ध उत्तरला

” मी नाथबा मला रामचंद्र यांनी तो बोलता बोलताच थांबला ” सुनील त्याला संशयी नजरेने पाहत त्याला म्हणाला ” हो कळले मला तुम्हाला रामचन्द रावांनी पाठवले आहे ते. मला फोनवर कळले होते ” तो तोंड वाकडे करीत म्हणाला ..”होय का? बरबर चला ” त्या माणसाने सुनील चे समान उचलले आणि टांग्यात टाकले तो त्याचा उर्मट असा आवाज सुनीलला सारखा परेशान करू पाहत होता तरी पण कसा बसा सुनील त्याला विचारण्याचा प्रयत्न करू लागला.. तो म्हणाला “तुम्ही सगळे जन वाड्यावर राहता होतात का? ” तो माणूस उर्मट रित्याच उत्तर देत बोलू लागला “नाही .. आम्ही वाड्यावर कोणीच राहत नव्हतो ते आमचे संपतराव .. अय्याश एक नंबरचे तेच फक्त राहत होते आम्ही आम्ही बाहेर गावी राहायचो ..पण जस कळले कि संपतराव गेले मग रामराव मालकांनी आम्हाला सगळ्यांना या वाड्यावर आणल ..मालक आता जरा आजारान त्रस्त हायत आणि छोटी मालकीण बी असत्यात आता आमच्या संग छोट्या मालकीण स्वभावान संपत रावच्या एकदम उलट … आणि बोलत बोलत त्याने सुनील ला सर्व काही पारिचारिक माहिती सांगितली… ” रामरावाना एक मुलगी देखील होती संपतरावाची लहान बहिण.. विद्याद्यिनी सर्व तिला विद्या म्हणायचे ती विदेशात डॉक्टरी करून आली होती … आणि तिझे वर्णन म्हणजे अप्सराच अत्यंत सुरेख.. रंग गोरा, उंच, मंजुळ आवाज..आणि दिसण्यास आणि राहण्यास सोज्वळ.. विद्या देखील वाड्यातच होती सध्या ती देखील तेथे होती.. बोलत बोलत..जंगलाच्या वाटेने.. रस्ता कापत कापत..सुनील आणि नाथबा जात होते …. लांबूनच डोंगराळ भागात जणू त्या गावच्या निसर्गाची शोभा वाढवेल असा तो शानदार वाडा सायंकाळ होत आली होती .. सूर्य अस्त होण्याच्या मार्गी होता… आणि त्याच्या शिखराचा अग्रभाग उंच उंच झाडामधून डोकावत स्वतःच स्वतःचा मान राखण्याचा प्रयत्न करू पाहत होता असे वाटत होते… टांग्याद्वारे ते वाड्यापर्यंत पोहोचले.. पण तो वाडा नसून एक प्रकारचा भव्य बंगला निघाला.. त्याची बांधणी वाड्याप्रमाणे होती … जणू इंग्रज कालीन बांधला होता आणि साबूत देखील असा जसा आताच नवीन बांधला आहे.. भला मोठा एकूण २० एक खोल्यांचा बंगला.. शानदार एक इंग्रजांचा राजवाडाच एक प्रकारे म्हणाल तर असा होता तो .. मुख्य द्वारजवळ पोहचण्याची ती सुंदर अरुंद वाट दोन्ही बाजूने हिरवळ गवताच्या शालुनी बाहरून आली होती… फाटक ओलांडून मुख्य द्वारा पाशी सुनील पोहचला .. नाथबाने ते मुख्य द्वार आपल्या दोन्ही हातानी जोर लाऊन उघडले.. तो दरवाजा कररक्र्रर्र आवाज करीत उघडला सुनील आत पोहोचला.. आत शिरताक्षणी.. त्याला एक वेगळाच अनुभव आला.. एक कुबट वासाचा गारवा त्याला शिवून गेला त्या गार वाऱ्याच्या हेलकाव्याने सुनील भांबरला …त्याला जसा तो एका स्वप्नाच्या जगातच आहे.. आपण स्वतः सध्या काय करतोय कसे आहोत याचे तो भान पूर्ण विसरून जाऊ लागला हे प्रथमच त्याला भासत होते.. तिथपर्यंत पोहचता पोहचता अंधार झाला होता हि गोष्ट तर वेगळीच… अश्याच अंधारात.. तो बंगला एकप्रकारे आपल्या रौद्र आणि हैवानी अलौकिक ताक्तींचा वास असल्यासारखा भासत होता… हातातील सामान नाथबानी हॉल मधील सोफ्यावर ठेवले आणि आजूबाजूच्या लाईट्स लावल्या.. सुनील प्रथमच एवढा मोठा बंगला आपल्या आयुष्यात पाहत होता.. समोरून दोन्ही बाजूनी यु आकाराच्या पायऱ्या वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी होत्या.. आणि हॉल मध्ये थेट सुनीलच्या डोक्यावरती.. एक लटकणारे स्टायलिश असे झुंबर होते.. खाली पूर्ण हॉल मध्ये कार्पेट होते.. मखमली सोफा.. सुनील हे सर्व डोळ्यांनी पाहतच होता कि.. कि एका भारदास्त असा आवाज त्याला आला.. “वेलकम सुनील साहेब!” समोरील उजव्या बाजूच्या पायऱ्याहून … रामराव चालत खाली होते.. अंगात एक प्रकारचा सूट घातला होता.. भरदार बांधा दिसण्यास एकदम कडक वृत्तीचे.. त्यांच्या बोलण्यातून वाटत होते कि त्याच्या मनावर जड ओझे आहे ..अर्थातच असणार कारण एकुलता एक मुलगा वारला होताना वंशाचा दिवाच मालवला होता.. तरीही त्यांनी चेहर्यावरती कोरडे हसू आणून.. सुनीलचे स्वागत केले.. त्यांना पाहून सुनील म्हणाला धन्यवाद !! असे म्हणत रामराव सोफ्यावरती बसले आणि सुनील ला हि त्यांनी बसण्यास आग्रह केला … मला दुख झाले आपल्या मुलाबद्दल ऐकून..सुनील बसत बसतच म्हणला ..रामराव हवेत हात हलवत म्हणाले .. नाही त्याची गरज नाही … “जे आपल्या नशिबात लिहलेल असत ते घडतेच आपण त्याला बदलू शकत नाही रामरावाचे डोळे पाणावल्या सारखे झाले .. होते. तेवढ्यात तेथे विद्या आली.. आणि क्षणभर तिला पाहताच सुनील स्वतःला हरपून गेला.. इतकी सुंदर मुलगी त्याने आपल्या जीवनात प्रथमच पाहिली होती… ती येताच तो तिच्यावरील नजर बाजूला काढूच शकत नव्हता,…. तेवढ्यात त्याला नाथबाचे बोलणे लक्षात आले होते कि.. रामरावास एक मुलगी देखील होती तीच होती विद्या… एकदम साधारण येताच क्षणी तिने सुनील ला नमस्कार केला… आणि ती देखील आपल्या वडिलांच्या बाजूला येऊन बसली.. बसता बसता तिने आपल्या बाबास…एका लहान मुलासारखेच विचारले…” बाबा तुम्ही औषधे घेतली?” तिच्या त्या प्रश्नांनी रामराव बावरले.. आणि त्यांची थोडी चलबिचल झाली….विद्याने बाजूला ठेवलेल्या टेबलावरील गोळ्या घेतल्या आणि.. रामरावाना खाण्यासाठी आग्रह केला.. विद्याच्या त्या हट्टापुढे त्यांना नेहमी झुकावेच लागे.. विद्या आपल्या मंजुळ आवाजात सुनील ला म्हणाली “दादा गेल्या पासून विद्या थोडीशी पाणावली पण पुन्हा तिने स्वतःला सावरत म्हणाली ” बाबांची तबियत काही ठीक नाहीये राहत…आणि ते स्वतःहून कधी औषधे घेत नाहीत ..म्हणून त्यांना मलाच पहावे लागते ..” रामरावानी औषधे घेतली आणि म्हणाले ..”अहो तुमची ओळख करून द्यायचे राहिलेच कि .. हि आमची मुलगी विद्यादिनी …आम्ही लाडाने विद्या म्हणतो… आणि बर का? आमच्या विद्याने आताच डॉक्टरी पास केली आहे .. MBBS आहेत आमच्या विद्या.. ” विद्या बाबांना अडवत हलक्या स्वरात हसत म्हणाली …” बाबा ते आताच आले आहेत.. थकले असतील त्यांना.. चहा वगेरे तुम्ही विचारले का नाही ?” रामराव भानावर आल्यासारखे म्हणाले “अरे हो.. पण आता इतकी रात्र झाली आहे …तर सुनील राव तुम्ही तुमच्या केस करिता येथे आला आहात .. पण आमच्या संपतचे कोणी शत्रू वैरी नव्हते .. बोलता बोलता रामराव पुन्हा थांबले आणि जणू त्यांनी स्वतःस भक्कम दाखवण्याचा प्रयत्न करीत .. म्हणाले ते जाउद्या या विषयावर आपण सकाळी बोलुत ..