जीव शास्त्री म्हणता कि, ते एक अस्वलांची जात आहे ? विकास शास्त्री त्याला नियंडरथल मनुष्य म्हणतात आणि आज विकसित झालेल्या मानवाची एक हरवलेला एक भाग म्हणतात. भारतीय लोक त्यांना भाताकलेली भूत, यक्ष, व किन्नर म्हणतात. तर भारत आणि नेपाळच्या सिमा क्षेत्रातल्या भागातील लोकांचे म्हणणे पडते कि ते एक रामायण आणि महाभारताच्या आधीपासूनचे सिद्ध पुरुष आहेत. ज्यांनी शरीरातून अमरत्त्व प्राप्त केले आहे, ते योगी हिमालयाच्या उत्तुंग उंचीवर कडाक्याच्या थंडीत राहतात. अनेक प्रकारच्या कल्पना आणि अफवांच्या या जीवनात फक्त भारत हा सगळ्या जगाला ज्ञान आणि विज्ञानामध्ये नवनवीन कोडी टाकत असतो.त्याच्या अस्तित्त्वाबद्दल कोणालाच शंका नाही पण हिमालयात राहणारा हनुस कोन ? तो काय करतो ? आणि जिथे जनजीवन टिकू शकत नाही अश्या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारचे कपडे ना वापरता कसा राहू शकतो ? हा प्रश्न आज पर्यंत कोणीच सोडवू सकळे नाही. पहिले तर लोक त्याच्या असण्यावर पण शंका व्यक्त करत होते. आणि त्यला भारतीय लोकांचा आंधळा विश्वास म्हणत होते. पण हे वर्ण आधी पासून एका काल्पनिक रुपात आजपर्यंत टिकून राहिले. पहिल्यांदा त्याला खर आहे असे प्रमाण मिळाले ते सुप्रसिद्ध गिर्यारोहक तेनसिंग आणि एडमंड हिलेरी यांनी १९५४ मध्ये हिमालय सर करण्यास गेले. एडमंड हिलरी ने १९ हजार फुट उंचीवर चोयांग स्थळी आपला डेरा टाकला होता. त्यावेळेची गोष्ट आहे. एक दिवस ते त्या गाजेचे निरीकःस्न करायला बाहेर पडले खूप दूर चालत आल्यावर त्यांना नुकतेच कोणीतरी चालत गेल्याच्या खुणा मिळाल्या. हिमामानावाच्या गोष्टी तर त्यांनी ऐकल्या होत्या कि हिममानव अश्या ठिकाणी राहतो कि ज्या ठिकाणी सामान्य माणूस पोहचू शकत नाही, आणि तिथे पोहचायचे असेल तर त्यांना स्वतःच्या रक्षणासाठी कोटीच्या कोटी रुपयाची साधनसामुग्रीची आवश्यकता लागत असे. तरी पण मृत्यू त्याचा पाठीवर बसलेला असतो अश्या ठिकाणी सामान्य माणूस कसा राहु शकतो. त्या पावलांचा पाठलाग करता करता ते खूप लांब गेले, पण त्यांना काहीच मिळाले नाही. आपल्या या गिर्यारोहणाचा त्यांनी विस्तार पुरव जेव्हा लिहिले त्यात त्यांनी हिमामानावाबद्दल पण लिहिले त्याचा वेळी विज्ञानाला अनेक नवीन गोष्टी कि मानवाच्या जीवनासाठी खूप थंड आणि खूप गरम वातावरण तापदायक नाही. भले भारतीय योगदर्शन आणि सिद्धीसारख्या गोष्टी आज लोकांच्या लक्ष्यात येत नाहीत पण हे एक निर्विवादित सत्य आहे कि माणूस शक्ती आणि सिद्धी च्या योग्य समन्वयाने शरीराने देवत्त्वाला प्राप्त होतो. हिमामानावाच्या शोधाचे अनेक प्रयत्न होत गेले. प्रत्येक गिर्यारोहक काहीना काही माहित उपलब्ध करून देत असे. त्यावरून हिममानव एक नाही तर अनेक आहेत. त्यांना पहिले गेले आहे आणि चुकून त्यांनाच एखादा फोटो पण घेतला गेला असावा कारण ते शरीराने असाधारण क्षमतेचे आहेत. त्यावरून काही लोकांचे असे म्हणणे पडले कि ते कोणत्याही स्थानावरून ते अदृश्य होऊ शकतात तसे ते दुसऱ्या ठिकाणी प्रकट होतात. जर अस नसत तर ते हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जनजीवन भागात येऊन ते २० हजार फुट अन्तर एका रात्रीत कस पार करत असतील ? चेहरा लांबट आणि पातळ , डोळे लाल आणि दात मोठे मोठे, किमान ७ ते ८ इंच लांब जीभ वीस माणसांची ताकद हे तेव्हाच होऊ शकत जेव्हा ते ब्रम्हचारी आणि नैसर्गिक वातावरणात वाढलेला असेल किंवा योग सिद्धी मिळवलेला असेल. डॉ. इंजार्ड यांचे म्हणणे आहे कि ते मांसाहारी आहेत ते पटवून देताना म्हणतात कि त्यांच्या मलाचे वैज्ञानिक परीक्षण करून पहिले आहे तसेच लोक कथांच्या आधारे मिळते तर तेथील स्थानिक लोकांच्या गाण्यामध्ये आणि गोष्टींमध्ये ते शाकाहारी असल्याचे कळते. रात्री झोपताना नवीन लग्न झालेल्या मुलीला आई आधीच सांगून ठेवते कि मुली जात्यात पीठ राहिले तर नाही ना ते बघ नाहीतर हिममानव आणि त्याला खाऊन जाईल. विचार करायची हि गोष्ट आहे कि पीठ आणि धन्य खाण्यासाठी हिममानव २० हजार फुट काही कशाला येईल. याच्या आधी त्याला बरेच जंगली श्वापद मिळतील खाण्यासाठी आणि खरच जर तो मांसाहारी असेल तर तो य्त्या वस्तीमधील लहान मुलांना का खात नाही फक्त पीठ आणि धान्यासाठीच का येतो. त्याच्या या स्वभावावरून लक्षात येते कि तो एक सिद्ध पुरुष तरी असावा. काही तरी कारण असेल ते वारा किंवा त्याचा योगाभ्यास करून त्याने त्या कडाक्याच्या थंडीत राहण्याची कला विकसित केली आहे. नेपालमधील काठमांडूचे लामा श्री पुण्य वज्र यांनी खूप वेळ हिमालयातील त्या प्रदेशात राहून त्यांनी हिमामानावाचा शोध केला आणि त्यांच्या सान्निध्यात खूप वेळ राहून त्यांनी त्यांच्या क्षमता खूप वेगळ्या आहेत. हि गोष्ट आताचे लोक मानत नसतील तरी अमेरिकेतील सुप्रसिद्ध जीव विशेषज्ञ श्री कैरोल वायमैन यांनी पण मानले आहे कि हिमामानवत खूप विलक्षण शक्ती आहे, उदाहरणार्थ हिममानव खूप लांबून गंधाद्वारे ओळखू शकतो कि कोणी पशु किनवा मानव त्याच्या अधिवासात तर आलेला नाही ना ते तोंड बघूनच ओळखू शकतात कि कोण काय करणार आहे ते त्याची शक्ती १५ माणसांच्या शक्तीपेक्षा जास्त आहे. तो खूप वेळा फक्त मुलांनाच दिसतो हे पण ठरलेलं आहे कि त्याला मानवाचा स्वभाव पण माहित आहे आणि त्याच्या विश्वासघाताचा त्याला नेहमीच भय राहते तरीच तो त्याची सावली पण बघत नाही. एकदा काठमांडू मधील भाऊ-बहिणीने त्याला पहिले. डॉ. सिल्की जॉन्सन यांनी त्या दोन मुलांना मळना मिळणाऱ्या माकडाचे आणि गोरीलाचे चित्र दाखवले आणि विचारले कि तुम्ही या चित्रात दिसणाऱ्या कोणत्या प्राण्यासारखा दिसत होता. दोन्ही चित्रे वेगवेगळी पहिली तेव्हा त्यांनी सांगितले कि या गोरिला सारख दिसत होता पण गोरिला नव्हता असे सांगितले. अनेक वेळा बघितला गेला आहे हिममानव पण आजून हि आपला विश्वास बसत नाही कि तो हिमामानावा आहे कि जंगली प्राणी कि आत्मा आणि कोणी खूप जुना एखादा अमर माणूस ?????????
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


जिन्न

आयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट

हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.