प्लॅन्चेट : प्लॅन्चेटचा शोध
आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.
अमेरिकेत न्यू यॉर्क शहराजवळ हाईडव्हील या नावाचे एक खेडेगाव आहे . त्या खेड्यात फॉक्स आडनावाचे एक कुटुंब राहत असे . ३१ मार्च १८४८ ये दिवशी रात्रीच्या वेळी या कुटुंबाच्या घराच्या दारावर कुणीतरी हळूहळू ठोके मारीत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला . ठोके मारणारी व्यक्ती मात्र कुणालाच दिसत नव्हती .
त्यामुळे हा भुताटकीचा प्रकार असावा असे फॉक्स कुटुंबियांना वाटले व त्यांच्या मनात थोडी घाबरत निर्माण झाली ; परंतु त्या कुटुंबात केटी फॉक्स या नावाची एक धीट मुलगी होती . तिने या प्रकारचा छडा लावण्याचा जणू निश्चयच केला . त्यासाठी तिने एक युक्ती करण्याचे ठरवले . ती दरवाजाकडे पाहत मोठ्याने म्हणाली "बाबारे तू कुणीही असलास तरी चालेल ; परंतु मी टिचक्या वाजवीन तेवढेच ठोके तू दे"
असे म्हणून तीने बोटाने काही टिचक्या वाजविल्या आणि आश्चर्य असे , की दारावर देखील तेवढेच ठोके वाजले !
यावरून , हि ठोके मारणारी व्यक्ती अदृश्य असली तरी तिलाही थोडीफार बुद्धी असावी असा निष्कर्ष तिने काढला .
हा सारा प्रकार त्यांच्याच शेजारी राहणारे एक कल्पक गृहस्थ मोठ्या कुतूहलाने पाहत होते . त्यांच्या डोक्यात लगेच वक कल्पना स्पुरली . ते त्या अज्ञात पिशाच्चाला उद्देशून म्हणाले , " तू कोण आहेस हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे . तेव्हा मी आता A ते Z पर्यंतची सर्व मुळाक्षरे हळूहळू उच्चारतो . त्यात तुझ्या नावाचे अक्षर आले की तू लगेच ठोका दे . "
अशा प्रकारे काही विशिष्ठ अक्षरे उच्चारल्या नंतर त्या पिशाच्चाने ठोके दिले . नंतर ती सगळी अक्षरे जुळवून वाचल्यावर एका मनुष्याचे नाव तयार झाले . ते नाव काही वर्षापूर्वी खून झालेल्या एका फेरीवाल्याचे नाव होते ! पुढे त्या केटी फॉक्स ची मध्यम शक्ती बरीच वाढली व तिला परलोकांतील अनेक दिवन्गतांचे संदेश तिला मिळू लागले ; परंतु अशा प्रकारे अक्षरे उच्चारून व ठोके ऐकून एक एक शब्द तयार करणे फारच जिकीरीचे होऊ लागले . त्यामुळे काही कल्पक लोकांनी एक गुळगुळीत कागदावर सर्व मुळाक्षरे लिहून मध्यभागी एक छोटासा ग्लास ठेवला व मृतात्म्यांना आवाहन केले .
आश्चर्य असे की तो ग्लास हळुहळु एकेका अक्षरावरून फिरू लागला व त्या अक्षरांचे मिळून एक वाक्य तयार झाले ! अशाप्रकारे प्लांचेट या साधनेचा शोध लागला व गूढविद्येची आवड असणारे लोक या साधनेच्या द्वारे परलोकातील मृत व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्याकडून परलोक जीवनाची माहिती मिळवू लागले .