मृत्यू नंतरचा अनुभव
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

मृत्यू नंतरचा अनुभव : मेडिकल अभ्यास

मित्रानो, ज्याने कोणी या पृथ्वीवर कोणत्याही रुपात जन्म घेतला आहे, त्याला एक ना एक दिवस या शरीराचा त्याग करून मृत्यूला जवळ करावेच लागणार आहे, हेच या संसाराचे शाश्वत सत्य आहे.

प्रास्ताविक   अनुभव - १

http://cdn.inquisitr.com/wp-content/uploads/2015/03/What-Happens-When-You-Die-Out-Of-Body-And-Near-Death-Experiences-Are-Real-Claims-Heart-Attack-Study.jpg
एका सर्वांत मोठ्या medical study मध्ये मृत्यूचा जवळून अनुभव (near-death experiences) आणि शरीराच्या बाहेरचा अनुभव (out-of-body experiences) असल्याचा शोध लावला आहे, ज्यामध्ये त्यांनी सिद्ध केले आहे की मृत्यू नंतर माणसाचा मेंदू पूर्णपणे बंद पडतो परंतु तरी देखील त्याच्या आतील चेतना (consciousness) आणि जागृतता (awareness) चालू राहते. वैज्ञानिकांनी ४ वर्षे जवळ जवळ २००० लोकांचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी पहिले की त्यापैकी ४०% लोक हे मृत्यू पावले होते आणि काही वेळानंतर त्यांचे हृदय पुन्हा धडधडू लागले होते. या जीवन आणि मृत्यू मधल्या वेळात लोकांनी एक प्रकारची जागृतता अनुभवल्याचे वर्णन केले आहे.
. . .