क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट : महाकाळ
हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559
पावसाची सर अजूनही चालूच होती....सगळीकडे चिखल झाला होता....आतापर्यंत घडलेल्या घटणांमुळे त्या रिसॉर्ट
चा जवळ ही जायला कोणी तयार नव्हतं.....पण मजबूरी म्हणून दोन सेक्युर्टी गार्ड तिथे उभे होते.......अंगावर रेनकोट हातात टॉर्च आणि दुसर्या हातात काठी......वातावरणात एक वेगळाच गारवा पसरला होता.....रिसॉर्ट पूर्ण सामसुम पडलं
होत.....होत होता तो फक्त पावसाचा थेंबाचा आवाज......
कोणीतरी दुरून जंगलातून रिसॉर्ट कडे चालत येत होत......त्या चिखलातून वाट काढत तो चालत येत
होता......चालत....?? चालत नव्हे लंगडत......कारण त्याचा एका पायाचा पंजा नव्हताच.......एका हातात जाडजूड
काठी होती.....तीच तो चिखलात रोवून दुसर्या पायाने उडी मारून चालत होता........पायात साधी चप्पल
ही नव्हती......अंगावर मळलेला धोतर तेही कमरे पासून गुढग्या पर्यन्त......थंडिपासून बचावासाठी अंगावर एक
काली चादर गुंडाळली होती......त्या चादरीमुळे डोक आणि पूर्ण अंग झाकल गेल होत......फक्त अर्धवट चेहरा दिसत
होता.....त्याचा खांद्यावर एक झोळी होती..........त्याचे केस आणि दाढी वाढलेले होते.....डोळे एकदम भयानक......लाल
भडक.....ओठ काळे......दात लाल पिवळे.......गळ्यात कवटी आणि हाडांची माल होती.......कपाळावर
दोन्ही भुवयाचा मधोमध काढलेलं पांढर शुभ्र मानवी कवटीच चिन्ह........त्याला आणखी भयानक बनवत होत....सतत
तो काहीतरी पुटपुटत होता.....कदाचित एखादा मंत्र.......
तो रिसॉर्ट चा गेट जवळ येऊन उभा राहिला.....मान तिरकी करून रिसॉर्ट कडे पाहू लागला.....आणि अचानक
विक्षिप्तपणे दात विचकत हसू लागला......आणि बोलला......,"तयार झाल......तयार झाल माझ
महाल.....मृत्यू चा महाल......स्वत:चा हाताने स्वत:चा थडग बांधलय...."
अचानक तो ओरडू लागलं.....आनंदाने एका पायावर उड्या मारत
नाचू लागला......आपल्या तोंडावर उलटा हात मारून घेऊन.....ठो..ठो...ठो.. बोंबलू लागला......
त्याच ते भयंकर बोंबलून पाहून दोन्ही गार्ड क्षणभर घाबरलेच......गेट चा आतूनच त्यांनी त्याचावर टॉर्च मारला......
"आयला....येड दिसतय......." एक गार्ड त्याचा अवतार पाहून बोलला......
"ए शाण्या......चल पल इथून....." दूसरा गार्ड त्याला हाकलून लावू लागला.......
तो थांबला........त्याला त्या दोघांचा राग आला......तसाच पुटपुटत त्याने हात झोळीत
घातला आणि कसलीतरी माती मुठीतून बाहेर काढली,आणि त्या दोघांकडे पाहून मंत्र म्हणत फुकली.......
आणि तो पुन्हा जंगलाचा दिशेने चालू लागला......थोडे अंतर पुढे गेला आणि थांबला.....
"मला हाकलताय.....तुम्हाला हाकलून लावतो....या रिसॉर्टमधून नव्हे तर....... या जगातून....."
अस म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागला.......आणि बोलला.....
"महाकाळ बोलतात मला.......महाकाळ...."
पावसाचा वेग वाढला होता......ढगात अजून काळे ढग येऊन मिळाले होते.....अगदी तसच आधीचा संकटात महाकाळ
नावाचा नवीन संकट येऊन मिळालं होत.......
दुसरीकडे त्याच क्षणी........
सुबोध....जो रिसॉर्ट चा मॅनेजर होता......त्याचा घरी इंस्पेक्टर
कदम चहा पित होते..........
"वहिनी...चहा खूप मस्त झालाय.....अगदी तुमचासारखा...." कदम
चहा संपवत बोलले....
