भूत : सत्य की असत्य
भयकथा संपादक Updated: 15 April 2021 07:30 IST

भूत : सत्य की असत्य : जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : द गुर्डोन लाइट

भुतांच्या सत्य कथा

भूतांचे फोटो, आकृती, प्रकाशग्रह, चक्र आणि पूर्ण शरीर   जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : बोरले रेक्टोरी


 

गुर्डोन लाइट ची कथा आरकांसास ची राजधानी लिटील रॉक जवळील ८५ मैल स्थित एका छोट्या शहरात घडली होती. आजपर्यंतची सर्वात विश्वसनीय गोष्ट द गुर्डोन लाईट रोज दिसते आणि हि अस्पष्ट असलेली घटना देखील पर्यटकांना आकर्षित करते. असे म्हटले जाते कि लोक जेव्हा लाईट पाहायला जातात तेव्हा नाराज होत नाहीत विशेषतः हेलोवीन च्या दिवसात. ही गोष्ट इतकी चर्चेत आहे कि १९९० दशकाच्या सुरवातीच्या काळात लोकप्रिय कार्यक्रम अन्सोल्व्ड मिस्टरिज मध्ये या गोष्टीचे प्रक्षेपण केले होते.

ज्यांनी द गुर्डोन लाईट पहिला आहे ते सांगतात ती तो एखाद्या प्रकाशाच्या पुंज्क्याप्रमाणे रेल्वे रुळांच्या नजीक जंगलात हवेत दिसतो.अनेकांनी त्या प्रकाशाशी संपर्क साधण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तो गायब होतो.

हि गोष्ट सुरु झाली ग्रेट डिप्रेशन च्या वेळेत. असे म्हणतात कि संध्याकाळी काम करत असताना एका रेल्वे कार्यकर्त्याचा अचानक रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत त्याचे डोके धडावेगळे झाले होते आणि हा उजेड त्याच्या कंदिलाचा आहे कारण त्याचे डोके आजही आपल्या धडाचा शोध घेत असते.

आणखी एक गोष्ट अशी कि एक रेल्वे खलाशी विल्यम मक्लेन, ज्याची आपल्या कर्मचाऱ्यां सोबत वेळापत्रकाच्या मुद्द्यावरून बाचाबाची झाली तेव्हा एका संतप्त मजुराने हातोडी मारून त्याचा जीव घेतला.

१९३१ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर काही दिवसांनी द गुर्डोन लाईट दिसू लागला असे वाटते कि तो कंदिलाचा प्रकाश आहे. अनेक लोक असे म्हणतात कि हा प्रकाश राज्य महामार्गावरील गाड्यांच्या दिव्याचा उजेड आहे पण हा महामार्ग १९७० च्या दशकाच्या मध्यावर सुरु झाला म्हणजे गुर्डोन लाईट पहिल्यांदा दिसल्याचा ४० वर्षानंतर. हा लाईट आजही नियमित दृष्टीस पडतो.

. . .