सध्या जेवण्यास चला.. तिकडे किचन कडे जेवणाची खोली आहे.. या विद्या आधी आत मध्ये गेली आणि टेबलावरती तिने सर्व जेवणाची मांडणा मांडणी केली.. आणि सुनीलकडे आली रामराव जेवणाच्या मेजवर पोहोचले… आणि सुनीलला हात धुवायचे होते .. म्हणून तो इकडे तिकडे काही तरी हुडकत होता.. तेवढ्यात विद्या त्याच्या जवळ आली आणि म्हणाली … या बाहेर पाण्याचा नळ आहे सध्या बाथरूम वरती आहे म्हणून ..बाहेरील नळ जवळच आहे.. तिचा आवाज खूप मंजुळ होता.. तो जणू स्वत:ला विसरूच लागला होता.. दोघेही बाहेर आले.. आणि विद्याने सुनील ला नळ चालू करून दिला आणि ती हातात टोवेल घेऊनच उभा होती… ती त्याच्या कडे केआ आशावादी नजरेने पाहत होती .. ती त्याला पाहत म्हणाली “mr सुनील बरे झाले तुम्ही आला आहात येथे ते.. आम्ही इथे राहण्यास आल्या पासून इथे खूपच विचित्र गोष्टी घडताहेत… खूपच विचित्र.. मी बाबांना नाही सांगू शकत कारण दादा चे दुख आधीच त्यांच्या मनात घर करून आहे.. आणि दादा बद्दल सांगायचे झाले तर.. दादा थोडक्यात उठायगिऱ्या सारखे राहत होते.. बाबांनी त्यांना बरेच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण दादा ऐकत नव्हते ते सारखे बाबाकडून जबरदस्ती पैसे घ्यायचे ..मग ते म्हणाले मी हा बंगला विकून टाकीन यातली एक एक वस्तू विकीन जर तुम्ही मला पैसे नाही दिलेत तर पहा.. दादा आम्हाला सोडून इकडे निघून आले आणि त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी आम्हाला कळली आणि आम्ही मग येथे आलो..दादाची खोली आम्हाला पोलिसांनी जशीच्या तशी ठेवण्यास सांगितली..आणि त्यांनी खोलीस बाहेरून कुलूप लावून त्याची चावी बाबा जवळ ठेवली.. ” सुनील ला विद्या सर्व काही नकळत सांगून गेली.. तो उठायगिऱ्या, अय्याश होता, जुगारू होता.. संपतची बरीच ओळख.. विद्या द्वारे सुनील ला झाली.. विद्याने सुनील ला टोवेल दिला.. आणि तो तिला म्हणाला ..”तुम्ही नकळत मला खूप माहिती संगीतीली आहे.. धन्यवाद आणि तुम्ही विचित्र गोष्टींबद्दल बोलताहात म्हणजे कशा प्रकारच्या..कोण्या अनोळखी व्यक्तींचे पत्र अथवा धमकीचे फोन अथवा तुम्हाला कोणी परेशान तर नाहीं न करत..” मला आरेतुरे म्हणाल तरी चालेल… विद्या स्मित हस्य करीत सुनील ला म्हणाली.. सुनील देखील तिला पाहून थोडासा हसला विद्या पुढे बोलू लागली ती म्हणाली तुम्ही म्हणता त्या पैकी एक असते तर ते मी स्वतः पाहिले असते.. पण अश्या गोष्टी ज्यांना मी कधीच नाही समजू शकणार ..एकवेळच अचानक कोणत्यातरी कोपर्यातून कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो..आणि तोही साधारण नाही खूपच खिन्न हसण्याचा ….घरात कोठे एकटे जात अथवा फिरत असल्यास कोणीतरी पाठलाग करतय आणि दादाच्या खोलीतून कोणीतरी श्वासाच्या ओघात मला हाका मारते..आम्ही जेव्हादादाच्या खोलीस कुलूप लावले..तेव्हा आतमध्ये कोणीसुद्धा नव्हते राहिले… आणि नाथबा रात्री मध्यरात्रीच उठून काहीतरी घरात फिरतंय अशी दोन तीनदा बातक्रार माझ्याकडे घेऊन आला होता.. सुनील तुम्ही एकवेळ घर फिरून पाहावे अशी माझी इच्छा आहे… तेवढ्यात “विद्या अग बाळ विद्या” आतून रामराव विद्यास हाक मारीत होते.. विद्या सुनील ला पाहत आत गेली आणि जाता जाता त्याला आत येण्यास ती म्हणून गेली.. सुनील टॉवेलने हात पुसत आत जाण्यास निघाला.. तो जिथे उभा होता तेथून किचनची खोली बऱ्यापैकी लांब होती.. सुनील जाण्यास निघाला.. पण जेव्हा त्याने बंगल्यात प्रवेश केला जी अनुभूती त्याला झाली होती.. तीच अनुभूती त्याला आता होऊ लागली.. त्या पूर्वी त्याच्या मनात विचार चालू होते. कि दरवेळी प्रमाणे केस सिम्पल आहे.. कि एखाद्या उठायगीर्या माणसाचे बरेच वैरी असतील आणि त्यांच्या पैकीच कोणीतरी एक असेल.. अश्या माणसांना शत्रूंची कमी नसते.. हाच विचार त्याच्या मनात चालू होता.. त्याच्या फाईल मध्ये संपत च्या मृतदेहाचे आणि सर्व इतर माहिती होती.. सुनील ला आत्मविश्वास होता कि तो नक्की दरवेळी प्रमाणे.. हि देखील केस तो आरामात सोल्व करेल… पण सुनील.. मुख्य मुद्यापासून तर लांबच राहिला होता.. त्याने विचार केला होता उद्यापासूनच तो सर्व काम सुरु करेल.. आणि त्याची ती होणारी अनुभूती त्याला त्या घराबद्दल वेगळेच जाणवत होते… जणू या घरात अजून कोणीतरी नक्कीच आहे.. सुनील आतमध्ये आला आणि त्याने जेवण वगेरे उरकली रामरावानि त्याची थोडीफार विचारपूस केली आणि सुनील ने हि न दिरंगाई बाळगता सर्व काही सांगितले.. आणि झोपण्यासाठी तो जाऊ लागला जाता जाता विद्या देखील त्याच्या बरोबर होती ती त्याला त्याच्या खोली पर्यंत सोडण्यास येत होती.. पायऱ्याहून वरती जात असताच.. मध्यभागी वरती बसण्या करिता एक फायरप्लेस होते तिथे दोन आराम खुर्च्या होत्या.. आणि शेकोटीचे फायरप्लेस होते… तो बंगला अत्यंत विशाल होता.. कोणती जणू प्रत्येक खोली आपापल्या शिस्तीत आणि लाईनमध्ये लावल्या सारख्या वाटत होत्या आणि प्रत्येक खोली इंग्रजी मेजपोषणी वात होती.. विद्या सुनील ला त्या खोली कडे घेऊन जाऊ लागली .. जात जात सुनील विद्यास म्हणाला “जेवण, स्वयंपाक एकदम उत्कृष्ट होता… ” नाथबा सुनील ला आणण्या करिता स्टेशन वरती आला होता… तेव्हा विद्याने स्वतः स्वयंपाक करून ठेवला होतां.. त्याचे ते बोलणे ऐकून विद्या गालातल्या गालात हसली.. आणि तो पर्यंत ते दोघे सुनील च्या खोलीत पोहचले.. विद्याने सुनील ला दार उघडून दिले … दार उघडले आणि सुनील आत मध्ये आला.. आतमध्ये एकदम आलिशान असा दिवाण होता.. बसण्यास लोड तक्के आणि गद्दी,,.. सुनील आत आला त्याच्या उजव्या अंगास एक सुंदर अशी एका भरदार पहिलवानाची पिताळाची मूर्ती एका कोपरयात होती.. जणू ती त्या कोपऱ्याची शोभा वाढवण्यासाठीच ठेवली होती आणि तिने हातात एक धातूचा ठोकळा घेतला होता. इकडे विद्या आपल्या वडिलांच्या औषध गोळ्या पाहण्यास गेली होती.. सुनील त्या मूर्ती जवळ गेला आणि…. त्याने ती मूर्ती नीट निरखली.. एकदम उत्तम कारीगरी होती तिची.. आणि तिच्याच हातात तो धातूचा ठोकळा होता… आणि हा तोच ठोकळा होता ज्यांचा ढीग चोरून संपत जीव मुठीत घेऊन धावत होता… सुनील त्या ठोकळ्यास हात लावण्यास पुढे सरसावला….