वाहिनी हसून लाजत आत निघून गेल्या,,,,,,
"कामाच बोलायचं का...??" सुबोध थोडसं वैतागत बोलला....
"हा ..बोलू न....मला ना रिसॉर्ट पाहायचं आहे....आत्ता..."
कदम हसत बोलले...
"आत्ता...??? अहो आत्ताची घटना अजून डोळ्या समोरून जात
नाहीये....आणि तुम्ही आता एवढ्या रात्री तिथे जायचं बोलताय..." सुबोध घाबर्या आवाजात बोलला.....
"इंटरेस्टिंग ना.......मला ना आत्ताच पाहायचं आहे....आणि तुम्ही मला दाखवणार...." कदम सुबोधकडे रोखून पाहत
बोलले.....
"अहो कदम....माझ जरा ऐका...."सुबोध विनवणी चा सुरात बोलला.....
"मी फक्त एकाच ऐकतो...."कदम उठत बोलले......
"स्वत:च..."
सुबोध चा नाईलाज होता....दोघे जीप मधून रिसॉर्ट चा दिशेने निघाले आणि 10-15 मिनिट मध्ये पोहचले पण.....
रिसॉर्ट एकदम भकास वाटत होत...पाऊस अजूनही चालूच होता.....सुबोध आतून घाबरला होता.....
"इथले गार्ड कुठे गेले....."सुबोध इकडे तिकडे पाहत बोलला.....
"इंटरेस्टिंग........"कदम वर अजूनही काही फरक पडला नव्हता....ते त्यांचाच धुंदीत होते.....
"आज मजा येणार.....चला आत जाऊ.....गार्ड कडे कुठे काय आपल काम आहे....."
कदम ने सेक्युर्टी केबिन चा टेबल वर ठेवलेली टॉर्च उचलली......
दोघे आत आले......हॉल ची चावी होती सुबोध जवळ......भयंकर
आवाज करत दार उघडल गेल.....
पूर्ण हॉल मध्ये अंधार होता.....
"आयला.....दार पण हॉरर आहे की..."कदम जोक करत बोलले.....
पण सुबोध ला काही हसू नाही आल....तो बटन शोधत होता लाइटच........
त्याने पटापट सर्व स्विच ऑन केले पण लाइट लागली नाही.....
"काय झाल...? कदम बोलले....
"लाइट गेलीय....." सुबोध घाबर्या आवाजात बोलला.....
"चला मग आज कॅन्डल लाइट मध्ये रिसॉर्ट बघू...." कदम हसत बोलले....
सुबोध अजूनही घाबरला होता......त्याला लोकांचं बोलणं आठवू लागलं...,,त्याचे पाय लटलट कापू लागले होते.......
कारण मधेच चमकणार्या विजेचा प्रकाशात हॉल चा भिंतीवरील हॉरर पेंटिंग्स आणखी हॉरर वाटत होते......
अशातच तो तिथे उभा होता जिथे काही वेळापूर्वी त्या मुलीचा मुडदा पडला होता.....
"हे...हे रिसॉर्ट शापित आहे.....एका बाई चा आत्म्याने झपाटलय या जागेला......" सुबोध अडखळत बोलू लागला.....
"इंटरेस्टिंग......चला मग आज भुताबरोबर रात्र काढू...."कदम अजूनही बिनधास्त होते.....
"हसण्याचा भाग नाही हा कदम....."सुबोध आता भडकला होता....
" प्रतापराव पण या जागेचा इतिहासाबद्दल आणि त्या बाई
बद्दल सांगत होते....आणि अचानक ते अनर्थ घडलं...." काही वेळा पूर्वीचा प्रसंग आठवून त्याचा अंगावर शहारे आले
होते......
"मला पण उद्या ते सांगणार आहेत...त्या जागेचा इतिहास....."कदम बोलले....हातातील टॉर्च
चा प्रकाश हॉल वर टाकत ते बोलले......सगळीकडे निरखून पाहत पुढे बोलले....,"नाव काय त्या आत्म्याच...??
सुबोध ने आवंढा गिळला आणि बोलला...,"मंजिरी....!!!"
इतक्यात अचानक थंड वार वाहू लागलं.......वातावरणात कमालीची थंडी वाढली......अस म्हणतात की जिथे आत्मेचा वास
असतो तिथले वातावरण ती स्वता: तयार करते.....अगदी तिला हव असत तस.....
