भुताच्या गोष्टी Bhutachya Katha : माझे अनुभव घेतलेले आणि ऐकलेले: भाग 3
भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा . Exclusive bhutachya katha.
मी आणि संतोष त्याच दिवशी दुपारी जेऊन समुद्रावर बसून रात्री झालेल्या प्रकरणावर चर्चा करत होतो.दोघांचे डोके सुन्न पडले होते.आम्ही बोलता बोलता ठरवले की शाळेत जाऊन तो दोरखंड तिकडे आहे का बघून येऊया. आम्ही लगेच वेळ वाया न घालवता शाळेत निघालो आणि शाळेत पोचलो.सगळ्यात पहिला आम्ही तो दोरखंड बघितला तो तिकडेच होता आणि तो रात्री नीट बघितला नव्हता कारण आवाज झाला आणि आम्ही पळालो ना.तो दोरखंड शाळेच्या वर्गाच्या पत्र्याला बांधला होता जेणे करून तो पत्रा पडू नये म्हणून.शाळा खूप जुनी होती तेव्हा पाचवी पर्यंत.आम्ही तिकडे पुन्हा एक एक सिगारेट मारून घरी निघून आलो.मला दुपारी झोप लागत नव्हती सारखा तोच विचार येत होता आम्हाला कोण का दिसले नाही याची खूप खंत वाटत होती.शेवटी झोप लागली मी असाच झोपून राहिलो संध्याकाळी बाबांनी मला उठवले आणि सांगितले पिण्याचे पाणी भरायचे आहे तर विहिरीवर चल मी उठलो एका हातात हंडा आणि एका हातात कळशी घेतली आणि विहिरीवर निघलो.आता या विहिरी बद्दल थोडे से सांगतो या विहिरीला चारी बाजूने कठडा नाही पायऱ्या उतरन खाली जावे लागते पाणी भरायला.याच विहिरी मध्ये माझी चुलत काकी आणि संतोष ची आई पडून मरण पावलेल्या.
मी लहान होतो तेव्हा असेन 2 ते 3 वर्षाचा.पाणी भरता भरता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की गावचे लोक बोलायचे की अजून पण दोघी विहिरीवर पाणी भरायला आणि कपडे धुवायला येतात अचानक कधीतरी रात्री खूप जणांना आवाज आले आहेत त्या दोघी दिसल्या आहेत हा विचार येताच अंगावर काटा आला करण मी पायऱ्या उतरून खाली आलो होतो विहिरीत हात पाय सुन्न पडले कसे बसे ती भांडी भरली आणि वर आलो.असे वाटत होते आता जरातरी उशीर केला असता तर ही विहीर गिळून टाकेल मला.कसे बसे ९ ते 10 फेर्या मध्ये घरातले पाणी भरून टाकले घाबरत घाबरत.मग मी फ्रेश होऊन संतोष कडे आलो आणि संतोष ला हाक मारली हा सायबा झोपला होता त्याला उठवले मी. तो फ्रेश व्हायला गेला आणि मी लोट्यावर आलो आणि बसलो वर दरवाज्याकडे नजर गेली तर संतोष च्या आईचा फोटो लावला होता.फोटो बघून जरा घाबरलोच कारण ज्या विहिरती या दोन्ही काकीचा जीव गेला होता त्या विहिरीशी माझा संबंध येत होता.
विचार करतच घामाघूम झालो होतो विचार चालूच होते तेवढ्यात या सायबानी माझ्या खांद्यावर मागून येऊन हात ठेवला साला एवढा दचकलो की विचारू नका.त्याला हळू आवाजात दोन मालवणी शिव्या घातल्या आणि खळ्यात आलो.तेव्हा मला बोलला रात्री बाजूच्या गावात दशावतारी नाटक आहे बघायला जाऊया.आता गावात कुठे नाटक आलेे की असले नाटक म्हणजे आमच्या दोघांचा रात्री फिरण्याचा फ्री पासच होता.मी आईला सांगितले घरी येऊन मायेण्यात नाटक आहे तर मी बघायला जाणार आहे आई बाबांनी संतोष बरोबर आहे आणि माझे काही नातेवाईक जाणार म्हणून परवानगी दिली.मी आई ला बोललो की मी रात्री संतोष कडेच पुढे आईच बोलली की झोपणार हेच ना मी बोललो हो आई ने पुन्हा चालू केले तुला घरी रहायला नको सारखे घरा बाहेर रहायला पाहिजे पप्पा पण बडबडत होते मी ऐकले न ऐकले करून तिथून संतोष कडे निघून आलो.त्याला बोललो आज दारूची सोय कशी करायची संतोष बोलला होईल सोय पण भांडी भेटणार नाही की मिक्स करायला पाणी.मी विचार केला आणि त्याला बोललो माझ्या कडे प्लॅन आहे .नाटक संपले की सांगतो तो बोलला नाही आता सांग मी पण