***

आणि त्याने तो उचलला..उचलता क्षणी त्याला असे वाटले कि जणू कोणीतरी मागून त्याच्या अंगावर धावून आलंय अस त्याला वाटले त्याचे सर्व अंग आकसून जाऊ लागले.. मानेवरचे केस त्याच्या ताठ उभे राहिले.. सुनील च्या मानेवरती कोणाचातरी श्वास थडकत होता.. सुनील च्या खोलीतील वातावरण पूर्ण पालटून गेले होते.. त्याला जाणवू लागले कि नक्कीच त्याच्या खोलीत अजून कोणीतरी त्याच्या व्यतिरिक्त तेथे आहे.. समोरील ती मूर्ती जणू त्याच्याकडे क्रूर घ्रुनात्म्क रीत्या पाहतेय असे त्याला जाणवू लागले होते.. सुनील ने क्षणाचाही विलंब न करता तो धातूचा ठोकळा होता त्या ठिकाणी मूर्तीवर ठेवून दिला…. आणि त्या खोलीतील वातावरण वापस साधारण झाले.. सुनीलला प्रथमच एक अस्वस्थतेचे भान होऊ लागले.. त्याच्या माथी त्याला नकळतच घामाचे ओस निर्माण झाले होते.. आणि अश्या वातावरणात झोप येन ते तर अशक्य होत..म्हणून सुनील आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर… चंद्रास निहारत बसला होता.. अचानक त्याच्या चेहर्यावर एक हस्य आले.. असे वाटत होते तो चंद्रामध्ये… विद्यास पाहत होता… भावली होती ती त्याच्या मनाला… चंद्रास पाहत पाहत तो एव्हाना झोपिदेखील गेला होता..

. सकाळ झाली… सुनील त्याच्या आरामखुर्चीत केव्हा झोपी गेलेला होता त्याचे त्यालाच कळले नाही… सकाळ होताच सुनील उठला … आपल्या अंगातील आळस झटकून तो खिडकीपाशी हवा घेण्यास आला… त्याने केस कडे लक्ष देण्याचा विचार केला आणि आपले सर्व काही उरकून तो खाली आला… खाली विद्या रामरावास चहा देत होती.. आणि तिने सुनील ला पाहत दुसरा कप देखील तैयार केला होता.. पण सुनील येथे चहा घेण्यास आला नव्हता…. त्याने आदराने विद्यास चहा करिता नकार दिला.. आणि थेट फोन पाशी वळला… सुनील ने तेथील लोकॅल पोलीस इन्स्पेक्टर गावढे यांना फोन केला आणि ताबडतोब खुनाच्या ठिकाणी येण्यास सांगितले… इन्स्पेक्टर गावढे.यांच्याबद्दल सांगायचे झाले तर दिसण्यास… जरासे सावळे.. भरदार मिश्या… चपचपीत चमेलीच तेल लावून.. कुरळे केस कसे बसे दाबून ठेवणारे… बाहेरून दिसण्यास वाटायचे कडक पण आतून.. सश्या पेक्षा हि जास्त भित्रे..पण सदैव मदतीस तत्पर इन्स्पेक्टर गावढे.. फोन करताच घटनास्थळी पोहोचले.. तेथे सुनील.. जागेची पाहणी करीत होता… आत मध्ये कोणी येऊ नये अश्या रीतीने पोलिसांचा घेरा आणि पोलीस असे नाव असलेल्या… बंधांनी .. तेवढी जागा आरक्षित केली होती… त्या झाडास ती फांदी जशीच्या तशी होती..ते वाळलेलं झाड.. एकमेव संपतरावाच्या खुनास त्या घटनेचे.. निर्जीव साक्षीदार होते… त्या फांदीस .. संपतरावाचे लालभडक रक्त माखलेले होते… तेथे असणाऱ्या पावलांच्या खुणा देखील जसाच्या तश्या होत्या.. सुनील ने त्या नीट निरखून पाहिल्या… त्यात फक्त एकाच व्यक्तीच्या वाटत होत्या… आणि तो होता संपत.. सुनील खाली पाहतच होता कि.. तेवढ्यात धडपडत.. कोणीतरी.. स्वतःचे जाड पोट (ढेरी ) सावरत येत होते… हातात काठी.. आणि एका बगलेत पोलसांची टोपी.. त्यांना पाहताच क्षणी.. सुनील ओरडला .. “थांबा तेथेच !” ते होते इन्स्पेक्टर गावढे ज्यांना सुनील ने अडवले होते… इन्स्पेक्टर चा एक पाय हवेतच होता.. गावढेना कळेना सुनील ने त्यांना का थांबवले सुनील त्यांच्या जवळ आला आणि त्याने गावढेना आपला हवेत असणारा पाय मागे घेण्यास सांगितला… .. गावढे म्हणाले ..”काय ? काय झाले साहेब ?” सुनील त्यांना काहीच बोलला नाही.. त्याने स्वतः हुन गावढे यांचा पाय हाताने मागे सरकावला.. आणि खाली नीट निरखून पाहिले… तर तेथे लालसर माती.. जी आधी ओली झाली होती कोणत्यातरी..द्रवपदारथाने एखादा घट्ट द्रवपदार्थ… लाल.. आणि त्याच्या पुढ्यातच होते काही चौकोनी आकाराचे… ठसे.. एखाद्या ठोकळ्यांचे असावेत बहुदा सुनील ने त्यांचे आपल्या मोबाईलवर फोटो काढून घेतले… आणि ती ओली माती देखील पाहून सुनील समजून गेला कि ते रक्त होते.. आणि ते देखील जणू एखादाच्या तळपायाच.

आदित्यने आपली टीम बोलावली होती त्यांच्यापैकी सर्वप्रथम होता “गोविंद” एक साधा मुलगा पण अध्यात्मिक सर्व प्रकारच्या मंत्राश्लोकाची माहिती ठेवणारा सर्वप्रकारच्या याज्ञपुजेत माहीर. दुसरा रॉकी एक तंत्रचालक भुत, स्पिरीट आत्मा यांचे सावेन्दन करणारे यंत्रणा चालवण्यात माहीर, प्रज्ञा गोंडस मुलगी .. सारखे जवळ विचित्र

भाषेच पुस्तक बाळगणारी विविध संकेत चिन्ह यांची माहिती ठेवणारी.. शिना एक सनकी मुलगी सतत रागात पण आदित्य सारखीच एक paranorml प्रोफेशन्लीस्ट… ते सर्व तेथे येण्यासाठी तैयार झाले होते.. आदी आणि दिक्षा त्यांच्या स्वागताची तैयारी करीत होते. दिक्षानि सर्व खाण्यापिण्याची तैयारी केली होती..ते सर्व

संध्याकाळ पर्यंत पोहचणार होते.. आदित्य सारखे सारखे ते पुस्तक चाळत बाहेरच बसला होता.. दिक्षाला एक अस्वस्थता खात होती.. आदित्यने दिक्षास बाहेर बोलवले.. दिशू बाहेर येतेस का ??” दिक्षा बाहेर आली आणि पायऱ्यावरच आदित्यच्या बाजूस बसली तिचा चेहरा पडलेला होता.. आदिने तिला पाहिले त्यावर तो म्हणाला ”

काय झाले ? दिशू उम” .. “काही नाही आदी अरे एक विचित्र गोष्ट आहे असे वाटतय पुढे आपल्याला खूप संकटांना सामोर जावे लागेल..” त्यावर आदित्य उत्तरला “होय कळतय मला देखील..आपणास तेथे जाऊन अनिरुद्धला काहीही करून माघारी आणायचेच आहे” होय तेच मीही तेच म्हणतेय त्यास माघारी आणणे सोपे नाही..

