जगातील अद्भूत रहस्ये २
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

जगातील अद्भूत रहस्ये २ : माग्नोसन केस

झपाटलेली जहाजे, विलक्षण पद्धतीचे मृत्यू, विचित्र खून, हादरवून टाकणारे अपराध आणि अनेक रहस्यमयी पण सत्य अश्या गोष्टी घेवून आम्ही येत आहोत भाग २ मध्ये.

      रोसवेल मधील परग्रहवासी यानाची दुर्घटना

    तुम्ही आमचे "तमाम शुड" केस वरचा लेख वाचला आहे का ? आम्ही तो "जगातील अद्भुत रहस्ये भाग १" ह्यांत प्रकाशित केला होता. तमाम शुद केस खूपच प्रसिद्ध आहे. पण खालील माग्नोसन केस तमाम शुड केस शी संलग्न असावी असा अनेक लोकांचा कयास आहे. दोन्ही मृत्यू रहस्यमयी असून खलिल जिब्रान च्या पुस्तकाशी निगडीत आहेत.

    जून १९४५ मध्ये , सामोर्टन च्या मृत्युच्या तीन वर्ष आधी, सिंगापूर वासी , ३४ वर्षीय जोसेफ ( जॉर्ज ) शौल हेम मार्शल छातीवर ओमर खय्याम ची रुबियत छायाचित्र ठेवलेल्या स्थितीमध्ये अष्टन पार्क, मोसमान, सिडनी ,  इथे मृत अवस्थेत सापडला. अष्टन पार्क हे क्लिफ्टन गर्दन च्या थेट लागून आहे. त्याच्या मृत्यू हि एक विष घेऊन केली गेलेली आत्महत्या होती असे समजले गेले. १५ ऑगस्ट १९४५ मध्ये , जोसेफ च्या मृत्यूची कारणे अधिक स्पष्टपणे कळण्या साठी अधिकृत चौकशी करण्यात आली; ग्वेनेथ डोरोथी ग्राहम हिने चौकशी दरम्यान साक्ष दिली आणि तेरा दिवसानंतर पाण्यामध्ये तोंड खाली असलेल्या नग्न अवस्थेमध्ये  बाथरूम मध्ये मनगटाची नस कापून टाकलेल्या स्थितीत मृत आढळली. ग्वेनेथ डोरोथी ग्राहम. वय २५, चे नग्न शव अर्ध्या भरलेल्या बाथ टब मध्ये , एका फ्लॅट मध्ये रोज्लीन रोड , किंग क्रॉस इथे आढळले. तिची नस कापलेली होती अन बाथरूम च्या एक टोकाशी जमिनीवर पडलेले रेझर सापडले..

    पोलिसांना एका माणसाकडून असे सांगण्यात आले कि तो आणि मिस ग्राहम फ्लॅटवरती शनिवारी रात्री ११ च्या सुमारास परतले. ती बाथरूम मध्ये गेली , पण बाथरूम मधून कोणत्याच हालचालीचा आवाज येत नव्हता म्हणून त्याने तिला बेडरूम मधून हाक मारली. तिच्या कडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो बाथरूम मध्ये गेला असता त्याला ती मृत अवस्थेमध्ये बाथ टब मध्ये चेहरा खाली असलेल्या अवस्थेमध्ये तरंगताना आढळली.
    जरी तिच्या मनगटाची नस खोलवर कापलेली होती तरी तिचा मृत्यू पाण्यामध्ये गुदमरून बुडून झालेला होता.


    . . .