भयकथा संग्रह २ Bhutachya Katha

कोकणातील अनुभव

Author:Horror Editor

" ही घटना माझ्या सोबत
आणि माझ्या मित्रांसोबत
घडलेली आहे ,कोकणात . मी तेव्हा ५
वी मध्ये होतो , आणि माझे
काही मित्र ७ वी - ८ वी त असतील,
आमच्या शेजारी एक काका राहायचे.
पेशाने जरी ब्राम्हण असले
तरी पूजापाठ पेक्षा जरा वेगळ्याच
कारणासाठी ओळखले जायचे …
ते म्हणजे काळी जादू ( Black Magic )
… पण कुणाच धाडस ही होत
नव्हता आणि कोणी वाटेला पण जात
नसत त्यांच्या कधी .
आम्ही फक्त आई ,बाबा etc कडून
ऐकायचो पण नक्की काय ते कोणालाच
माहित नव्हता ,
फक्त काहीतरी विचित्र आणि भयानक
आहे एवढच माहित होता ….
काकांची personality ही तशी गूढ
होती , कोणाशीही क्वचितच बोलत
असत , गावाबाहेर
त्यांची शेती आणि जुन्या पद्धतीची typical
अशी दगडाची विहीर
होती त्याला भरव असे म्हणतात ..
संध्याकाळी ६ नंतर तिथे कोणीच
फिरकत नसे , लोकं म्हणायचे तिथे
एका अदृश्य शक्तीचे वास्तव्य आहे
आणि बऱ्याच लोकांना त्याचा प्रत्यय
ही आला होता , पण आम्हाला हे सगळ
भंपक वाटत होता ,
परंतु प्रत्येक अमावस्या न
पौर्णिमेला काका मात्र न
चुकता त्या शेतामध्ये न विहिरीकडे
जायचे , त्यामुळे
आम्हाला उत्सुकता होती नक्की हा माणूस
काय आहे ,
आतापर्यंत जे धाडस कोणी केले नव्हते
ते आम्ही करणार होतो ...
" ते म्हणतात ना अज्ञानात सुख असते
ते ह्या घटनेतून समजले "
तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू
होती … ती रात्र
आमावस्येची होती . रात्रीचे १०.३०
झाले होते , अश्याच
गप्पा रंगल्या होत्या , त्यावेळी पप्पू
आमच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणून
तोच आमचा leader , तो अचानक
बोलला आज काकांवर watch
ठेवायचा आणि त्यांना follow करायचे.
बाकीचे जाम टरकले पण मी जाम
excite झालो….
तश्यापन सुट्ट्या चालू असल्यामुळे
आम्ही गच्चीवर झोपत असू त्यामुळे
कधीही जा काही problem
नव्हता कोणालाच .
गप्पा मारता मारता १२ वाजले तसे
आम्ही सगळे सावध झालो , काका अजून
तरी बाहेर पडले नव्हते ,
पण १० -१५ minute मधेच
काका बाहेर पडले एक
मोठी पिशवी घेऊन .
पप्पू , मी आणि ३ मित्र हळू हळू
त्यांना follow करत होतो …. जस जस
शेत जवळ येऊ लागले तशी एक अनामिक
हूर हूर आणि भीती सगळ्यानाच
वाटायला लागली , वातावरणात पण
जणू अचानक बदल जाणवत होता …
काका शेतात पोहोचले पाठोपाठ
आम्हीही पोहोचलो .
काका विहिरीच्या पायऱ्या उतरून
खाली गेले , विहीर खूप मोठी होती
साहजिकच विहिरीजवळ भरपूर
झाडी होती त्यामुळे आम्ही वरून लपून
पुढे काय घडतंय ते पाहू लागलो एकदम
जपून ..
काकांनी नंतर सोबत
आणलेल्या पिशवीतून
भगव्या रंगाचा पंचा काढून नेसला ,
पूजेचा ताट , अगरबत्ती ,दिवा असे
बरेच साहित्य काढले ,
आणि मोठ्या पिशवीतून एक
जुनी लाकडाची पेटी आणलेली त्या पेटीला समोर
ठेऊन हळदी - कुंकू लाऊन पूजा करू
लागले , प्रत्येक दर्शी ती पेटी खूपच
