निळावंती : निळावंती आणि पशूंची भाषा
निळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया.
ह्या पुस्तकात घुबड, गरुड, डोमकावळे इत्यादी पक्षी योनीतील प्राण्याशी बोलण्याचे मंत्र आहेत पण कुठलाही मंत्र काम करत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे हे मंत्र सर्वसाधारण पक्ष्यासाठी नसून पक्ष्यांच्या रूपांत असणाऱ्या दिव्य आत्म्याशी संवाद साधण्यासाठी आहेत. आपणाला जर असे आत्मे पाहण्याची अध्यात्मिक शक्ती नसेल तर हे मंत्र सुद्धा व्यर्थ आहेत.
निळावंती ग्रंथात अनेक अंजने करण्याचे सुद्धा मंत्र आणि कृती आहे. ह्यांत रात्री दिसण्यासाठी मार्जार अंजन अतिशय उपयुक्त असून अनेक तांत्रिक ते सहजपणे वापरतात. पण इतर अनेक अंजने पृथ्वीवरून दिव्य लोकांत जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत. मुळांतच अशी द्वारे अत्यंत कमी असल्याने साधारण माणसाला त्यांचा काहीही फायदा नाही.
ह्याशिवाय अन्न नासू नये, अन्नाला किडे लागू नयेत इत्यादी साठी जे मंत्र आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि वापरले सुद्धा जातात.