passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
संमोहन विद्येची १० रहस्ये : अभ्यासाचे महत्त्व
संमोहन, ज्याला इंग्रजीमध्ये हिप्नोटीझम म्हणतात, एक अशी कला आहे जी प्रत्येकाला शिकाविशी वाटते. कित्येक लोक तिचा वापर करून दुसऱ्यांचे त्रास कमी करतात. तिथेच काही लोक तिचा दुरुपयोग करून आपल्या शत्रूंना वश करण्याचा प्रयत्न करतात.. परंतु या कलेच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे कोणालाही ही विद्या पूर्णपणे कळून येत नाही. चला पाहूयात संमोहन विद्येची काही रहस्ये...
हिंदीमध्ये म्हण आहे की 'करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान, रसरी आवत जात है सिल पर पड़त निशान', ज्याचा अर्थ आहे की सतत प्रयत्न केल्यास बुद्धिहीन व्यक्तीचा मेंदू देखील काम देऊ लागतो. संमोहनाच्या दरम्याने आपण व्यक्तीला विभिन्न प्रकारच्या सूचना देऊ शकतो. संमोहन एवढी शक्तिशाली कला आहे की काही प्रयत्नांनंतर ती व्यक्ती त्या सूचना आपल्या जीवनात अमलात आणते. वारंवार केलेल्या सूचना तो सत्य मानतो आणि त्यांचे पालन करतो.
. . .