हट्टी नाही सांगितले. तो बोलला ठीक आहे.रात्री जेऊन आम्ही सगळे नाटक बघायला निघालो.आता हा रस्ता तोच होता जो शाळे खालून जात होता बाकीच्यांची चर्चा चालू होती शाळेच्या भुताला घेऊन मी आणि संतोष एकमेकांकडे बघत हसत होतो पण बोलत काहीच नव्हतो. रात्री 1 ला नाटक संपले.सगळे घरी यायला निघाले तेवड्यात संतोषच्या मित्राने एक पिशवी त्याच्या हातात दिली आणि सांगितले की हा आगुळ काकीला दे.तो मित्र गेला आणि मी संतोष ला विचारले दारू कुठे आहे.त्याने इशारा केला की पिशवीत आहे .त्याला बोललो मी तो आगुळ आहे.तेव्हा माझी ट्यूब पेटली आजूबाजूला सगळे ओळखीचे होते म्हणून त्या मुलाने हा आगुळ आहे असे सांगितले.आम्ही सगळे चालत रात्री येत होतो शाळा जवळ येत होती सगळे शांत होते रात किडे किर किर करत होते अंधार होता.सगळे शाळे जवळ च्या रस्त्यावर आले तेव्हा शांत झाले कोण कोणाशी काही बोलत नव्हते मला काय हुक्की आली काय माहीत मी संतोष ला बोललो आता मजा बघ आणि जोरात ओरडलो आये गे धरल्यान माका भूतान धरल्यान सगळे जीव घेऊन पाळायला लागले संतोष पण ओरडत होता सोड त्याका सोड धरल्यान रे धरल्यान.आम्ही दोघे त्यांच्या मागून त्यांची मस्ती करत चेष्टा करत घरी आलो.सगळ्यांनी आम्हाला चांगल्याच शिव्या घातल्या आणि आपल्या आपल्या घरी गेले.
संतोष बोलला आता बोल तुझा प्लॅन मी बोललो आज आपण विहिरीवर दारू पियायची.हे ऐकून संतोष नाही बोलायला लागला.मी बोललो का तर बोलला की नको थय आये येता.मी त्याला बोललो तू बघितले आहेस का नाही ना मग कशाला घाबरतोस चल असे बोलून त्याला खेचत विहिरीजवळ घेऊन आलो माझ्या मनात होतेच या दोघीना बघायचे.संतोष बोलला भांडे कुठे आहे मी बोललो ही जुनी कळशी आहे ना त्यात ह्या बाटली पुरते पाणी घेवून त्यात मिक्स करूया.असे बोलून आम्ही एक सिगारेट लाईट केली सिगारेट ओढून संपवली.गरम होत होते साला वारा पण नव्हता आम्ही विहिरीत खाली उतरलो पण काय चमत्कार की योगायोग अचानक वारा यायला लागला वातावरण थंड होत होते.संतोष घाबरत होता मी पण घाबरत होतो माझ्या अंगावर काटे एका मागून एक येत होते.हात सुन्न पडले खाली वाकून ती काळाशी पाण्याने भरत असताना हातातून सुटून तळाशी गेली कशी कळले नाही. काय होत होते याचा पत्ता ना त्याला लागत हो ना मला आम्ही पटापटा पायऱ्या चढून वर आलो तर अंगावरून थंड वाऱ्याची झुळुक एका मागून एक येत होती.मी आणि संतोष थरथरत होतो पण तिकडून निघायचे पण मनात येत नव्हते.पुन्हा वारा सुरू झाला संतोष चा हात मी घट्ट पकडला आम्हा दोघांना कोणी तरी बाजूला आहे असे जाणवत होते भास होत होता पण काहीच दिसत नव्हते.शेवटी मी हात जोडले विहिरीला आणि बोललो चुलकलो पुन्हा अशी चूक नाही करणार माझी बोबडीच वळली होती संतोष गप्पच होता त्याची पण बोबडीच वळली होती त्याने पण हात जोडले.दोघांच्या डोळ्यात पाणी येत होते. कसे बसे थर थरत लोट्यावर येऊन बसलो.संतोष ने मला इशारा केला आणि काकीचा फोटो बघायला सांगितला.ते बघून मी अजूनच घाबरलो फोटो वरचा हार हलत होता.आम्ही पुन्हा हात जोडले.आणि लोट्यावर न झोपता आतल्या देव घरात जाऊन झोपलो.सकाळ कधी झाली कळले नाही घरात बडबड चालू होती.संतोष चे बाबा वैतागले होते.आम्ही विचारले काय झाले तर आम्हाला बोलले विहिरीवर कोणी तरी दारू पियायला आला होता भरलेली बाटली भेटली आणि सिगारेट चे पाकीट.आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले काही न बोलता किचन मध्ये आलो आणि कोरा चहा घेतला.संतोष च्या आणि माझ्या डोळ्यात अजूनही रात्रीची भीती होती.
( क्रमशः) रुद्र कुलकर्णी