संकलित
Updated: 15 April 2021 07:30 IST
भुतांचे स्वानुभव (Horror Experiences) : जोसेफिना आणि जेनचे किडनॅप
भुतांचे स्वानुभव. Real horror experiences in marathi that were sent to us by our readers.
गोष्ट १९८७ सालची आहे. आम्ही एक नवीन बिल्डिंग बांधायला घेतली होती. पोलीस ठाण्याच्या पुढेच होती. कंत्राटदार केरळी नायर होता आणि बहुतेक कामगार ओरिसा मधील होते. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच जोसेफिना ह्या ख्रिस्ती महिलेचे घर होते आणि तिला जेन नावाची एक सुमारे १५ वर्षांची मुलगी होती. जोसेफिनाचा पती दुबई मध्ये कमला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. जोसेफिना अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि जेन वर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणून सर्वाना ठाऊक होती.
एक दिवस मी साईट वर परीक्षण करण्यासाठी गेलो असताना पोलीस स्थानका पुढे गोंधळ दिसला. जोसेफिना आणि ख्रिस्ती समुदायातील खूप लोक आणि पाद्री सुद्धा हजर होता. पोलीस माझ्या ओळखीचे होते. मी जाऊन चौकशी केली तर वातावरण फारच तापलेले होते. जेन गायब होती. तिला कुणी तरी उचलून नेले आहे असे जोसेफिना हिचे म्हणणे होते आणि हे काम माझ्या साईट वर काम करणाऱ्या कामगारांचे आहे असे लोकांचे म्हणणे होते.
मी तात्काळ सर्व कामगार आणि कंत्राटदारांना बोलावून संपूर्ण हजेरी घेतली. सर्वजण हजर होते. पोलिसांनी खडसावून, धमकावून सर्व काही पहिले पण जेन ची माहिती कुणालाच नव्हती. पोलिसांनी संपूर्ण साईट, तंबू इत्यादींची तपासणी सुद्धा केली. आजूबाजूचे संपूर्ण जंगल, विहिरी तपासल्या. पण जेनचा पत्ता नाही.
मी माझ्या ऑफिस मध्ये कामात होतो. जेनची काहीही माहिती कुणी दिल्यास मी ३ हजार रुपयांचे रोख बक्षीस देईन आणि नाव पूर्णपणे गुप्त ठेवीन असे मी कामगारांना गाठून सांगितले. त्या काली ३ हजार रुपयांना फार किंमत होती. कामगार लोकां वर मला अजिबात विश्वास नव्हता. जेन कुठल्याही परिस्तिथीत सापडायला पाहिजे असेच मला वाटत होते.
हळू हळू ६ महिने निघून गेले. जेन सापडली नाही. पोलिसांनी अथक परिश्रम घेतली पण कस्पटा इतका सुद्धा धागा दोरा हाती लागला नाही. आमचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण होत येऊन आता नेहमीच्या कामगारांच्या जागी टाईल्स वाले वगैरे येऊन काम करू लागले. जोसेफिना जवळ जवळ वेडी झाली होती. तिला नको नको ते भास व्हायचे. ती बाहेर कुठे जात नसे. ओरिसाच्या कामगारांचा शेवटचा जत्था आता साईट वरून जाणार होता आणि त्यांची जागा दुसरे कामगार घेणार होते. माझी स्कुटर स्टार्ट मारून जाणार होतो इतक्यांत एक महिला कामगार जवळ आली. तिच्याबरोबर आणखीन एक म्हातारा होता. ती जे सांगतेय ते हा हिंदी मधून मला भाषांतर करून सांगत होता.
तर ९ वर्षं आधी आमच्या बाजूंची बिल्डिंग बांधली गेली होती. तेंव्हा सुद्धा आपला नायर कंत्राटदार तिथे होता. तेंव्हा तो जुनिअर होता आणि त्याच्या हाताखाली हि महिला कामाला होती. तर म्हणे तिचा ५ वर्षांचा मुलगा त्या वेळी गायब झाला होता. त्यावेळी कामगार मेले तरी सुद्धा कुणी लक्ष देत नसत मुलगा गायब झाला म्हणून तिला रडायला सुद्धा वेळ नव्हता. पण त्या पुढे तिने जे काही सांगितले ते ऐकून माझ्या भुवया वर गेल्या. तिच्या मते तिने ३ दिवस आधी आपल्या मूलाला (जो आता १४ वर्षांचा होता) त्याला बाजारांत पहिले होते. हि बाई दारू पिट असते आणि काहीही बरळते असे त्या म्हाताऱ्याने मला बाजूला नेवून सांगितले. मी तिला ४ दिवसांचे पैसे दिले आणि साईटवरच थांबायला सांगितले. नायरवर मला थोडा संशय आला. ह्या बाईला बाजारांत जाऊन लक्ष ठेवायला संगतीवाले आणि जर तिला आपला मुलगा दिसला तर तेथील ड्युटीवर असणाऱ्या शिपाईला त्याला पकडायला सांग असे सांगितले. पोलिसांना मी आधीच माहिती दिली होती पण जेन च्या केस शी काही संबंध आहे असे सांगितले नव्हते. त्यांना वाटले चोरीमारी करून गेला असेल हा मुलगा.