दिक्षा त्यास म्हणाली आदिने तिझ्याकडे पाहिले… कि मोठा फोकस त्या दोघांवर पडला.. त्या दोघांचे डोळे चपापले गेले.. समोरून एक van त्याच्यापुढ्यात गर्ग्र्गर आवाज करीत उभा होती.. त्या van चे चारी दरवाजे एकसाथ उघडले गेले.. आणि त्यातून उतरले त्यांना पाहून दिक्षा आंनी आदीच्या चेहऱ्यावर एक आनंदाची

लहर पसरली… गाडीतून जे चार जन उतरले होते .. ती होती आदित्यची टीम … आणि उतरताच .. “सनकी खोबऱ्या आद्या .. असे म्हणत .. शिना त्याच्यावर धावली.. आणि तिने त्याला एक जोरदार धक्का मारला..” आदी त्या धक्क्याने चार पावले मागे जाऊन सरकला.. तरी कसे बसे दिक्षाने त्यास सावरले.. “अरे हे काय ? ती जरा

रागात उत्तरली …” आदी पुढे म्हणाला काही नाही यांचे नेहमीच आहे हे .. हि आहे शिना .. अशीच आहे हि.. आणि तोवर प्रज्ञा पुढे आली अग शिना काही कळते का नाही तुला .. त्याची पत्नी आहे इथे आणि तीझ्या समोरच मारतेस तू त्याला.. प्रज्ञा नाकावरचा चष्मा सावरत हातात एक जाडजूड बुक घेऊन दीक्षाकडे गेली आणि

म्हणाली” सॉरी हा शिना अशीच आहे ..मी प्रज्ञा हा गोविंद हा काही बोलणार नाही खूप शांत असतो हा.. आणि हा रॉकी आमचा टेक्निशियन… रॉकी… गाडीतून काही सामान बाहेर काढत होता… काही जाडजूड कॅमेरे त्यांचे stand.. आणि काही मीटर होते.. आणि गोविंद जवळ देखील काही समान होते… ते चौघे हि…

आदी आणि दिक्षाकडे … आले.. सर्वांचा परिचय झाला … *** प्रसंग (बंगला हॉलमध्ये)***

घरात त्यावेळी घरात सर्वत्र अंधार पसरला होता दिक्षाने सर्वांकरिता चहा बनवला होता. बाहेर कडाक्याची थंडी होती.. आणि आतमध्ये गुडूप अंधार होता… सर्व हॉल मध्ये एकत्र बसले होते आदित्य आपला चेहरा हातात घेऊन गंभीर मुद्रेत सर्वांकडे आशेच्या नजरेने पाहत होता.. दिक्षा हि तेथे येऊन बसली सर्व आदिला घेरून बसले

होते… आदिने खोकून गळा स्वच्छ करीत.. बोलण्यास सुरुवात केली आदीचा… चेहरा गंभीर पाहून सर्वजण गंभीर होते… आदीने आपल्या मागे ठेवलेले सोफ्यावारचे बुक काढले आणि सर्वांच्या मधोमध असलेल्या टेबलवर ठेवले.. सर्व एकत्र पुढे आले आणि ते पाहू लागले… ते पाहताच चष्मा बाजूला काढत प्रज्ञा डोळे फाडून ते बुक

पाहू लागली… तिच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव बदलले होते.. तीच्या माथी आलेले घामाचे ओस ठळक सांगत होते कि प्रज्ञाला नक्की माहित होते कि ते पुस्तक कशाचे आहे ते … प्रज्ञा थरथरत होती.. असे वाटत होते कि ती भीत देखील आहे आणि तिची जिज्ञासा देखील तिच्या चेहऱ्यावर उमटली होती… प्रज्ञाने आपले हात लांबवून ते

पुस्तक उचलले..त्या पुस्तकावर मोडी लिपी पेक्षा हि अवघड भाषेत काहीतरी नाव लिहल होत तिच्या तोंडून शब्द फुटले.. “जगदमृत” … सर्वांच्या तोंडून एक उदगार बाहेर पडले … “काय ? जगदमृत” कि अचानक प्रज्ञाच्या हातून ते पुस्तक खाली पडले… वाऱ्याचा एक झुळूक सर्वांच्या अंगास शिवून गेला.. आणि त्याच वेळी फडफड

आवाज करीत ते पुस्तक उघडू लागले… जसेजसे ते पुस्तक उघडत होत जसेजसे त्याचे पान पालटले जात होते तसे सर्व गोष्टी पाहून प्रज्ञाच्यादेखील चेहऱ्यावरचे भाव बदलत होते… सर्व जन मेणबत्तीच्या उजेडात होणारा बदल पाहत होते… कि सर्व शांत झाले वाहणारे वारे थांबले आणि त्या पुस्तकाचे शेवटचे पान उघडून ते पुस्तक

देखील थांबले… सर्वांचे श्वास भीतीने वारीखाली होत होते.. तसेच “प्रज्ञा काय होत हे ?.. काय आहे या पुस्तकात ..?” दिक्षा उदगारली…”हे एक विधी पुस्तक आहे..हे पुस्तक सूर्यभान मंडलक यांनी लिहील होत यात सर्व प्रकारच्या विधी आहेत आणि हे पुस्तक ज्याने लिहून संपवलं होत.. तेव्हा त्याच क्षणी शेवटचा शब्द शेवटचा संकेत

लिह्ताच त्यांचा मृत्यू झाला होता… आदित्य उत्तरला सूर्यभान म्हणजे … गोविंद उत्तरला होय तू जे समजत आहेस तेच ते सूर्यभान ज्यांनी.. आपल्या paranorml सेंटर चे सर्वात पहिले स्थापक …”होय त्यांनीच लिहले आहे हे पुस्तक ” प्रज्ञा उत्तरली …”आणि असे म्हणतात कि जेव्हा सूर्यभान हे पुस्तक लिहित होते.. तेव्हा एक

दृष्ट आत्मा म्हणे त्यांना मारण्यावर ठेपला होता .. सूर्यभान यांनी या पुस्तकात तुम्हाला माहित आहे.. आत्म्यांच्या दुनियेत जाण्याचा विधी लिहिला आहे आणि तेथून परत येण्याचा देखील.. आदी ते ऐकून एकदम खुश झाला.. तो प्रज्ञास म्हणाला… तुला माहित आहे का तो विधी.. त्यावर प्रज्ञा नाकावर चष्मा चढवत म्हणाली नाही पण या

पुस्तकात आहे?” का रे ? का विचारतोयस..?प्रज्ञाने आदिला विचारले रॉकी आणि शिना गपचूप सर्व पाहत बसले होते… त्यावर आदित्य म्हणाला … “आपल्या सर्वांना तोच विधी येथे करायचाय … त्यावर गोविंद आणि प्रज्ञा ताडकन उठले ..त्यांच्या तोंडून एका सुरात एक शब्द बाहेर पडला …”काय ? येथे ? ” प्रज्ञाच्या हातातून तिझे

पुस्तके खाली पडली.. गोविंद ने हातातील थैली खालीच सोडली… प्रज्ञा थोड चिडत म्हणाली .. “आदी तुला माहित आहे का? तू हे काय बोलतोयस ते .. अरे तू आत्म्याच्या दुनियेत जायचं म्हणतोयस.. हे आपल्या planchet चा खेळ वाटतोय तुला ?” गोविंद अरे समजाव याला… त्यात शिना ओरडली ..”अबे ओय ,,..झंडू

गोयद्या … ये प्रज्ञा चष्मा खाली बस .. काय तापलाय यार ?? .. आदी काय म्हणतोय ऐकून घ्या बे मला पण माहित आहे ते अवघड आहे पण तो काय म्हणतोय ते ऐकून घ्या मग फाडा तुमच” ते दोघेही शिनाच्या ओरडण्याने खाली बसले दिक्षा म्हणाली “guys हे अवघड आहे पण एकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे .. कोणीतरी

आमच्यावर खूप विश्वास टाकला आहे.. ” सर्व थोडे गंभीर होऊन दीक्षाचे बोलन ऐकत होते. त्यावर आदी म्हणाला” प्लीज दोस्तानो ” त्यावर रॉकी म्हणाला .. “आम्ही तैयार आहोत ..” त्यावर शिनाने रॉकीच्या हातावर टाळी दिली ..”ये हुई न बात .. आदिभाई मी पण रेडी..” आता फक्त प्रज्ञा आणि गोविंद बाकी होते.. ते म्हणले “ओके

!! ठीक आहे मग आम्ही पण तैयार आहोत..” सर्व शांत झाले आदिने प्रज्ञास इशारा केला… प्रज्ञाने पुस्तक घेतले आणि ती खाली बसली… प्रज्ञा ते उघडलेले पान वाचू लागली.. त्यातील न समजणारे संकेत ती स्वतःच्या बुकमध्ये पाहू लागली बराच वेळ गेला प्रज्ञाने पुस्तक बंद केले.. आणि ती बोलू लागली.. “आदित्य आपल्याला

कोणत्या कामासाठी तेथे जायचे आहे ” त्यावर आदित्य उत्तरला “तेथे एकजणाचा आत्मा जिवंतपणी अडकला आहे त्याचे नाव आहे “अनिरुद्ध” या पुस्तकात जे गुप्तधनाबद्द्ल लिहले आहे न! त्याच्यासाठी आणि आपल्या मित्रासाठी त्याने आपला बळी दिलाय, आणि त्यालाच माघारी आणायचे आहे आणि आपण नाही मी जाणार आहे