दोघे टॉर्च चा प्रकाशात आत चालले होते...एक एक पाऊल जपून टाकत होते........टॉर्च चा प्रकाशात कदम सगळीकडे
निरखून पाहत होते.....पण काहीतरी होत.....जे त्या दोघांना दिसत नव्हतं.....
त्या दोघांचा मागे........थोडसं भिंतीला चिकटून कोणीतरी उभ होत.....तीच उभी होती तिथे.....
पूर्ण चेहरा लांबसडक केसांनी झाकला होता.....अंगावर पांढरा गाऊन.......पांढरा पडलेला चेहरा......डोळे सताड उघडे
होते....आणि पांढर्या काचेचा गोटी सारखे तिचे ते डोळ्याचे बूबले...फाटलेले ओठ......भयानक अवतार होता तिचा.....
पण ते दोघे अजूनही पुढे चालत होते.....एवढ्यात कदमला काही जाणवलं...........ते खाली बसून निरखून पाहू
लागले.....काहीतरी सांडल होत.......त्यांनी बोट लावून पहिलं.......ते रक्त होत....अगदी ताज....लाल भडक रक्त.....
ते पाहून सुबोध ला त्या थंडीत पण घाम फुटला......कदम टॉर्च ने ते रक्त कुठून आल ते पाहू लागले.......त्या रक्ताचा मागोवा घेत ते चालू लागले....पूर्ण फ्लोर वर रक्त सांडल होत.....ते एका भिंतीजवळ येऊन थांबले.....कारण त्या भिंतीवरूनच
रक्ताचे ओघळ खाली येत होते........कदम टॉर्च हळूहळू वर घेऊ लागले......कदम चा कांनामागून एक घामाचा थेंब खाली
येऊ लागला......कदम आतून घाबरले होते...... त्यांनी वर छतावर टॉर्च मारली....समोरच दृश्य पाहून सुबोध
किंचाळलाच.....
कारण वर छतावर एका गार्ड ची बॉडी भिंतीला चिकटून उलटी लटकत होती....त्याचा पोटातूनच रक्ताची धार
निघाली होती.......त्याचा शरीरातून रक्त पाजरत होत.....ती बॉडी तर त्यांना दिसली पण
ती नाही दिसली......जी तिथेच होती....अगदी आरामात भिंतीवर बसली होती......आडवी.......एक हात
त्या बॉडी चा पाठीवर ठेवून........तो हात....किती भयंकर होता......अगदी घाणेरडा........हाताची त्वचा सुरकुतलेली अगदीच
निर्जीव........हाताची नखे लांब वाढलेली होती .......त्या नखात लागलेल रक्त आणि मांस......खूपच किळसावण होत............
पण त्या दोघांना दिसत होत फक्त बॉडी लटकताना.....कोणत्याही आधारा शिवाय......
कदम टॉर्च बॉडी वर रोखून धरत हळू हळू भिंतीजवळ सरकू लागले......आणि अचानक ती बॉडी पूर्ण वेगाने धपकन
त्यांचा समोर येऊन पडली.....तिने तिचा हात काढून घेतला होता.......कदम दचकून दोन पावले मागे सरकले.....
कदम लांबूनच टॉर्च ने त्याची बॉडी पाहू लागले.......खूपच भयानक अवस्था होती त्याची.......दोन्ही डोळे बाहेर लटकत
होते.........चेहर्याचे कातड पूर्ण ओरबाडून काढलं होत.......पोट फाडल होत.......जबडा पूर्ण मोडला होता....ज्यात एकही दात
शिल्लक नव्हता......त्याचा बॉडी ची अवस्था पाहून सुबोधला उमसू
लागलं.....इतकी किळसावणी अवस्था होती त्याची......
ती आता भिंतीवरून हात आणि गूढग्यावर चालत खाली येऊ लागली......
हळू हळू......हळू हळू.....
"क...कदम......काय हे......कोणी मारल याला....??"सुबोध घाबरून बोलला.....
"बघाव लागेल......रक्त अजून ताज आहे.......आणि बाहेर हॉल ला पण
लॉक होता.....म्हणजे खूनी अजूनही इथेच कुठेतरी लपून बसलाय...."