जोसेफिनाची आणि माझी विशेष ओळख नव्हती. ती आमच्या घरी नारळ विकत घ्यायला यायची. पण त्या संध्याकाळी मी घरी गेलो तेंव्हा जोसेफिना माझ्या घरी येऊन बसली होती. माझी पत्नी आणि आई तिथे चिंताग्रस्त चेहरा करून बसल्या होत्या. जोसेफिना इतके दिवस बाहेर कुठेही न दिसल्याने ती माझ्या घरी दिसणे आश्चर्य होते. मी चौकशी केली. जोसेफिनाने सविस्तर कारण सांगितले. जेन गेल्यापासून ती अतिशय अस्वस्थ होती. डॉक्टरांनी तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या पण त्याने काहीही फरक पडला नव्हता. तिला जेनीचा भास व्हायचा. जेनी कुठे तरी जिवंत आहे असे दिसायचे. जेनी बोलायचं प्रयत्न करत आहे पण तिचे शब्द आपल्याकडे पोचत नाहीत असे वाटायचे.
मी सर्व शांतपणे ऐकून घेतले. प्रचंड चिंतेच्या खाली असणाऱ्या माणसांना असे भास होणे स्वाभाविक होतेच त्यामुळे मला त्यांत नवल वाटले नाही. जोसेफिना इथे का येऊन हे सर्व काही सांगत आहे हे मला ऐकायचे होते. जेन कुठे आहे तिथे मला एक बोर्ड दिसतो. बोर्डवर एका बांधकाम कंपनीचे अर्धवट नाव दिसते. जोसेफिना सांगत होती. जोसेफिना माझ्यावर आळ टाकायला बघत आहे असे वाटून माझी आई आणि पत्नी संतापली पण मी त्यांना शांत केले. अश्या वेळी दुसऱ्या माणसाला सहानुभूतीची गरज असते आणि बांधकाम क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना तर सर्वाकडे चांगले संबंध ठेवावेच लागतात. उद्या ख्रिस्ती मंडळींनी जर काम अडवले तर लक्षावधींचे नुकसान होऊ शकते म्हणून मी तिला पुढे बोलायला दिले.
तिच्या मते बांधकाम कंपनीचा बोर्ड माझ्या कंपनीचा नव्हता पण त्याच धाटणीचा होता बोर्ड जुना होऊन गंजला होता. तिच्या मते पोलीस असल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत पण मी आपल्या कामगारांना ३ हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे हे तिने ऐकले होते. किमान त्या जुन्या बोर्डची माहिती मिळाली तर जेन चा काही पत्ता लागू शकतो असे तिचे म्हणणे होते.
मी १००% नास्तिक. भुतेखेते ह्यांची मला भीती शून्य. मी आत्महत्या केलेली घरे, खून झालेले बंगले वगैरे आनंदाने खर्च करून विकायचो. समंध असलेल्या जमिनी मी विकत घ्यायचो त्यामुळे जोसेफिनाच्या भाकड्कथानवर विश्वास ठेवायचा प्रश्नच नव्हता पण माझ्या संशयाची सुई नायरवर होती. मी माझ्या पद्धतीने नायरची चौकशी केली. त्या ९ वर्षे जुन्या बांधकामची चौकशी करणे सोपे होते. माझ्याच एक मित्राने ती विकत घेतली होती. कंपनीचे नाव साईकृपा construction ते होते. एका गुजराती व्यापार्याची कंपनी होती आणि नायर चा साडू त्याचा कंत्राटदार होता. नायर त्याच्या हाताखाली काम करत होता. मी त्या गुजराती माणसाचा फोन सुद्धा मिळवला, त्याकाळी डिरेक्टरी वगैरे असायची. त्याने मोठ्या अगत्याने घरी बोलावले. त्याने बांधकाम व्यवसाय कधीच सोडला होता पण नायरची त्याला पक्की आठवण होती. नायर कामाला चोख आणि प्रामाणिक होता असे त्याचे मत होते. बोलण्याच्या ओघांत त्याने शहराच्या टोकाला आपले एक भंगाराचे यार्ड होते आणि ते अजून बंद आहे असे सांगितले. मी ती संधी साधून मला सुद्धा बिल्डिंग चे जुनाट सामान तात्पुरते ठेवायला एक भंगार पाहिजे होते तुम्ही विकायला तयार आहात का असा प्रश्न केला. गुज्जू भाईने थोडा विचार केला आणि मला विश्वासात घेऊन सांगितले कि जमीन प्रत्यक्षांत सरकारी मालकीची आहे. योग्य व्यक्तींना पैसे खाऊन त्याला ती वापरायला मिळत होती पण मागील १० वर्षे ती बंद आहे. पाहिजे तर आपण आपले जुनाट सामान तिथे टाकू शकता म्हणून त्याने असिस्टंट ला बोलावून मला चावी सुद्धा दिली.
