
जेव्हा आपण भुतांच्या बाबतीत बोलत असतो तेव्हा सामान्य माणसे भूतांवर केलेल्या शोधांऐवजी पुस्तके किंवा सिनेमे यातून मिळणाऱ्या माहितीवरून आपली मत प्रस्थापित करतात. जास्तीकरून लोकांचे विचार हे अविश्वास आणि विचित्र वागणूक या गोष्टींमध्ये अडकून राहिलेली दिसते. ( उदाहरणार्थ :१९८४ च्या घोस्टबसटर्स सिनेमात दाखवल्याप्रमाणे). इतर लोक भुतांच्या रोमांचकारी प्रकारांकडे अधिक आकर्षित झालेले दिसून येतात.( ज्याप्रमाणे १९४७ च्या फिम द घोस्ट एंड मिसेस मुइर या सिनेमात तसेच १९९० चा लोकप्रिय सिनेमा घोस्ट यांमध्ये दाखवले आहे.) काही लोक त्यांना भयानक मानतात जसे त्यांनी १९८२ च्या पोल्तेर्गीस्ट या सिनेमात एका कुटुंबाला हानी पोहचवताना पहिले आहे. त्यांच्याविषयीच्या काही खऱ्या गोष्टी लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवतात तर काही वेळा काही लोक त्यांच्यामध्ये अधिकच रुची दाखवतात.