तेथे ” उम्म ठीक आहे .. पण आदित्य तेथे असंख्य द्रुष्ट आत्मे आहेत… भयंकर पिशाच प्रत्येक क्षणाक्षणास एका सजीव शरीराचे भुकेले आहेत.. त्यांना कोणत्याहि रीतीने तुझ्या शरीरात प्रवेश हवा असेल… तुला तुझ मन भक्कम ठेवावे लागेल.. पण त्यापूर्वी आपल्याला अनिरुद्धचे प्रेत हवे असेल त्या प्रेतास आपल्याला विधीनुसार त्या

प्रेताची गरज आहे …. गोविंद शांत बसून होता चुकून तो वरच्या मजल्यावर पाहत होता… जणू त्याला काहीतरी दिसत होते.. एक पांढऱ्या फ्रोकमध्ये भयंकर असा एक हिजडा तेथे उभा होता तो वरूनच गोविंदकडे पाहत हसत होता.. त्याचा पूर्ण चेहरा पांढरा होता…अतिभयान मोठे डोळे..ओठास रक्तागत लाल लाली .. त्याच्या

केसांचा अंबाडा होता.. आणि हातात मेणबत्ती घेऊन तो वरती पायऱ्याच्या शेवटच्या टोकास उभा होता…मेणबत्तीच्या उजेडात त्याचा चेहरा अजून भीतीदायक वाटत होता गोविंद थोडासा घाबरू लागला.. त्याचा हात थरथरत वरती उठला गेला…त्याचा श्वास वाढला होता…. तो हिजरा त्याचे दात इचकत.. हासू लागला होता… गोविंद

त्याचे रूप पाहून सुन्न झाला होता… त्याला घाम आला होता तरीही हिम्मत करून त्याने आपला हात उचलला.. सर्व बोलण्यात गुंग होते.. कि दिक्षाने त्याच्या कडे लक्ष दिले.. आणि थेट तिने एका झटक्यात आपली मान वळवून मागे वरती पाहिले… कि अचानकपणे तो हिजडा तेथून गायब झाला… आणि दिक्षाने गोविंदला पाहिले..

तिने त्याला विचारले.. “गोविंद हेय .. काय झाले ? काय पाहिलेस तू ….” गोविंद फक्त भीतीने त्या पायऱ्याकडे पाहत होता.. गोविंद थोडा बोलला दिक्षा मी तेथे काहीतरी पाहिले दिक्षा उत्तरली होय इथे अआहे काही तरी पण आपल्याला आपले मन भक्कम ठेवायचे आहे.. घाबरू नकोस.. त्यावर आदी त्यांना पाहून म्हणाला “काय

झाले ?” दिक्षा उत्तरली .. अरे गोविंद ने काही तरी पाहिले.. डोन्ट वरी गोविंद आपण त्यांच्या बंदोबस्ता साठी आहोत येथे… गोविंद सावरला … आदी परत सर्वांकडे वळला .. गाईज लेट्स स्टार्ट द गेम .. सर्व आपली कंबर खचून उठले.. रॉकीने आपले काही यंत्रसामग्री बाहेर काढली.. ज्यात काही ध्वनी यंत्र होते जे एका विविध

फ़्रिक़्वेन्सि ऐकण्यासाठी होत.. आणि एक थर्मल वीडीओ रेकॉर्डर ज्याने नकरात्मक शक्तींना पाहू शकता येत होते… प्रज्ञा सर्वाना सांगू लागली गाईज सर्वप्रथम आपल्याला अनिरुद्धचे प्रेत येथे आणव लागेल.. आदित्य म्हणाला होय ते खाली तळघरात सुनील ने ठेवले आहे… वरून त्या संपतच्या खोलीतून खाली जाण्यास रस्ता आहे

हम्म प्रज्ञा चष्मा ठीक करत उत्तरली .. रॉकी आदीजवळ आला… आणि त्याला म्हणाला … “बडी तुझ्या खांद्यावर हे थर्मल कॅमेरे लाव … एक मागे कंबरेस आणि एक खांद्यावर आणि हि घे टोर्च … शिना देखील येईल तुझ्याबरोबर…. ” आदित्य कंबरेस कॅमेरा फिट करीत ठीक आहे म्हणाला.. दिक्षा आदित्य जवळ आली .. “आदी

गोविंद ने वरती काही पाहिले आहे… जरा सांभाळून… तुझा चाबूक आणलास का इथे..” आदी उत्तरला .. नाही नाही आणला तो राहिला तेथेच सगळे घरीच राहिले अग ” दिक्षा त्याच्या खूप जवळ उभा होती… ती त्याला घट्ट आवळली .. टेक केअर आदी जरा सांभाळून “.. आदी आणि शिना तैयार झाले हातात उजेडासाठी टोर्च

घेऊन .. ते वरती गेले… रॉकी प्रज्ञा दिक्षा आणि गोविंद.. खालीच होते.. रॉकी कानास हेडफोन लावून मोनीटर वर पाहत होता.. आदीच्या पुढच्या मागच्या गोष्टी दिसत होत्या आणि आदीच्या मागे चलणारी शिना… ते हळू हळू संपतच्या खोली पर्यंत गेले… आणि त्या कपाटाच्या जवळ गेले… कि इकडे … थर्मल कॅमेर्याने आपला

कमाल दाखवत थेट खालील चौघांना तो हिजडा दिसला.. तो शिना आणि आदित्यच्या मागेच होता आदीच्या मागे लावलेल्या कॅमेऱ्याने तो दिसला… इकडे.. रॉकी आणि ते सर्व जन घाबरले.. त्यांना काहीच कळेना दिक्षा आदित्यला हाक मारणारच कि तेवढ्यात प्रज्ञाने तिला अडवलं नाही दिक्षा नको आदी ला हाक मारूस जर तू

त्याला हाक मारशील… तर ते जे काय आहे… ते आदित्यला सोडणार नाही गोविंद तिला दुजोरा देत म्हणाला ..”होय असले प्रेत… त्यांच्याकडे वळल्यास जीव घेतात शांत राहा आदी आणि शिनाला सवय आहे याची ते घेतील सांभाळून ” त्यांना तेव्हा आदित्यला आणि शीनास कसे बोलवावे.. शिनास जाणवू लागले कि त्यांच्या मागे

कोणीतरी उभे होत .. आदित्य त्या कपाटास बाजूला करत होता.. आणि ते कपाट बाजूला एका हलक्याश्या धक्क्याने बाजूला झाले.. आणि समोर होता तहखाण्याचा दरवाजा.. शीणाने मागे वळून पाहिलं .. कि अचानक तो हिजडा गायब झाला..पण शीनाने केलेली चूक तिला खूप महागात पडणारी होती .. आदित्य तिझ्याकडे पाहू

लागला.. शिना काय पाहतेय ? त्यावर शिना दचकली.. आणि म्हणाली काही नाही आदिभाई चल तू हायला भेटला का दरवाजा चल खाली .. आदिने तो दरवाजा उघडला.. आणि ते त्या गूढ अंधारातील पायऱ्यांनी खाली जाऊ लागले… ते खाली गेले तर तेथे .. सर्वत्र एक अंधार पसरला होता.. काही लाकडी खोकडे रिकामे पडले

होते… कारण सुनील यांनी ते धन काढले होते.. पण चुकून तेथे एक ठोकळा पडला असेल तो आदिने उचलला.. आदी हळू हळू पुढे सरसावला.. आणि एका लाकडी ताबुतास जाऊन धडकला त्याने हातातील… टोर्च मारून पाहिले ते अनिरुद्धचे प्रेत काचाच्या कबरीत होते.. आणि त्याच्या प्रेतास कोठे हि जखम नव्हती.,, चेहऱ्यावर

एक गौरवी तेज… अत्यंत शांत चेहरा पण मृत.. असे वाटत नव्हते असे वाटत होते तो झोपला आहे… आदिने शीनाच्या कॅमेऱ्यावर येऊन इशारा केला … कि आम्हाला प्रेत मिळाले आहे आम्ही येतोय… येथे खाली हॉलमध्ये सर्वाना आदित्यचा इशारा कळला .. आदी आणि शिना ते प्रेत घेऊन उचलून पायऱ्यानि वरी येऊ लागले..