मी चावी घेऊन सरळ त्या महिला कामगारांकडे गेलो. तिला गाडीत घालून मी भंगार खान्याकडे नेले. तिला तिचे बाहेर गुपचूप लपून बसायला सांगितले. संध्याकाळी पुन्हा तिला घ्यायला गेलो. तिने आपण आपल्या १४ वर्षांच्या मुलाला पहिले आहे असे सांगितले. गुज्जू ने मला विश्वासपूर्वक चावी दिली होती, मी जर आंत पोलिसांना घेऊन गेलो असतो तर विनाकारण बाजारांत माझे नाव खराब झाले असते. म्हणून मी पोलीस ऑफिसरला घरीच बोलावले. त्याला सविस्तर माहिती दिली.
९ वर्षां पूर्वी जो एक कामगाराचा मुलगा नाहीसा झाला आणि आता जेन नाहीशी झाली ह्यांचा संबंध आहे. आणि तो मुलगा तिथे भंगार यार्ड मध्ये राहतो. आपण तिथे जाऊन गुपचूप पाळत ठेवली पाहिजे आणि त्या मुलाला पकडले पाहिजे आणि हे सर्व वॉरंट वगैरे घेऊन बोभाटा ना करता केले पाहिजे असे मी त्या इन्स्पेक्टरला पटवून दिले. त्याने नाइलाजांचे का होईना पण होकार दिला कारण ह्या केस वर काहीही प्रगती ना झाल्याने ख्रिस्ती समुदायाचा त्याच्यावर दबाव वाढत होता.
आमच्या कंपनीत अनेक पेहलवान मंडळी पगारावर होती. घर खाली करणे, भाडे वसुली, पैसे वसूल इत्यादी त्यांची कामे होती. अश्याच दोघा जणांना घेऊन मी आणि तो पोलीस गुपचूप त्या भंगार यार्ड मध्ये पोचले. हळू हळू आम्ही प्रत्येक कोपरा शोधला. इतर हवालदार मंडळींनी बाहेरून नजर ठेवली होती. अत्यंत शोधाशोध करून सुद्धा आम्हाला काहीही हाती लागले नाही. निराशेने आम्ही परतलो. पोलिसांच्या मते सर्व भंगार दिवस उजेडी उलटे पालथे करून शोधायचे असेल तर वॉरंट काढावे लागेल किंवा मालका कडून परमिशन. मी त्याला वेळ वाया घातला असे म्हणून पोलिसाने काढता पाय घेतला.
मी घरी गेलो. मी जोसेफिनाला फोन केला तिच्या मते जेन कडे वेळ फार कमी होता. तो बोर्ड अजून बाजूला दिसत होता. मी तिला आणखीन काही दिसत आहे का से विचारले. तिला गुलाबी रंगाचा एक मोठा पडदा दिसत होता अर्धा बोर्ड त्यानेच झाकला गेला होता. माझी ट्यूब पेटली. एक दशक आधी ते गुलाबी पडते बांधकाम जाग्यावर फार वापरत होते एका जर्मन कंपनीने बनवले होते. बहुतेक वेळा रेती मिक्स करण्यापासून वर स्लॅब टाकण्यापर्यंत सगळीकडे त्यांची गरज हि असायची त्यामुळे बांधकाम संपल्यानंतर सगळ्यांत शेवटी जे सामान बाहेर काढले जाते त्यांत त्यांचा समावेश असायचा. त्यामुळे पडदा आणि तो बोर्ड बरोबर आहे ह्याचा अर्थ तो पडदा बोर्ड आणि इतर सामान जिथे ठेवले आहे तिथे जेन असण्याची शक्यता होती. मला असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण बांधकाम व्यवसायाची जराही माहीत नसलेल्या जोसेफिनाला तो पिंक पडदा दिसावा ह्याचे आश्चर्य होते.
