ढ हे अक्षर असे आहे कि त्याचा फारसा उपयोग झालेला आढळत नाही.  संपूर्ण बाराखडीत ञ हे अक्षर जसे अगदीच अस्पृश्य वाटते, तसेच ढ हे अक्षर फार कमी शब्दात आढळून येते. रामायणात शत्रुघ्नाला जो scope असतो ढ ला सुद्धा तेव्हडाच role आपल्या भाषेत आहे. नाही म्हणायला एका फार महत्वाच्या शब्दात हे अक्षर आढळून येते. तो शब्द म्हणजे गाढव. इतर काही शब्दाचीच उदाहरणे द्यायची जाले तर “ढेकुण”, “धेपालाने”, “ढोसणे” इत्यादी. ह्यातील कुठल्याच शब्दाने मनाला प्रसन्नता येण्याचा संभव नाही.

आपल्या अक्षरांचा समूहाला वर्णमाला असे म्हणतात. त्यात बहुदा अ , क हि मंडळी ब्राह्मण वर्णाची असावी व ञ, ढ हि सुदर असावी. “अक्षराणाम अकारो अस्मि ” असे साक्षात भगवानाने म्हणून अ चा उच्च वर्ण सिद्ध केला आहे.

पण ढ च्या वाट्याला जी उपेक्षा येते तीच उपेक्षा विद्यार्थी गणातील काहींच्या वाट्याला येते. म्हणूच बहुदा अश्या विद्यार्थ्यांना ढ म्हणून संबोधिले जाते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे ढ पणाची लक्षणे नेहमीच पाळण्यात दिसत नाहीत. ती दिसायला शाळा नावाच्या एक dedicated वातावरणात जावे लागते. तिथे एरवी सगळी समान दिसणारी मुले अचानक दोन गटात विभागली जातात. एक ढ चा गट आणि दुसरा अ चा गट.

ढ मुले कुणाला आवडत नाहीत असा प्रकार नसतो. त्यांचा कुणालाच फारसा उपयोग नसतो. उपयोग नसलेल्या वस्तूला आम्ही अडगळीत टाकून देतो तसेच ह्या मुलांना अडगळीत टाकले असते. शाळेत मुलांची संख्या फार व शिक्षकांची संख्या जास्त झाली कि हि अडगळ नकोशी वाटते. त्यातच मास्तरा कडून काही चांगल्या वागणुकीची अपेक्षा नसल्यामुळे मास्तरांची खुशामत करण्यात सुद्धा ह्या मंडळीना विशेच आवड नसते. त्यातच शिक्षण हे ढ लोकांसाठी नसतेच जणू काही हे सत्य त्यांच्या मनात रुजत जाते. काही चतुर मंडळी त्यावर चित्रपट काढतात. असे दाखवतात कि मुळात हाड ढ हा ढ नव्हताच. ढ आम्ही होतो, तो तर चांगला चित्रकार असतो. तारे जामीन पार मध्ये ईशान अवस्थी ला आपण मनोमन मानतो. ढ हि मुले ढ नसतात अशी आपण समजूत करून घेतो.

पण आपल्या दूधवाल्याचा ढ वर्गात मोडणारा मुलगा सहावी इयत्तेतच सिगारेट फुंकायला  लागलाय ह्या बातमिचा धक्का आपण कसा बस सावरतो. अमीर खान ने आम्हाला उल्लू बनवला म्हणून मनात शिव्या शाप मोजायला लागतो.

वास्तविक त्या ढ ला जीवनाचे गमक समजले असते. किंवा हि ढ मुले एवढया संख्येने असतात कि त्यांचे ज्ञान हेच समाजाचे ज्ञान बनत जाते. शेवटी रिक्षावाला, बस चालक आणि वाहक , दुधवाला, टपरी वरचा पोऱ्या, पिझ्झा आणून देणारा हे सगळे पूर्वाश्रमीचे ढ च असतात. नाही म्हणायला काही राजकारणात शिरून डरकाळ्या मारतात.

