काळी जादू
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

काळी जादू : आफ्रिका आणि अन्य देशांमध्ये म्हटले जाते वुडू

लक्षात घ्या, हे पुस्तक आम्ही केवळ माहिती म्हणून प्रसिद्ध करत आहोत, त्यामागे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही.

कशी होते काळी जादू   जनावरांच्या अवयवांचा उपयोग केला जातो


अशी मान्यता आहे की १८४७ मध्ये एरजुली डेंटर नावाची वुडू देवी एका झाडावर अवतरली होती. तिला सौन्दर्य आणि प्रेमाची देवता मानले जात असे. इथे तिने कित्येक लोकांचे आजार आणि अडचणी आपल्या जादूने दूर केल्या. एका कॅथेलिक पाद्रीला हे सर्व आवडले नाही, त्याने ही ईश्वरनिंदा आहे असे ठरवून ते झाड मुळासकट तोडून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक लोकांनी इथे देवीची मूर्ती बनवली आणि तिची पूजा करू लागले.

. . .