नायरवर माझा अजून संशय होता पण मी काय केले तर साईट वर थोडे भंगार सामान होते. ते ट्रक मध्ये टाकले बरोबर नायरला घेतला आणि त्याला "एक नवीन जागा सापडली आहे बघ" म्हणून सरळ भंगारखान्याकडे गेलो. तिथे नेवून नायरची काय प्रतिक्रिया आहे हे पाहायचे होते. पण नायरने वेगळीच प्रतिकीर्या दिली. अरे हि तर आपल्या गुज्जू साहेबांची जागा. मी आलोय ना इथे. असे म्हणून त्याने आपण आधी इथेच जुनाट सामान टाकत असू असे सांगतले. मी सुद्धा चतुराईने "हो का ? " म्हणून वेड पांघरले.
"अरे मग मला एक सांग खूप मागे ते गुलाबी रंगाचे जर्मन झाकण्याचे पडदे येत होते, तसले पडदे वगैरे तू कधी भंगारात टाकले आहेस का ? मला ते पाहिजे होते. " असे त्याला विचारले. नायरला आठवण होती. हो ना कितीतरी. साईकृपाने ४० तसले पडदे मागवले होते. मी बघतो इथेच असतील. नायरने काहीच मिनिटांत एका ठिकाणी ते स्थान शोधून काढले. एक जुनाट बस तिथे होती त्याच्या वर पडदा टाकला होता. "साई कृपा construction" चा बोर्ड खाली पडला होता. त्याने तो गुलाबी पडदा ओढून काढला आणि मी त्या बस मध्ये आंत डोकावून पहिले.आंत इतर ठिकाणी प्रमाणे धुराळा नव्हता. सीट्स काढून एका बाजूला ठेवली होती. जमिनीवर थोडे रक्त होते. नाईलोनच्या दोर्यांचे तुकडे, खाण्याचे सामान, पाण्याच्या बाटल्या असे खूप काही पडले होते. "येत असतील कुणी तरी तिचे ड्रग्स वगैरे घ्यायला" असे नायरने ते पाहून म्हटले.
मी गुज्जू भाईना फोन करून पोलिसांना बोलावण्याची परमिशन घेतली. मूळ कारण सांगितले नाही. पोलिसांनी रक्ताचे सॅम्पल नेले. त्याकाळी DNA वगैरे नसला तरी ते रक्त मासिक पाळीचे रक्त होते आणि त्याचा ब्लडग्रुप जेनच्या ग्रुप चा होता के स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या कामगाराच्या महिलेला धरून तिच्याम उलाचा शोध घेण्याचे आरंभले. त्याचे स्केच वगैरे बनवले गेले. तरुणांनी शहर पिंजून काढले. एक केमिस्ट वाल्याने त्याला ओळखले. मुलगा स्पष्ट मराठी बोलत होता आणि स्त्री आरोग्याचे सामान घेऊन गेला असे सांगितले. पोलिसांकडे आता थोडा तरी पुरावा असल्याने सगळी सिस्टम कामाला लावली गेली. मी त्या भंगारखान्यात का गेलो हे मला आणि मुख्य पोलीस ऑफिसरला सोडून कुणालाही ठाऊक नव्हते.
१४ तासांत तो मुलगा सापडला. त्याच्याकडे सुमारे ९ हजार रुपये होते. पोलिसांनी त्या १४ वर्षांच्या मुलाला इतके बदडले तरी जेन विषयी त्याच्या तोंडून काहीही शब्द आला नाही. काही थोरल्या लोकांनी, ख्रिस्ती पाद्र्याने, त्याच्या आईने सर्वानी त्याच्याशी बोलायचं प्रयत्न केला पण त्याने आपल्या आईला सुद्धा ओळखायला नकार दिला.
जोसेफिनाने मला पुन्हा फोन केला ह्यावेळी तिने माझे आभार मानले पण जेनपाशी जास्त वेळ नाही असे सांगितले. जेन कुठल्या तरी अंधारात रडत आहे. तिच्या नखांचे रक्ताळले ओरखडे एका मेटल भिंतीवर अस्पष्ट दिसत आहेत. तिथे प्रचंड गरमी आहे आणि कोंबड्यांचा आवाज येत आहे असे भास आपल्याला होत आहेत असे सांगितले.
