नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ : भूमिका

या जगात रात्री झोपेत प्रत्येक व्यक्ती किमान ९० मिनिटे स्वप्न बघतो. या स्वप्नांमध्ये अनेक असे इशारे मिळतात जे आपल्या आयुष्यातील एखाद्या पैलूच्या वास्तवाशी संबंध दर्शवतात. चला जाणून घेऊया अशी कोणती सर्वसामान्य १४ स्वप्न आहेत जी लोकांना पडतात आणि त्यांचा अर्थ काय आहे.

  कोणीतरी पाठलाग करत आहे

पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती दर रात्री ९० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत स्वप्न बघते. अनेक वेळा या स्वप्नांचा अर्थ लावणं खूप सोपं असतं - एखादा हरवलेला मित्र परत येणं , एखाद्या सुंदर जागेचं बोलावणं किंवा लॉटरी लागणं.

पण प्रत्येक वेळी स्वप्न एवढी साधी - सोपी नसतात. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणचे  आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकाच प्रकारचे स्वप्न पाहिल्याचे सांगतात, तेव्हा या स्वप्नांबाबतचा शोध घेणं अधिक मनोरंजक बनतं. एक १६ वर्षे परवाना प्राप्त सामाजिक आणि स्वप्नांचा अधिकृत अभ्यास करणारी कार्यकर्ती सुजेन्न बर्गमानचं म्हणणं आहे की "स्वप्न ही भावनांनी विस्तृत दृश्यांची निर्मिती करणारी एक सार्वभौम भाषा आहे." बर्गमानने अशी १४ दृश्य शोधली आहेत ती सामान्यपणे नेहेमी लोकांना स्वप्नात दिसतात. बर्गमान चं म्हणणं आहे की, "स्वप्नात दिसणाऱ्या खुणा आणि दृश्यांचा काही एक पक्का असा अर्थ नसतो. पण जसे एखाद्याच्या हास्यावरून आपल्याला कळते की तो आनंदी आहे, हि दृश्य एवढी सामान्य असतात की त्यांचा एकच अर्थ निघतो."

. . .