भूत कथा
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

भूत कथा : अनुभव (भयकथा)

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

कथा १   मळवट भरलेली ओली बाळंतीण

या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे.

मी त्या वेळी अग्री डिप्लोमा साठी गिरवी येथे शिकत होतो. सकाळी 9 वाजता 10-11 किमी सायकल वरून तालुक्याच्या ठिकाणी जायचो. व तेथून बसने कॉलेज वर. 5 वाजता कॉलेज सुटल्यावर 7 वाजेपर्यंत घरी. तसा हा प्रवास रोजचाच.

कॉलेजमध्ये आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे एकदम आगाऊ कारटी होतो. नेहमी पैजा लावणे व एखाद्याला सर्वांचे बिल भरायला लावणे. असे आमचे उदयोग. तिथल्या सरांना त्रास देणे वगैरे रोजचेच.

एकदा असाच मित्रांबरोबर बसलेलो असताना पैज लागली की बघू कोण आज ऊशीरा पर्यंत कोण थांबतय. सर्वजन थांबले खरे पण हळू हळू एक एक जन काढता पाय घेऊ लागला. मग शेवटी मी आणि अजून तिघे जन उरलो. मग शेवटी आम्ही पण म्हंटलं चला आता निघायला हवे 7 वाजत आले होते.पावसल्याचे दिवस होते व आभाळ ही भरून आले होते.

पूर्ण अंधार पडला होता. मग तेथून मी मित्राच्याच गाडीवर स्टँड पर्यंत आलो सायकल घेतली. व घराकडे निघालो पण पाऊस सुरू झाला होता. पण अजून थांबून जमनार नव्हते. त्यावेळी मोबाइल ही नव्हता माझ्याकडे त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. घरी येताना रस्त्यात खूप दाट झाडी होती. मी भर पाऊसात सायकल चालवत होतो. मी ज्यावेळी त्या दाट झाडीत आलो व अचानक वीज कडाडली व माझ्यासमोर तीन बायका चालत येताना दिसल्या.रंगाने खूप गोर्याच होत्या त्या एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या असतील असा विचार येऊन गेला मनात, पण जस जसे मी जवळ जाऊ लागलो तसे एका बाईने माझ्या थोबाडीत मारण्यासाठि हात उचलला पण मी तो हुकवला व पुढे जाऊन मागे बघण्यासाठी थांबलो तर मागे कुणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो. व जास्त वेळ तिथे न थांबता तडक घरी निघून आलो. घरी येईपर्यंत 8:30 वाजले घरी आल्यावर घरच्यांची खूप बोलणी बसली. म्हणून काही सांगितले ही नाही की काय घडले माझ्या सोबत, मग तसच जेवण केल व झोपलो. सकाळी जाग आली ती खूप उशिरा जरा ताप ही वाटत होता अंगात. हळू हळू ताप जास्तच वाढू लागला. मग संध्याकाळी दवाखान्यात वडलांबरोबर गेलो व गोळ्या इंजेक्शन दिले. घरी आलो पण ताप कमी झाला नाही. रात्री जरा उठलो व बाहेर आलो जरा अंगणाच्या पुढे जाऊन थांबलो तर समोरच्या रानात कोणीतरी उभे असलेले दिसले पण मनात म्हणले की पानी चालू असेल रानात व परत येऊन झोपलो. पण पावसाळ्यात कशाला पाण्याची गरज नसते हे नंतर लक्षात आले. सकाळपर्यंत ताप खूप वाढला होता. वडील तर खूप शिव्या द्यायचचे की कधीच आजारी न पडणारा पोरगा एवढा कस काय आजारी पडला. डॉक्टरांचा ही काही फरक पडत नव्हता. मग शेवटी आई च्या सांगण्यावरून वडील गावातील एका जुन्या जाणकार बाईकडे गेले. ती बाई सर्वांचे सांगायची तसे वडील तिज्याकडे गेले व सांगितले की दोन दिवस आजारी पडलाय मूलगा डॉक्टर कडे पण न्हेलता पण काही फरक पडला नाही. मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी त्यासाठी 21 कडधान्याचा पुतळा करून वाहत्या पाण्यात सोडून द्या.

त्यानंतर वडील घरी आले व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.जसा पुतळा सोडला तस त्यांना पाण्यात एक लहान मुलगा दिसल्याचा भास झाला. व ते तिथून लगेच माघारी फिरले व घरी आले. मग माझा ताप हळू हळू कमी झाला. व मी त्यानंतर बरा झालो. मग त्यानंतर मी कधी जास्त उशिर केला नाही घरी यायला.

..............समाप्त........

Submitted by prasad inamke

. . .