आपण सुद्धा स्वतःला ढ समजत आलेलो असतो. वर्गातील अ मुले मुली उच्च पदस्थ नोकर्या करत असतात आपण फारतर कारकुनी करत असतो. आपला मुलगा टी वी बघत बसलेलो असतो व आपण उगाचच मी त्या गणितातील प्रमेयाना आणि इंग्रजीच्या व्याकरणाला भ्यायचो असे मनाशी बोलत चहाचे घुटके घेत राहतो.  पण नाही म्हणायला गणितात नेहमी एक आकडी मार्क घेवून फेल होणार्या व सातवी शाळा सोडून गेलेल्या बाळ्या फुर्सुन्गीचे की झाले हा विचार, किंवा गालावर छान खळी पडणाऱ्या स्मिताच  कुणा बरोबर लग्न झाले असेल हा विचार मनात डोकावल्या शिवाय राहत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to Abhiruchi


अनिल उदावंत यांचे लेख

श्री अनिल उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक सावेडी, अहमदनगर संपर्क : ९७६६६६८२९५

आठवणी

Poetry in Marathi

~ काव्यमय मधुरा ~

हे पुस्तक आजवर मी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. यात निरनिराळ्या विषयांच्या कविता वाचावयास मिळतील.

यशाची प्रभावी दशसूत्री

यशस्वी होण्याचे दहा सोपे उपाय! (लेखक: निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

डोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला "ती" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा "वांद्रे वरळी सी लिंक" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग "विसरता" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला "ती" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते? लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते? कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार? त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...!!

इतिहासाची सहा सोनेरी पाने

इतिहासाची सहा सोनेरी पाने हे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्याचे पुस्तक आहे. सध्या फक्त पहिले पण इथे दिलेले आहे.

इंग्रजी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ

इंग्रजी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक वाक्प्रचार त्याचा अर्थ आणि त्याचा वापर कसा करायचा याविषयी चे पुस्तक. या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखक अभय बापट यांचे स्वाधीन आहेत.

जीवाची मुंबई

ग्रामीण जीवनावर आधारित एक कौटुंबिक प्रेमकथा

टेक मराठी

ई-दिवाळी अंक - तंत्रज्ञान आणि मराठीला जोडणारा मंच. याचा कार्यभाग, निखील कदडी व पल्लवी कदडी हे टेक मराठीचे संस्थापक पाहतात. निखील व पल्लवी हे software क्षेत्रात कार्यरत असून ते “Krishna Infosoft” ह्या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. गेले ४ वर्षे या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

दॅट्स ऑल युवर ऑनर

रहस्य कथा

मृत्यूच्या घट्ट मिठीत

मी फार दूरचे विचार करत करत कधी एकदाचा मानसीच्या घरी पोहोचलो हे माझं मलाच लक्षात आलं नाही. मी दार ठोठावलं, तिने दार उघडताच मी तिच्या चेहर्‍याकडे पाहतच राहिलो. नुकतीच बहुधा फ्रेश वगैरे झाली होती ती. तिने आत बोलावलं आणि मी आत जाऊन बसलो. मी तिला माझ्या मनातला सगळा संभ्रम थोडक्यात सांगून टाकला. आणि चेष्टेचेष्टेत तिला तिच्या काश्मीरमध्ये एक हक्काचं घर घेऊन देण्याचं वचण दिल. मी आतातर अधिकच प्रेम करू लागलो होतो तिच्यावर. पण मला एवढ्यात तिला ते व्यक्त करायचं नव्हतं. आमच्यातल्या मैत्रीचे कमी वेळात धागेदोरे असे काही जुळले होते की जणू, ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत. पण मी अजूनही या विचारात होतो की, सुदैवाने माझी प्रेयसी अगदी मृत्यूच्या घट्ट मिठीतुन सुखरूप परतली आहे. त्यामुळे तिला मी कधीही गमावू नये.