खुनी कोण? - भाग दुसरा
फिनिक्स Updated: 15 April 2021 07:30 IST

खुनी कोण? - भाग दुसरा : जुलिया वालेसची केस

जगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही  अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला दुसरा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे.

द केस ऑफ जॉन बेनेट रॅमसे   ज्युली वॉर्ड

जुलिया वालेस ही विलियम्स हेर्बेर्ट वालेस याची पत्नी होती. २० जानेवारी १९३१ रोजी मंगळवारी ती मृत आढळली. याच वर्षी तिच्या पतीला तिच्या खुनासाठी पोलिसांनी जेरबंद केले होते. नंतर त्याच्यावरील गुन्हेगारी केस फौजदारी अपील कोर्टाने फेटाळून लावली. इंग्लंडच्या इतिहासात दोन कारणांमुळेच हे प्रकरण ओळखले जाते. पहिले कारण असे कि, ब्रिटिश कायद्याच्या इतिहासातील हे पहिले प्रकरण होते ज्यात, पुराव्यांची पुन्हा तपासणी झाल्यानंतर अपील मंजूर करण्यात आले. दुसरे कारण असे कि, ही केस अजिंक्य आहे असे तत्कालीन वकिलांनी सांगितले होते. ज्युलियाच्या हत्येच्या आदल्या रात्री लिव्हरपूल चेस क्लबमध्ये तिचा नवरा खेळ खेळत होता. त्याने तिचा निरोप घेतला. विल्यम आपला ठरलेला वेळी पोहोचण्याच्या २५ मिनिटांपूर्वी हा संदेश दूरध्वनीवरून घेण्यात आला होता. त्या निरोपामध्ये विल्यमला मंगळवारी, २० जानेवारी रोजी, रात्री साडे सात वाजता २५ मेनलोव्ह गार्डन ईस्ट, लिव्हरपूल येथे जाण्यास सांगितले होते. ही भेट विम्याबद्दल  आर. एम. क्वालिट्रू यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी होणार होती. दुसर्‍या संध्याकाळी विल्यम निरोपात सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणाकडे जाऊ लागला. जेव्हा तो गंतव्यस्थानाजवळ पोहोचला तेव्हा विल्यमला आढळले की मेनलोव्ह गार्डन ईस्ट या नावाचे तिथे काहीही नाही. विल्यमने तिथे गस्त घालणारे पोलिस अधिकारी आणि जवळच बसलेल्या वृत्तपत्रांच्या दुकानाचा मालकलाही पत्ता विचारला. कोणीही त्याला तो पत्ता शोधून देण्यास मदत करू शकले नाही. विल्यमने २५ मेनलोव्ह गार्डन वेस्टवरुन फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विल्यमने आपल्या घरी परत येण्यापूर्वी, पंचेचाळीस मिनिटे या भागात शोध घेत होता. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा विल्यम त्याच्या शेजाऱ्यांच्या मागुन पळत त्यांना गाठायला गेला.ते कुठेतरी बाहेर जायला निघाले होते. विल्यमने त्यांना गल्लीत गाठले आणि सांगितले की, तो आपल्या घराच्या समोरच्या किंवा मागच्या प्रवेशद्वारातून आत जाऊ शकत नाहीये.

जे काही दृश्य त्यांनी पुढे पहिले ते त्याचे शेजारी आणि विलियम्स पाहतच राहिले होते. विल्यमने पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो मागच्या दराने आत जाण्यास सफल झाला तो आणि त्याचे शेजारी समोरच्या खोलीत आले होते तेंव्हा त्यांनी विलीयम्सची बायको ज्युलीयाला खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ती मरेपर्यंत तिची मारहाण केल्याचे दिसले. दोन आठवड्यानंतर पोलिसांनी ज्युलीयाच्या खुनासाठी विलियम्सला अटक केली. पोलिसांनी केलेल्या अपीलमधील पुराव्यांच्या पुन्हा तपासणीनंतर विल्यमला निर्दोष मुक्त करण्यात आले. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, ज्युलियाच्या मृत्यूसाठी आजपर्यंत कोणालाही जबाबदार धरले गेले नाही.

. . .