जुनी आणि हळदी-कुंकू लाऊन बरबटून
गेल्यासारखी दिसत होती , जणू
हा माणूस कित्येक वर्षांपासून
त्याची पूजा करत असावा .
आता मात्र त्या पेटीचे गूढ वाढू
लागले आणि भीती पण वाढू लागली ,
बघता बघता १ तास होऊन
गेला जवळपास १.१५ झाला असेल ,
काकांचे मंत्र सलग पणे चालू होते , परंतु
जस जसा वेळ जात
होता तसा मंत्रोच्चाराचा सूर
आणि काकांच्या चेहऱ्यावरचा भाव
दोन्ही बदलू लागले ,
काका जरा विचित्र वागू लागले .
तोंडावर अघोरी हास्य
आणि विक्षिप्त हालचाली ,खूपच
भयानक वाटत होत्या . हळू हळू घटनेचे
गांभीर्य न इथे आल्याचा पश्चाताप
जाणवू लागला , आम्ही काय करतोय
तेच आम्हाला काळत नव्हते
ना आम्हाला तिथून हलता येत
होता ना तोंडातून शब्द फुटत होता ,
जस काही कोणीतरी जबरदस्तीने
थांबवून ठेवलाय तसच
काहीसा झाला होता .
काकानी हळदी कुंकू स्वताला लावले ,
लावले काय चांगलेच फासले पूर्ण
तोंडाला , दिव्याच्या प्रकाशात
त्यांचा चेहरा खूपच भयानक झाला ,
त्यांची हालचाली कमी झाल्या , ते
शांत होऊ लागले आणि एकदम
चेहऱ्यावर स्तब्धता आली , का कुणास
ठाऊक मला वेगळाच भास झाला जणू
फक्त देहानी काका तिथे आहेत कारण
चेहऱ्यावर काहीच हालचाल
नाही नजर एकदम शून्य
आणि तो क्षण
आला ज्याची आम्ही वाट पाहत होतो
काकांची नजर त्या पेतीकडे गेली …
आम्हाला का कुणास ठाऊक
त्यांनी पेटी उघडू नये असे वाटत
होते , परंतु त्यांनी ती उघडली त्यात
एक लाल
कपडा गुंडाळलेली कसलीतरी वस्तू
होती , हळू हळू ते कपडा काढू लागले ,
न जे काही दिसले ते पाहून
आमची बोबडीच वळली , आयुष्यात
पहिल्यांदा भीती काय असते ते
अनुभवत होतो .
त्यांनी कपड्याखाली एवढे वर्ष काय
ठेवले न कशाची पूजा करत होते ते
पाहून आमचे डोळेच पांढरे झाले .
ते एका बाई चे शीर होते , एकदम ताजे
जणू ती तासाभरापूर्वीच
मेली असावी .
काकांनी ते डोकं पुढ ठेवले न
त्याची पूजा करू लागले ,
तो चेहरा जरा ओळखीचा वाटत
होता , तेवढ्यात पप्प्या ओरडला
" वासंती काकू "
oh shit आता सगळे कळून चुकलेल,
सगळी ताकद एकवटून आम्ही सुसाट
पळालो …
बाकीच्या तिघांनी अगोदरच घर
गाठले हे तिथे गेल्यावर समजले ….
वासंती काकू
हि काकांची पहिली बायको ,
पहिल्या बाळंतपणात काकू वारली ,
काकांनी परस्परच अंत्यसंस्कार केले असे
ऐकिवात होते , त्यानंतर दुसरे लग्न
झाले तरी काकांचा जीव त्यांच्यातच
अडकला होता .
आता सगळ चित्र स्पष्ट झाला होता ,
आम्ही त्या रात्री आपआपल्या घरी जाऊन
झोपलो , माझ्याशिवाय सगळे तिथून ४
दिवस अंथरुणाला खिळून होते ,
कोणी बोलले viral fever आहे तर
कोणी भूतबाधा ,
पण आमच्यापैकी कोणीच खर काय ते
कोणालाच सांगितले नाही ,
तेवढी हिम्मत पण नाही झाली
अस बोलला जाता जी बाई
बाळांतपणात मरते ती अतृप्त राहते .
तिचे अस्तित्व ती वरचेवर
जवळच्यांना जाणवून देते , फक्त नजर
तशी पाहिजे , कदाचित काकांना ते
कळाले असेल .
आणि ते शीर , त्याच्या उपयोगाने ते
त्यांच्या ज्या काही काळ्या जादू
