
passionforwriting
Updated: 15 April 2021 07:30 IST
कथा क्रूर पत्नींच्या : बेटी नेमार
पत्नी म्हणजे पतीसाठी सर्वस्व विसरून आपलं तन मन आणि धन अर्पण करून त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री! या गोष्टीलाही अपवाद आहेतच आणि ते फारच भयंकर आहेत. वाचूया सत्य कथा क्रूर पत्नींच्या
जॉर्जिया मधली ७९ वर्षांची महिला बेटी नेमार अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना तुरुंगात आहे. तिच्यावर आपल्या चौथा पती हेरॉल्ड जेनट्री याच्या हत्येचा आरोप आहे. पोलीस आता तिच्या ४ आधीच्या पतींच्या मृत्यूचा तपास देखील करत आहेत. सांगितले जाते की प्रत्येक पतीच्या मृत्युनंतर बेटीला विम्याची मोठी रक्कम मिळाली. पोलिसांना संशय आहे की हीच विम्याची रक्कम मिळवण्यासाठी तिने हत्या केल्या असाव्यात.
. . .