मी पोलिसांना हि माहिती दिली. पोलिसांनी खोटेच पुरावे मांडले कि पकडलेल्या मुलाच्या अंगावर कोंबडीची पिसे सापडली होती म्हणून आम्ही सर्व पोर्त्री फार्म्स वर एकाच वेळी धाड मारतोय असे भासवले. शेजारील शहरांतून आणखीन पोलीस मागवले. त्याशिवाय आजूबाजूच्या शहरांत सुद्धा जिथे कोंबड्यांचा व्यवसाय होता तिथे धाड मारली गेली. अंधारी जागा म्हणजे तळघर सुद्धा असू शकते म्हणून पोलिसांनी अगदी जमीन सुद्धा तपासून पहिली.
जेन सापडली पण आमच्या शहरांत नाही, बाजूच्या एका गावांत. तिथे एक माणूस आपल्या शेतांत कोंबड्या आणि शेळ्या पोसत होता. कोंबड्या अंड्यासाठी ठेवल्या होत्या. तेथील पोलीस ठाण्याच्या कक्षेंत एकही पोल्ट्री नव्हती म्हणून रिकामटेकड्या पोलीस ऑफिसरने ह्याच्याच घरावर धाड मारली. ह्याचे घर एका काळी जनावरांचे हॉस्पिटल होते आणि तिथे फार जुनी मृत जनावरांची कलेवर जाळण्याचे एक मशीन होते. तिथे एका ठिकाणी जेन ला बांधलेल्या अवस्थतेत ठेवले होते.
खोल चौकशी करता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या त्यामुळे संपूर्ण घटनेला अतींद्रिय वगैरे म्हणणे मला संशयास्पद वाटते. अनेक कारणा साठी पोलिसांनी ह्या बातमीतील सत्य पुढे येऊच दिले नाही. ज्याने जेन ला किडनॅप केले होते त्याने कैदेंत आत्महत्या केली (कि पोलिसांनी त्याला मारला ?) आणि तो एकमेव प्रौढ आरोपी असल्याने पुढे केस चाललीच नाही. कामगाराच्या मुलाने तोंड अगदी बंद ठेवल्याने तो सुद्धा सुटला. जेन ची आई आपली मुलगी भेटली म्हणून सुद्धा खुश होती. वैद्यकीय तपासणीत आणि जेन च्या म्हणण्या प्रमाणे कुठलाही लैगिक अत्याचार इथे झाला नव्हता. जेन ने कुठल्याही प्रकारची साक्ष देण्यास नकार केला. मी त्या कामगार बाईला ५ हजार रुपये आणि आमच्या एका बिल्डिंग मध्ये झाडूवाली म्हणून काम दिले.
पोलीस ऑफिसरने मला सत्य नंतर सांगितले. जोसेफिना चा पती दुबईत होता जो बरीच वर्षें घरी येत नसे. जोसेफिना तशी सभ्य महिला असली एके काळी तिचे एका माणसाबरोबर प्रकरण होते. हा माणूस फारच चार्मिंग प्रकारचा होता आणि अनेक स्त्रियांना त्याने आपलेसे केले होते. पण हा माणूस विकृत सुद्धा होता. लहान मुलांना सुद्धा त्याने आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. जोसेफिनाला हे कळले आणि तिने त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ह्याने अनेक लहान आणि विशेषतः गरीब मुलाना किडनॅप केले होते. तो त्यांच्या ब्रेनवॉश करायचा, आणि हि मुले तरुण झाली कि त्यांना बाहेर पाठवून त्यांच्याद्वारे आणखीन लहान मुलांना किडनॅप करायचा. पोलिसांच्या मते जोसेफिनाला त्याच्या द्वारे किमान १ मूल झाले होते. त्या कामगाराचा मुलगा कदाचित ब्रेनवॉशमुळे किंवा अत्याचारा मुले त्याचा जवळ जवळ गुलाम झाला होता. जेनला त्याने किडनॅप केले होते खरे आणि कदाचित तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न सुद्धा केला होता पण शारीरिक दृष्टया त्या मुलाकडे तशी क्षमता नव्हती. पोलिसांना त्याचे सर्व धागेदोरे शेवट पर्यंत समजले नाहीतच पण माझ्या मते जोसेफिनाने एक फार मोठे नाटक घडवले होते. त्यांत मला तिने का निवडले हाच मला प्रश्न होता.

. . .