आहेत त्या पूर्ण करत…
तो आत्मा त्या पूर्ण करायला मदत
करतो .
यातला किती खर
किती खोटा माहित नाही , ती जादू
खरी कि खोटी ते काकांनाच माहित
पण त्या दिवसा पासून आम्ही मात्र
काकानपासून जरा जपूनच राहू
लागलो ,
त्या घटनेला १२ वर्ष
झाली तरी सगळ कस लख्ख आठवते आहे ,
आजही तो काकूंचा चेहरा माझ्या डोळ्यापुढून
जात नाही .
किती जिवंत होत ते शीर , जणू
काही कुठल्याही क्षणी डोळे उघडून
बोलायला सुरुवात करेल .
कदाचित बोललेही असेल , पण ते
पाहण्याची हिम्मत
आणि इच्छा माझ्यात नव्हती .
शिक्षणासाठी आम्ही बाहेर पडलो ,
पुला खालून बरेच पाणी गेला ,
काळाबरोबर या कटू
आठवणी हि विस्मृतीत
गेल्या आणि भीती, गांभीर्य थोडे
कमी झाले
.
गेल्या वर्षीच काका गेले , आणि असे
बोलले जाते कि काका गेल्यापासून
शेतात येणारे आवाज
आणि दिसणाऱ्या चित्र विचित्र
गोष्टी ,
बाईची आकृती या सगळ्या गोष्टी बंद
झाल्या , आणि त्याबरोबरच बंद झाले
पुन्हा शेत पिकन
आणि विहिरी मधला पाणी आजतागायत ,
आज तिथे सर्व भकास आहे
कदाचित काकांसाठी काकूचे अस्तित्व
होता कि काकूंच्या अस्तित्वा साठी काकांची धडपड ,
त्या अनामिक शक्तीलाच माहित
आता घरी गेल्यावर आवर्जून
काकांच्या घरी जातो , आज
काकूंच्या फोटो बरोबर
काकांचा ही फोटो लागलाय hall
मध्ये
मी फक्त पाहतो न भूतकाळात बुडून
जातो
आज technology science एवढे पुढे
आहे , परंतु
अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात
कि त्यावर आपसूक विश्वास बसतो .
मी भूत पहिले नाही पण
त्या रात्री त्याचे अस्तित्व जाणवले
जरूर , कदाचित त्याचीच
इच्छा असावी म्हणून तिथे थांबण्याचे
बळ मिळाले . आम्ही मित्र चुकून
सुद्धा तो विषय आमच्या मध्ये काढत
नाही , पण एक मात्र
नक्की तुम्ही जर देव मानत असाल तर
याच अस्तित्व सुद्धा नाकारू शकत
नाही

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to भयकथा संग्रह २ Bhutachya Katha


बाबाजार

एक अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी कथा!

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

भयकथा: त्या वळणावर..

मी हसायला लागलो कारण असल्या गोष्टींवर खरंतर माझा विश्वास नव्हता कारण गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या होत्या. मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशयोक्ती होते, पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो, "हो नक्की जितेंद्र, मी योग्य ती काळजी घेईन!"

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

भारतातले हे १० हायवे मानले जातात ‘हॉन्टेड’

जर तुम्ही एखाद्या सुनसान हायवेवर रात्रीच्यावेळी गाडी चालवत असाल आणि अचानक कुणी सफेद साडी घातलेली बाई जर तुम्हाला दिसली किंवा रस्त्याने जाताना अचानक शरीर थरथरायला लागल असेल तर एखाद्यावेळेस तुम्हीही घाबरून जाल.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.