वरती शेवटच्या पायऱ्यावर येताच शिना आणि आदी ने ते थकून प्रेत खाली टेकवले… शिना त्या पायऱ्यांच्या आतील बाजूस होती… हळू हळू इकडे चौघांना शीनाच्या पाठीवरील कॅमेऱ्यातून मोनिटर वर दिसले कि मागून काही तरी शिना कडे येत होते… आणि अचानक आदित्य ला देखील ते दिसले आदी ओरडणार इतक्यात मागून

तो हिजडा आला आणि त्याने त्याचक्षणी शीणाचा पाय धरून ओढला ,,,,…. आणि ते तिला खाली खेचू लागले .. कि सर्व जन धडधड पळत वरती आले .. पण खोलीचा दरवाजा बाहेरून बंद झाला होता… आदित्यने शीणाचा हात धरला होता…. आदी आपली सर्व ताकत लावून आदी तिला खेचत होता.. आणि इकडून ते हिजड्यांच

भूत होत… आदित्यने आपली सर्व ताकत लावली… पण तो शेवटी हरला… आणि त्या हीजड्याने शिणाचा निर्घृण रित्या… जीव घेतला.. आणि इकडे धक्के देत सर्व दार उघडून आतमध्ये आले…. आदित्यने एक जोरदार गर्जना करीत रागाने भिंतीवर हात आपटले… आता खरी सुरुवात झाली होती… आदित्य ने होईल तितक्या लवकर

आपले पाउल उचलण्याचे ठरवले…

शिनाच्या अश्या मृत्यूने सर्व हेलावले गेले होते. सर्वजण संपतच्या खोलीतच होते. आदित्य त्या दारावर हात आपटूआपटू थकला होता सर्वजन आपल्या एका खूपच जवळच्या साथीदारास गमावलेले दुखणे उराशी बाळगून हॉलमध्ये परतले दुख आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक घ्रुनात्म्क वृत्ती जागी झाली होती. सर्व आपल्या सोबतीच्या

दुखाने पेटून भडकले होते. आदित्य प्रज्ञाजवळ आला आणि म्हणाला “किती लवकर आपण तो विधी उरकू शकतो ? ” प्रज्ञा त्याच्याकडे निरभावाने पाहत म्हणाली “चल! मी आताच सुरुवात करते ” प्रज्ञाने गोविंद कडे पाहिले गोविंदने आपली थैली खोलली आणि त्यातून काही सामान बाहेर काढले प्रज्ञा त्या पुस्तकातील पुढील पाठ

वाचत होती. त्या पूजेसाठी लागणारे सर्वप्रथम आदित्यचे प्रेत तर त्यांनी आणल होत आदित्यने सर्वाना सूचना देण्याकरिता जवळ बोलवले “हे बघा गाईज.. यात अत्यंत धोका आहे आणि तो हिजडा अजून या बंगल्यात आहे तुम्हा सर्वाना खंबीर राहावे लागेल ते पिशाच आपल्याला नक्की अडवण्याचा प्रयत्न करील पण शिनासाठी आणि

अनिरुद्धसाठी हा विधी करायचाच आहे सर्वप्रथम आपल्याला हा हॉल सुरक्षित करावा लागेल जेणेकरून गोविंद आणि प्रज्ञास कसला अडथळा येणार नाही. ” सर्व उत्तरले ” ठीक आहे लागुयात कामास.” गोविंद पुढे आला आणि त्याने टेबल खुर्च्या सोफा सर्व बाजूला सारून एक जागा पूजेसाठी तैयार केली गोविंदने आपल्या मोठ्या

थैलीतून एक पात्र बाहेर काढले. प्रज्ञा त्या पुस्तकातून पाहून सांगू लागली..” गाईज आदित्य म्हणाला तसेच आहे यात आपल्याला हि जागा सुरक्षित करावी लागेल आणि त्याकरिता यात काहीतरी लिहले आहे कि या गोष्टीनी तुम्ही ती जागा सुरक्षित करू शकता आणि त्या आहेत “आब आसमा आग हवा जमि” यांनी सुरक्षित करावे

लागेल.. सर्व चपापले “आता हे काय आहे ?” दिक्षा सर्वांच्या आधी उत्तरली ” हे पंचमहाभूत आहेत ..” जगातील कुठलीच ताकत या ताक्तींसमोर टिकू नाही शकत ” ” होय दिक्षा म्हणतेय ते बरोबर आहे… आपल्याला पंचमहाभूताचा आधार घेऊन हे सुरक्षा कवच बनवावे लागेल..” प्रज्ञा म्हणाली पण ते आणायचे कसे? आदी

तिझ्याकडे पाहून हसला.. प्रज्ञाने आपला चष्मा नीट करीत नाक मुरडत त्याला विचारले “का हासतोयस रे ?” आदी म्हणाला आलोच मी थांबा..” आदित्य बाहेर गेला आणि त्याने बरीच माती आणली आदिने गोविंदला इशारा केला गोविंद ते समोरील पात्र आदिजवळ सरकावले आदिने हातातील माती त्यात टाकली गोविंदने काही मंत्र

म्हणण्यास सुरुवात केली कि त्या मातीचे रुपांतर एका उर्जेत झाले दिक्षाने पाण्याचे काही थेंब त्यात टाकले ..त्यांचे हि एका तश्याच एका उर्जेत रुपांतर झाले गोविंदने आपल्या थैलीतून.. एक कुपी बाहेर काढली तो उत्तरला .. “मी या गोष्टी नेहमी जवळ बाळगतो काय माहित यांची केव्हा गरज पडेल.. मी माझ्या बऱ्याच प्रयत्नांनी आग

हवा आणि आकाश यांची उर्जा यात सामावली आहे” गोविंदने ती कुपी उघडली आणि त्यात विविध रंगाच द्रव्य त्या पात्रात ओतल कि त्याचक्षणी त्या पात्रात एक विलक्षण गोष्ट तैयार झाली.. एक भुकटी होती ती चमकणारी… गोविंद उदगारला आदी.. हि या भुकटीने आपल्या सर्वांच्या भोवती एक रिंगन बनव आंनी मधोमध एक

पंचतारांकन आदित्य उठला आणि रॉकीहि त्याच्या मदतीस उठला.. दोघांनी मिळून ते रिंगण बनवले आणि ते पंच तारांकन.. प्रज्ञा सर्वांना म्हणाली.. गाईज आपल्या सर्वांना आपले मन सकारत्मक ठेवावे लागेल असे लिहलय यात आदी तुला त्या तेथे पोहचण्यास तुला या तारांकनात बसावे लागेल.. आणि आम्ही सर्व तूला घेरून या

पुस्तका प्रमाणे.. पुढील पाउल उचलू.. जेव्हा तू त्या दुनियेत पोहचशील तुला अश्या काही गोष्टीनवरून समजून येईल कि तू तेथे पोहचला आहेस ? त्यावर दिक्षा प्रज्ञाकडे पाहत म्हणाली कसल्या गोष्टी ? प्रज्ञा तिझ्याकडे आणि आदित्यकडे पाहत म्हणाली ” आदित्य तेथील सर्व गोष्टी उलट असतील… तूला तेथे पोहचल्यावर कळेलच

आणि आदित्य एक सर्वात महत्वाची गोष्ट जर तिथे तुला काही झाले ? तर इथे देखील तू जिवंत राहणार नाहीस” असे म्हणत प्रज्ञाने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला “टेक केअर आदी” दिक्षा आदित्य जवळ आली आणि एवढंच म्हणाली.. “मला माझा नवरा परत आलेला पहायचा आहे..” आदित्यने तिला एक जोरदार मिठीत आवळले

दिक्षाच्या डोळ्यात थोडे पाणी आले आणि आदी त्या रिंगणात जाऊन बसला सर्वजन आदिला घेरून होते आणि प्रज्ञा आदित्यचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याच्या पुढ्यात बसली होती गोविंदने अनिरुद्धचे प्रेतदेखील सुरक्षित केले होते सर्वांनी आपले हात एकमेकांच्या हातात दिले होते आणि त्यांनी आदित्य व प्रज्ञाला घेरले

होते प्रज्ञाचे रूप हळूहळू पालटू लागले होते वाऱ्याचे झोत संपूर्ण बंगल्यात शिरले होते… सर्वांच्या अंगावरून सरसरून काटा जात होता. कि अचानक प्रज्ञा बोलली तिझा आवाज जणू तिझा नव्हता प्रज्ञाचे ते भव्य रूप… पाहून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला होता.. प्रज्ञाचे डोळे पांढरे झाले होते… जणू डोळ्यात तीझ्या बुभळे

नव्हतीच,,… ती सर्वाना म्हणाली ..”काहीही झाले तरी कोणीसुद्धा आपले डोळे उघडायचे नाही न आपला हात सोडायचा ..” प्रज्ञाचा तो दुहेरी घोगरा आवाज ऐकून सर्व दचकले आणि सर्वांनी आपले डोळे मिटले.. त्या बंगल्यात पसरलेले ते वारे… सर्वत्र वातावरण बदलू लागले होते लावलेल्या सर्व मेणबत्त्या फडफडून विझण्याच्या

कागारीवर होत्या कि अचानकपणे एखाद्या दुधात माशी पडेल असाच तो हिजडा त्याचे तेथे आगमन झाले…. त्या पंचमहाभूताच्या .. सुरक्षेच्या रेखेस तो ओलांडू शकत नव्हता.. पण त्याची यावेळची शिकार होती ….. “दिक्षा?” ते दिक्षाच्या जवळ आले.. पण सुरक्षा रेखेच्या बाहेरच.. ते दिक्षाच्या मागे बसले .. आणि “दिक्षाह्ह्हह्ह्ह…….

