आतापर्यंतच्या बावीस टॉर्पेडोंनी अचूक कामगीरी बजावली होती. हे दोन टॉर्पेडो सोडल्यावर ओ'केन पर्ल हार्बरला परतण्यास मोकळा होता.

सहा नॉटच्या वेगाने टँग पुढे सरकत होती. समोरच भर समुद्रात अडकून पडलेली ती विमानवाहू नौका दिसत होती. एकही एस्कॉर्ट दृष्टीपथात नव्हती.

कोनींग टॉवरमध्ये फ्लॉईड कॅव्हर्लीने आपल्या रडारकडे नजर टाकली.

" रेंज पंधराशे यार्ड !"
टँग हळूहळू पुढे सरकत होती. लक्ष्यापासून नऊशे यार्डांवर आल्यावर ओ'केनने हल्ल्याची तयारी केली. कदाचीत हा त्याचा शेवटचा टॉर्पेडो हल्ला ठरणार होता. या मोहीमेवरून परतल्यावर सबमरीन स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती होण्याची शक्यता होती.

" स्टँड बाय बिलो !" ओ'केन.
" रेडी बिलो, कॅप्टन !" स्प्रिंगर उत्तरला.
" फायर !"

पाणबुडीला एक लहानसा धक्का जाणवला. हिस्स् SS असा आवाज होऊन टॉर्पेडो पाणबुडीपासून मोकळा झाला आणि आपल्या लक्ष्याकडे झेपावला.

ब्रिजवर लेबॉल्ड आणि ओ'केन दुर्बीणीच्या सहाय्याने सुटलेल्या टॉर्पेडोचं निरीक्षण करत होतो. टॉर्पेडो सरसरत विमानवाहू नौकेच्या दिशेने निघाला होता.

" रनिंग हॉट, स्ट्रेट अ‍ॅन्ड नॉर्मल !" लेबॉल्ड उद्गारला.

आता एकच टॉर्पेडो उरला होता. तो सोडल्यावर टँग परत फिरण्यास मोकळी होती. आतापर्यंतच्या सर्व मोहीमांत टँगची ही मोहीम सर्वात विध्वंसक ठरणार होती.

२५ ऑक्टोबर १९४४, पहाटेचे २.३० वाजले होते.

" सेट !" ओ'केनने आज्ञा दिली.

कोनींग टॉवरमध्ये लॅरी सॅव्ह्डकीनने टॉर्पेडोच्या कॉम्प्युटरला आवश्यक फायरींग अँगल आणि इतर माहीती पुरवली.

" फायर !" ओ'केनचा आवाज घुमला.

फ्रँक स्पिंजरने टॉर्पेडो सोडण्याचा खटका दाबला. शेवटचा टॉर्पेडो हिस्स् SS आवाज करत पाणबुडीतून बाहेर पडला.

पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये पीट नेरॉवन्स्की टॉर्पेडोवर नजर ठेवून होता.

" हॉट डॉग ! कोर्स झीरो नाईन झीरो ! गोल्डन गेटच्या दिशेने !" तो उद्गारला
" आपण परत जाण्यास मोकळे !" कोणीतरी त्याला उत्तर दिलं.

एव्हाना तेवीसावा टॉर्पेडो अचूकपणे आपल्या लक्ष्यावर आदळला होता ! ६९५७ टनांच्या एबारु मारूच्या चिंधड्या उडाल्या !

डिक ओ'केनच्या अठरा महिन्यांतील पाचव्या मोहीमेतील हा तेहतीसावा बळी होता !

टँगच्या ब्रिजवर बिल लेबॉल्ड आणि ओ'केन शेजारी उभे होते. अचानकपणे त्यांना एक अनपेक्षीत दृष्य दिसलं.

टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडो आपल्या नियोजीत मार्गापासून पार भरकटला होता ! काही क्षण गोलगोल फिरुन तो डाव्या बाजूला वळला....

" शेवटचा टॉर्पेडो भरकटला आहे !" ओ'केन उद्गारला.

ओ'केनचं वाक्यं पुर्ण होण्यापूर्वीच तो टोर्पेडो भर वेगात वळला आणि थेट टँगच्या दिशेने येऊ लागला !

भस्मासुराप्रमाणे परत फिरलेला टॉर्पेडो काय रंग दाखवणार होता ?

टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता !

काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं !

" इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !"

इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला ! पाणबुडी टॉर्पेडोच्या मार्गातून दूर होण्यावर सर्वांचे प्राण अवलंबून होते.

ब्रिजवर उभे असलेले ओ'केन आणि लेबॉल्ड खिळल्यासारखे उलटलेल्या टॉर्पेडोकडे पाहत होते. नेम धरुन सोडल्यासारखा तो थेट पाणबुडीच्या दिशेने येत होता. टँग सहा नॉट वेगाने वळत होती. टॉर्पेडोचा वेग पाणबुडीच्या वेगाच्या चौपट होता !