अस बोलत कदम एक पाऊल मागे सरकले.......त्यांना अस वाटलं की त्याचा पायाजवळ कोणीतरी आहे......त्यांचा पाय
कोणाला तरी धडकलाय........ती तिथेच होती......अगदी कदमचा पायाजवळ.....चिकटून अंग आकसून बसली होती......
कदम ने लगेच टॉर्च पायाजवळ मारली......पण तिथे कोणीच नव्हतं......
"काय झाल...??" सुबोध त्यांना घाबरलेल पाहून बोलला....
"काही नाही...."कदम स्वता:ला सावरत बोलले....
तेवढ्यात एक हलकीसी वार्याची झुळूक आली.......त्यासोबत काही शब्द कदम चा कानात घुमले......
"इ....क....डे......ये......."
कदम दचकून इकडे तिकडे पाहू लागले.....तो आवाज एकदम गूढ
होता.....जणू त्याला कोणीतरी काहीतरी सांगायचं प्रयत्न करत होत.....
.
इतक्यात.......सगळीकडे लक्ख प्रकाश झाला........लाइट आली होती......
त्यासोबतच सुबोध चा भयंकर किंचाळण्याचा आवाज आला......कदमनी सुबोध कडे पहिलं तर सुबोध मागे
भिंतीला चिटकून हाताचा बोटाने काही दाखवत हळूहळू खाली बसू लागला होता.........
कदम नी त्या दिशेने पहिले तर त्याचा पण अंगावर शहारे आले.....कारण समोर हॉल चा मधोमध झुंबर ला दुसर्या गार्ड
ची बॉडी लटकत होती.......बॉडी चा एक पाय दोर्याने झुंबर ला बांधला होता......आणि दूसरा पाय.......
दूसरा पाय भयंकर रित्या एखादा रबरी वस्तु सारखा वाकवून त्याचाच छातीत खुपसला होता......त्यातून रक्ताची धार
लागली होती.....जागचा जागीच ती बॉडी गोल फिरत होती........त्याच मुंडक गळ्यातून कापल होत
आणि अगदी कातड्याचा आधारावर मुंडक धडला लटकून होत........
सुबोध समोरचे भयानक दृश्य पाहून बेशुद्ध पडला होता........
ती आता पण तिथेच होती.....झुंबर चा वर.....आरामात बसली होती.....तिने अलगद नख त्या दोर्यावरून
फिरवला.......दोरा तुटला......आणि ते प्रेत ही धडम......आवाज करत खाली पडलं.......आणि ते मुंडक धडपासून वेगळं झाल
आणि लवंडत कदम चा पायाजवळ येऊन पडलं........
त्या मुंडक्याची मेलेले डोळे.......कदम कडे निरखून पाहत होते......
कदम किंचाळतच मागे सरकले.........आणि कशाला तरी धडकुन खाली पडले.....त्याच डोक टेबलवर आपटल गेल आणि ते बेशुद्ध झाले....."
त्यांनी डोळे उघडले.....तेंव्हा त्यांचा अंगाचा थरकाप उडाला.......कारण त्यांना उलट टांगल होत........आणि त्यांचा अगदी समोर काही इंच अंतरावर ती बाई छताला पाय लावून उलटी उभी राहिली होती.....
कदम ने इतका भयानक चेहरा कधी पाहिला नव्हता.....
ती बाई विक्षिप्तपणे हसत बोलली.....,"जीवंत सोडतेय....तुम्हा दोघांना.....मला मुक्ति हवीय......जा मार्ग शोध......"
अस बोलत ती मोठ मोठयाने हसू लागली.....आणि हसता हसता रडू लागली......आणि गायब झाली.....
कदम ने डोळे उघडले.....सकाळ झाली होती..... उठून उभे राहिले.....डोक अजूनही ठणकत होत......सुबोध
अजूनही बेशुद्ध पडला होता..... दोन्ही गार्ड चे मुडदे तिथेच पडले होते......हॉल रक्ताने
माखला होता.......त्या प्रेतावर बसलेल्या माशांमुळे प्रेत आणखी बिभित्स वाटत होते.......
कदम ला लवकरात लवकर प्रतापरावांना भेटायचं होत......आणि मार्ग शोधायचा होता त्या आत्मेचा मुक्तीचा.......
दूर जंगला मध्ये स्मशानात........एक जण भयंकर रित्या नाचत किंकाळात कसलीतरी आराधना करत
होता......काही मिळवण्यासाठी.........तोच
तो लंगडा.......महाकाळ.............