दिक्षाह्ह्हह्ह्ह दिक्षाने तरी देखील आपले डोळे उघडले नाही ते पुढे बोलू लागले “…मी तुझ्या आदित्यला सोडणार नाही….मी न त्याचा जीव घेईन…हिहिहिहि…स्स्स्सस असे म्हणत ते विचित्र आवाजात हसु लागले .” दिक्षा खंबीर मनाची होती.. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले होते दिक्षाने त्या पिशाचास कसलाच प्रतिसाद दिला

नाही… ते आतोनात प्रयत्न करीत होत.. पण सर्व असफल.. शेवटी प्रज्ञा आदित्यला पाठवण्यात सार्थ झाली.. आदित्य आता त्या आत्म्यांच्या दुनियेत होता.. “आदी तू आता डोळे उघडू शकतोस ..” आदित्यने आपले डोळे उघडले.. आणि उघडता क्षणी आदित्यला प्रज्ञा दिसली.. आणि तीझ्या बाजूने बसलेले सर्वजन रॉकी, दिक्षा,

गोविंद पण ते फक्त आत्मे होते.. त्यांची जिवंत काया मानवी दुनियेत होती.. आदित्यचा गैरसमज झाला आणि तो ताडकन उठला व म्हणाला ..”हे काय प्रज्ञा मी तर आहे तिथेच आहे .. कुठ आहे आत्म्याची दुनिया.. ” पन प्रज्ञा काहीच बोलेना झाली होती..तिझे डोळे उघडे ते उघडेच होते आदित्यने आजू बाजूस पाहिले कि अचानक

त्याला धक्का बसला … कारण त्याच्या बाजूने … आजूबाजूच्या वातावरणात सर्वत्र एक निळसर काळोख पसरला होता… अचानकच प्रज्ञा बोलू लागली तिझा आवाज . जणू वाऱ्या सारखा घुमत आदित्यच्या कानात पोहोचत होता.. ती म्हणाली “आदी मी गेल्यास येथे एक .. काळा दरवाजा येईल.. तो तुला तुझ्या ध्येया पर्यंत

पोहचवेल…” प्रज्ञा तेवढ बोलून नाहीसी झाली.. आणि इकडे मानवीय दुनियेत प्रज्ञान आपले डोळे उघडले.. तेव्हा अचानक तो हिजडा भयंकर रुपात दिक्षाच्या जवळ होता… बाकीच्या सर्वांचे डोळे झाकले होते.. आणि आदित्यचे फक्त शरीरच येथे होते आणि आत्मा …. तिकडे प्रज्ञा आपल्या साध्या अवतारात परतली होती.. तिने त्या

पिशाची हिजड्यांचा तो भयान अवतार पाहिला होता… तरीही तिने काहीच शब्द न बोलता आपले डोळे मिटून घेतले.. त्या हिजड्या पिशाचास समजले कि आदित्य आत्म्याच्या दुनियेत पोहोचला आहे …इकडे आदित्य अजून धक्क्याने प्रज्ञा व इतर जणांकडे पाहत होता.. त्याने बाजूंच्या मेणबत्या पाहिल्या.. तिथल्याच पणत्यावर

देखील त्याची नजर गेली.. त्या सर्वांच्या जळणाऱ्या वाती या वरती नसून खालच्या दिशेने झुकल्या होत्या.. सर्व काही उलट दिसत होत.. अचानकच आदित्यच्या समोर एक काळा दरवाजा प्रकट होऊ लागला.. त्या दरवाज्यास रक्तामांसाने भरलेली कडी निर्माण..झाली आदित्यने तो दरवाजा उघडला.. आणि तो आत पाय ठेवणार कि

तेवढ्यात मागून कोणीतरी त्याला खेचून दूर हिबाळून दिले.. “हार्रर्ग्र्रर्र्र्र…आवाज करीत कोणीतरी आदित्यच्या समोर उभ होत, जणू कोणी रागाच्या भरात आदित्यला आत जाण्यापासून अडवल होत आणि तो खुद्द हिजडा ते पिशाच आदित्यला अडवण्यास आले होते. आदित्यने प्रथमच आपल्या जीवनात असे इतके भयंकर पिशाच

पाहिले होते.. इकडे प्रज्ञा आणि सर्वांनी डोळे उघडले होते. आदीचे शरीर ..इकडे तडफडू लागले.. दिक्षा आदित्यच्या जवळ आली पण प्रज्ञाने तिला उठू दिले नाही.. गोविंद आणि रॉकीने तिला धरून ठेवले होते. प्रज्ञा ने आपले डोळे झाकले.. प्रज्ञाचा आवाज जणू आदित्य पर्यंत पोहोचला.. आणि ती त्याला म्हणाली ..”आदि तुझा

आत्मा त्यांच्या दुनियेत आहे.. आणि तू पण त्यांच्या पैकीच एक आहेस.. तू सुद्धा त्या पिशाचा सारखाच ताकतवर आहेस..तो हि एक आत्मा आहे आणि तू पण.. तुझ्यात अधिक ताकत आहे आदित्य.. तू त्याच्यापेक्षा जास्त ताकतवर आहेस मार आदी त्याला .. मार आदी मार …इकडून प्रज्ञा आदित्यला त्याची शक्ती जाणवून देत होती..”

आदित्य रागाच्या भरात उठला .. आणि “याह्ह्हह्ह्ह…दूर हो माझ्यापासून” असे आदित्यने गर्जना…करीत त्या समोरील हिजड्याच्या पिशाचास आपल्या दोन्ही हातानी धक्का मारला आणि त्या धक्क्याने ते पिशाच्च अंधारात दूर उडून पडले… आता त्या दरवाज्याच्या आणि आदित्यच्या मध्ये कोणी नव्हते आदित्य ने तो दरवाजा

ढकलला “क्र्रर्र्र्र…कर्रर्रर्रर्र आवाज करीत दरवाजा उघडला… कि दरवाजा उघडताच क्षणी ” असंख्य वटवाघळे त्या दारातून बाहेर आले… आदिने डोके खाली झुकवून स्वतःला वाचवले.. आणि तो आतमध्ये गेला आतमध्ये जणू तोच बंगला आणि तोच हॉल सर्व काही.. सारखेच होते… आदित्यला पुन्हा प्रज्ञाचा आवाज ऐकू आला. “आदी

अनिरुद्ध खाली आहे तळघरात ..” आदी ठीक आहे म्हणणार तितक्यात आदित्यच्या समोरून एक पूर्णपणे नग्न वृद्ध व्यक्ती आला.. त्याच्या न भुवयांवर केस होते न त्याच्या डोक्यावर.. त्याच्या तोंडात दात नसून सुळे.होते.. त्याला पापण्यांना पण केस नव्हते.. त्याचे हात रक्तानी भरलेले होते.. आणि लांबलचक हाताची नखे.. ते

आदीच्या पुढ्यात केव्हा आले ते आदिला कळलेच नाही.. ते आदीच्या तोंडाजवळ आले आणि त्याने आदीचा वास घेण्यास सुरुवात केली…प्रज्ञा चा पुन्हा हळुवार आवाज आदिला आला.. आदी हलू नकोस तो काही करणार नाही तो जाईल निघून.. आणि तसेच झाले तो निघून गेला.. आदी हळूहळू पायऱ्या चढून वरती संपतच्या

खोलीकडे जाऊ लागला कि अचानक दोघातिघांनी मिळून आदित्यचा पाय ओढला आदि तोंडावरच आदळला आणि इकडे आदीच्या मानवीय शरीराच्या तोंडून रक्त वाहू लागले.. दीक्षा त्याला पाहून रडू लागली… पण प्रज्ञा ने तिला कसलेच उठू दिले नाही प्रज्ञा सतत एका मंत्राचा जाप करीत होती… इकडे आदित्यने खाली लक्ष

दिले..तर खाली विचित्र बुटके अत्यंत भयंकर चेहऱ्याचे भुते.. आदीचा पाय ओढत त्याला खाली आणत होते… त्यांना आदित्यच्या शरीरात प्रवेश हवा होता.. आदित्यच्या आत्म्यास नष्ट करून ते सर्व भुते आदित्यच्या शरीरात येऊ पाहत होते… आदिने त्यांचा प्रतिरोध करीत… त्यांना जोरदार लाथा घालत दूर केले.. आणि आदित्य धावत