पाणबुडीच्या डाव्या बाजूने येणारा टॉर्पेडो पाहून बिल लेबॉल्डच्या मनात आलं,

 ' कदाचित तो दुस-या दिशेला वळेल.. पुन्हा भरकटण्यास सुरवात होईल.. शेवटच्या क्षणी पाणबुडी त्याच्या मार्गातून दूर होईल !'

कोनींग टॉवरमध्ये फ्लॉईड कॅव्हर्ली टँगच्या दिशेने येणा-या टॉर्पेडोवर नजर ठेवून होता.

 ' टँग टॉर्पेडोच्या मार्गातून दूर जाऊ शकेल का ? पाणबुडीला फक्त काही मीटर सरकण्यापुरता वेग पकड्णं आवश्यक आहे ! एखाद्या स्पीडबोटप्रमाणे झटकन बाजूला झालं की सुटका !' कॅव्हर्लीच्या मनात आलं.

अर्थात टँग काही स्पीडबोट नव्हती. बाजूला होणं किंवा वेगाने निसटणं तिला शक्यं नव्हतं !

 ... आणि टॉर्पेडो टँगवर येऊन धडकला !

पाणबुडीच्या मागील बाजूला नॅव्हीगेशन रुम आणि टॉर्पेडो रुमच्या मध्ये तो टॉर्पेडो आदळला होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to एस्केप फ्रॉम डाऊन अंडर


साम्राज्यवाद

साम्राज्यवाद (इंग्लिश : Imperialism (इंपेरिॲलिझम)) हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात.

बालगंधर्व

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

भारतीय इतिहास- संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण- भाग १

आपला देश आणि त्याची संस्कृती ६५०० ख्रिस्त पूर्व काळापासून चालू आहे अणि आजही अस्तित्वात आहे. चला माहिती करून घेऊया या संस्कृती आणि साम्राज्य यांबाबत.

दुर्घटनाग्रस्त

भारताच्या इतिहासात कित्येक अशा दुर्घटना घडल्या आहेत ज्यामध्ये अपरिमित अशी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. चला पाहूयात अशाच काही दुर्घटना..........

महाराष्ट्रातील संत परंपरा

महाराष्ट्राची संतांची भूमि म्हणून ओळख आहे. वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला. अशा आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे एक छोटेसे पुस्तक उपलब्ध केले आहे.

भारताच्या इतिहासातील महान योद्धे

आपल्या देशाने अनेक महान योद्ध्यांना जन्म दिला आहे. त्यातील काहींचे कर्तृत्व आपल्याला माहिती आहे, पण काही जण असे आहेत की जे महान पराक्रम गाजवून देखील इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेले आहेत. आता माहिती करुन घेऊयात भारताच्या इतिहासातील अशाच काही महान योद्ध्यांची...

१८ ऐतिहासिक योगायोग

तुमचा योगायोगांवर विश्वास आहे? इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला अनेक असे योगायोग आढळून येतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता थोडी माहिती घेऊ इतिहासातील अशाच काही योगायोगांची आणि मग तुम्हीच निर्णय घ्या...

भारतीय इतिहास – संस्कृती आणि शासन यांचं विश्लेषण भाग २

जगातील सर्वांत जुन्या आणि जिवंत अश्या संस्कृती पैकी भारतीय संकृती एक आहे. ह्या दुसर्या भागांत आम्ही संपूर्ण भारताच्या इतिहासाचा आढावा घेवू.

बहिर्मुखी

'बहिर्मुखी' हा प्रसाद सुधीर शिर्के यांनी लिहिलेल्या कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह असून यात वाचकांना जीवनाकडे बहिर्मुख करण्याकरिता, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच जीवनाची दुसरी बाजू उलगडून दाखवणाऱ्या कथा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

मराठ्यांचा इतिहास

महाराष्ट्र आणि पर्यायाने मराठ्यांचा इतिहास हा संपूर्ण भारतीय इतिहासाचा सर्वांत महत्वाचा भाग आहे. दुर्दैवाने नालायक शिक्षणखात्या मुळे भारतीय इतिहासाचा हा भाग सर्वसामान्य लोकांकडे पोचत नाही.

प्रेरणा

प्रास्ताविक : असे अनेक जण आहेत की,प्रतिकूल परिस्थितून,जिद्दीने,कठीण परिश्रम व प्रयत्न करून यशाचे शिखर गाठले.पण अशा व्यक्तीचे जीवन ,परिश्रम समाजाला माहीत नसतं.कारण ते प्रसिद्धीच्या प्रकाशात नसतात. अशाच एका व्यक्तीने जीवनात कठीण परिस्थितीत ,जिद्दीने व प्रयत्नाने मिळविलेल्या यश प्रेरणादायी ठरेल, याची मला खात्री आहे.