या चकमकीची धग कमी झाल्यावर पोलिसदलाच्या गाडीतल्या सामानाची तपासणी सुरू झाली. हमेरने सगळ्या बंदुका आणि दारूगोळा ताब्यात घेतला. जुलैत क्लाईडच्या आईने हमेरना बंदुक परत करायला सांगितलं. "तुम्ही हे विसरता कामा नये की माझ्या मुलाला कुठल्याच न्यायालयात शिक्षा झाली नव्हती आणि जोवर कोणी न्यायालयात गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोवर तो गुन्हेगार नसतो. म्हणून मी आशा करते की तुम्ही या पत्राला उत्तर द्याल आणि बंदुकही परत कराल." या पत्राचं काही उत्तर आल्याचं लिखीत वा एकिवात नाही. अल्कोर्णने कारमधून बैरोचा सैक्सोफोन चोरला होता पण नंतर वाईट वाटून त्याने तो बैरोच्या कुटुंबाला परत केला. पार्करच्या कपड्यांसारख्या अनेक वैयक्तिक वस्तुही उचलल्या गेल्या होत्या आणि विचारणा झाल्यावर परत केल्या गेल्या नाहीत. या सर्व गोष्टी नंतर निशाण म्हणून विकल्या गेल्या. बैरोच्या परिवाराच्या मते पैशांनी भरलेली एक मोठी सुटकेस शेरिफ जॉर्डनने जप्त केली ज्यातून त्याने चकमकीनंतर काही दिवसांतंच आर्केडियामध्ये जमिनीचा एक छोटा तुकडा विकत घेतला. 1935 मधे डलास आणि सरकारी अधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली जिने बैरो व पार्करच्या 20 कुटुंबीय आणि मित्रांना त्या दोघांची गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी अटक केली. दोघांच्या आयांना 30 दिवसांची तर इतरांना एका तासापासुन दोन वर्षांपर्यंतची शिक्षा झाली. ब्लांशे बैरोला 10 वर्षांची शिक्षा झाली पण 1939 मध्ये तिचं चांगलं वर्तन बघुन पैरोलवर सोडण्यात आलो. ती डलासला परतून आपल्या वडिलांबरोबर रहायला लागली. 1940 मध्ये एडी फ्रासुरेशी लग्न करून ती सेटल झाली. 1967 ला "बोनी आणि क्लाईड" हा सिनेमा तयार व्हायच्या आधी वारेन बेट्टीने या नावांचा वापर करण्याची परवानगी मागितली. चित्रपटाच्या अभिव्यक्तीबद्दल ते फार खूश नव्हते तरी त्यांनी बेट्टीसोबतची मैत्री निभावली. 24 डिसेंबर 1988 ला तिचा कँसरमुळे मृत्यू झाला. तिला ब्लांशे बी फ्रासुरे या नावाने दफन केलं गेलं. बैरोचा मित्र रेमंड हैमिलटन आणि जो पामर दोघे एकत्र जेलमधुन पळाले, आणि पकडले गेल्यावर खुनाच्या आरोपाखाली एकंच इलेक्ट्रिक चेयर 'ओल्ड स्पार्की' चे बळी ठरले, ते ही 10 मे 1935 या एकाच दिवशी ! डब्ल्यू डी जोन्स देक्सफिल्ड घटनेच्या 6 आठवड्यांनंतर आपल्या साथीदारांपासुन वेगळा झाला होता. तो हॉस्टनला परतुन कापुस निवडायचं काम करू लागला पण लवकरच पकडला गेला. डलासला येऊन त्याने सांगितलं की बोनी आणि पार्करने त्याला कैद करून ठेवलं होतं. जोन्स डोयले जॉनसनच्या खुनाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाला आणि त्याला 15 वर्षांची हलकी शिक्षा झाली. 4 ऑगस्ट 1974 ला तो मदत करत असणाऱ्या एका बाईच्या प्रियकराशी झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. हेनरी मेथ्विनला ओक्लाहोमात हवालदार कैम्पबेलच्या खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला 1942 ला पैरोल मिळाली पण 1948 ला एका चालत्या ट्रेनखाली येऊन तो मेला. असं म्हणतात की तो दारू पिऊन रूळांवर पडला होता पण काही जण असंही म्हणतात की बैरोला धोका दिल्यामुळे काही लोकांनी त्याला मारून टाकलं. पार्करच्या नवऱ्याला, थोर्नटनला, मार्च 1933 मधे चोरीसाठी पाच वर्षांची शिक्षा झाली. 3 ऑक्टोबर 1937 ला ईस्ट होम जेलमधूल पळ काढायच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला गोळी मारली. फ्रैंक हैमर आयुष्य शांततेत व्यतीत करत होता पण त्यांनी बोनी व पार्करला वाचवलं होतं याचा त्यावर कायमचा प्रतिमेवर ठप्पा लागला होता. 1955 साली वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या बरोबर 30 वर्षांनतर बॉबी अल्कोर्णचा 23 मे 1964 ला मृत्यू झाला. ज्या गाडीतुन बोनी व क्लाईड जात होते ती गाडी मनोरंजनासाठी जत्रेत, भंगारबाजारात आणि अम्युजमेंट पार्कमधे लोकांना दाखवली जाऊ लागली. सध्या ही गाडी नवाडामधे व्हिस्की पेट यांकडे प्रदर्शित आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to बोनी आणि क्लाईड


भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी

भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.

बोनी आणि क्लाईड

Boni and Clyde is a famous horror story

इतिहासातील १० क्रूरकर्मा

मानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.