वरती आला.. आणि संपतच्या खोलीपाशी आला आदिने दरवाजा उघडला… कि त्याचक्षणी ..”विचित्र आवाजात हसत त्याच्या मागून काहीतरी पळाले..”आं..हीइह्ह्ह्ह..” आदी त्या चीतकाराने अत्यंत बावरला पण त्याने आपले मन खंबीर आणि भक्कम ठेवले .. आता आदित्य त्या कपाटाच्या जवळ होता आदिने कपाट सरकवले ते

अलगदच सरकले गेले.. आदित्यकडे जणू असामन्य ताकत आली होती.. ते कपाट सरकताच .. आदित्यला समोर शिना दिसली तीच्या गळ्यावर जखमा होत्या.. ती आदित्यकडे हात करून आदित्यला हाक मारत होती तीझ्या डोळ्यातून रक्तांचे आश्रू वाहत होते… आदिने आपला हात तीझ्याकडे वाढवला…कि अचानक त्या

हिजड्याने शिनाला पूर्वीप्रमाणे ओढून घेतले.. आदित्यही यावेळी… तीझ्यासोबतच खाली पोहचला..आणि तो त्या तळघरात पोहचला… आदिने इकडे तिकडे पहिले सर्वत्र एक निळसर काळोख.. काही ठिकाणी रक्तमांस पडल होत.. एक विचित्र दुर्गंधी तेथे होती… आणि शेवाळी भिंती.. आदित्य थोडे पुढे जाणार कि त्याच्या समोर

एक तरुण एक तेजवान व्यक्ती उभा राहिला.. त्या व्यक्तीने… आदित्यकडे आणि आदित्यने त्याच्याकड पाहिले.. तो तरुण व्यक्ती थोडा अंधाऱ्या भागात होता.. आदित्यने थोडे पुढे होऊन विचारले.. कोण आहे ? तो संदिग्ध व्यक्ती अंधारातून बाहेर आला… आणि तो होता अनिरुद्ध.. त्याने थेट आदित्यवर वार केला… आणि

आदित्यला एक मुक्का मारत त्याला खालीपाडले अनिरुद्धच्या हातात एक साखळ दंड होता.. त्याने तो आपल्या हातात मुक्क्याच्या रुपात गुंडाळला आणि तो आदित्यवर अजून एकदा धावला. आदित्यने तो वर हि चुकवला.. आणि आदित्य ओरडला … अनिरुद्ध थांब मी पिशाच नाहीये… मी आदित्य आहे सुनीलचा मित्र… अनिरुद्ध

थांबला आणि थोडा चमकला.. त्याने आदित्यला पाहत त्याला उठण्यास हात दिला… आदित्य त्याच्या सहाऱ्याने उठला मागून कोणीतरी अनिरुद्धच्या पोटात एक धारदार शस्त्र घुसवले.. आदित्य ते पाहून थोडावेळ सुन्न झाला…. पण मागून ज्याने वार केला होता… तो होता खुद्द अनिरुद्ध .. आणि खाली पडले होते अनिरुद्धच्या रुपात

एक पिशाच.. खरा अनिरुद्ध आदित्य जवळ आला.. आणि म्हणाला …”या पिशाचाने माझ रूप घेऊन तुझ्या सोबत मानवी दुनियेत येण्याच प्रयोजन केल होत..” hello मी अनिरुद्ध ..आणि तुम्ही … आदित्य त्याच्या बोलण्याने भानावर आला… “आः ….म,,, मी आदित्य.. मला सुनील यांनी पाठवले आहे … म्हणजे सुनील ने ते

शेवटचे पान वाचलेच तर कि मी परत जिवंत होऊ शकतो ते… गुड ..” कि प्रज्ञाचा आवाज आदित्यला आला.. आदित्य वेळ खूप कमी राहिला आहे… त्या दरवाज्यातून आत्मालोकातील पिशाच आपल्या दुनियेत येऊ पाहतायत तुम्हाला काही करून तेथून इकडे यावे लागेल लवकर घाई करा… आदित्य आणि अनिरुद्ध धावत वरती

आले .. आणि दारापर्यंत पोहोचताच तेथे दारावरच तो हिजडा ते भयंकर पिशाच त्या दोघांना अडवण्यास उभे होते… इकडे अतिभयानक वादळ सुटू लागले होते.. त्या पिशाचाने स्वतः तो दरवाजा उघडला… पण त्या दरवाज्यात असंख्य प्रेत मानवी दुनियेत जाऊ लागले.. आदी अनिरुद्धला म्हणाला अनिरुद्ध आपल्याला काहीही

करून यांना अडवावे लागेल…. जर हे आपल्या जगात आले तर अनर्थ होईल अनिरुद्ध म्हणाला झाड मुळासकट उखडाव लागते आदि… घाव घालायचा तर त्या हिजड्यावर असे म्हणतच अनिरुद्धने आदित्यकडे पाहिले… दोघांनी एकमेकांना इशारा केला… आणि त्याचक्षणी ते दोघे हि त्या पिशाच हिजड्यावर धावले… तरी त्या

हिजड्याने दोघांना दूर हिबाळून दिले… यावेळी प्रज्ञाने आपल्या मंत्रांचा जाप बंद केला होता आणि ती ते दार बंद करण्याचे मंत्र म्हणू लागली जेणे करून ते आत्मे मानवी दुनियेत येणार नाहीत .. अनिरुद्ध व आदिची शक्ती कमी झाली होती.. तरी हि ते दोघे प्राण पणाला लावून लढत होते… आदी दूर जाऊन पडला गेला.. ते प्रेत

विचित्र किंचाळत हसत अनिरुद्ध चा गळा आवळत होते… आदित्य तडफडत पडला होता … अनिरुद्ध मृत्युच्या तोंडात अडकला होता.. आणि ते द्वार देखील बंद होत होते आदित्य मनात देवाचा धावा करीत होता… कि अचानक .. आदित्यच्या बाजूस एक विभिन्न रुपी अवजार पडलेले आदित्यला दिसले…आदित्यच्या लक्षात आले

कि ते तेच अवजार होते ज्याबद्दल पुस्तकात सांगण्यात आले होते कि यानेच त्या पिशाचाचा नाश होईल आदित्य उठला आणि धावत जाऊन त्याने त्या अवजाराने त्या प्रेतावर वार केला.. कि त्याच क्षणी एक लक्ख प्रकाश सर्वत्र पसरला गेला. सर्व पिशाच नाहीसे झाले तो हिजडा अत्यंत भयंकर रीतीने जळू लागला होता… तेथे त्या

पिशाचाने एक मोठा चित्कार करत स्वतःचे शरीर फोडून घेतले… पण यावेळी उशीर झाला होता.. ते द्वार बंद झाले होते.. त्या दाराच्या पलीकडे दिक्षा प्रज्ञा रॉकी आणि गोविंद आदित्यची वाट पाहत होते.. त्यांना हि कळून चुकले होते कि आता ते शक्य नाही प्रज्ञा स्वतःच्या चुकीने पश्चाताप करून घेत होती दिक्षा तिला पुन्हा ते दार

उघडण्याचा आग्रह करीत होती.. पण ते आता अशक्य होत आणि अनिरुद्ध व आदित्य इकडे अडकून होते.. आदित्य व अनिरुद्धने देखील आता धीर खचून गुडघे टेकले होते ते हतबल होते.. कि अचानक सर्वत्र एक लक्ख दिव्य प्रकाश पडला आणि तो दरवाजा आपोआप उघडला गेला.. इकडे अचानक आदित्यच्या शरीरात

आणि अनिरुद्च्या शरीराने हालचाल चालू केली… आदी आणि अनिरुद्ध उठले व त्यांनी पहिले कि दरवाजा उघडला होता ..पन कसा ? आदित्यने मागून येणाऱ्या प्रकाशात पाहिले तेथे खुद्द सूर्यभान मंडलक उभे होते त्यांनीच आदित्य साठी व अनिरुद्धसत्हो तो दरवाजा उघडला होता… आदित्य त्यांचे आभार मानत अनिरुद्धला

घेऊन मानवी दुनियेत परतला … कि त्याच वेळी अनिरुद्ध आणि आदित्य.. हे दोघे जिवंत झाले… अनिरुद्धआणि आदित्यला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटाच उमजली… दीक्षा आदित्यला माघारी पाहून थेट पळत त्याच्याशी बिलगली… व रडत रडत त्याच्या चेहऱ्यावर चुंबने घेऊ लागली… आणि परत अजून धाई मोकळत ती

आदित्यला बिलगली,,,… सर्वांनी आदित्यचा जल्लोष केला … आदित्यने ती बातमी सुनीलला कळवली सुनील देखील ताबडतोब तेथून आपल्या मित्रास भेटण्यासाठी परत येऊ लागला .. आणि अश्या रीतीने रहस्यभेदाचा अंत झाला.

. . .