शास्त्रकारंIनी रुद्राक्षाच्या अनेक प्रकाराची वर्णने केली आहेत. रुद्राक्ष धारण करणार्याने आपल्या अनुकुलतेनुसार निर्णय घेऊन रुद्राक्ष धारण करावा. सर्वश्रेष्ठ रुद्राक्षाचे धारण करताना रुद्राकजाबल हे उपनिशिद सांगते की.. सर्व प्रकारे सौम्य, सुन्दर तसेच सवर्णीत आभा असलेले रुद्राक्ष अर्थात ' आवळ्या ' प्रमाणे असलेला रुद्राक्ष उत्तम असतो... शिवपुराणात सुद्धा याचे उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे प्रकार संगितले आहेत... ' आवळ्या ' प्रमाणे असलेला रुद्राक्ष उत्तम, बोरा प्रमाणे असलेला रुद्राक्ष मध्यंम तर चण्या प्रमाणे असणारा रुद्राक्ष अधम मानला जातो. परंतु मध्यम आणी अधम रुद्राक्ष, रुद्राक्ष-माळेत संख्येने अधिक असतील तर ते सुद्धा चांगले फळ देतात. ' आवळ्या ' प्रमाणे असलेला रुद्राक्ष सर्व अरिष्टे दुर करतो बोरा प्रमाणे असलेला रुद्राक्षही तेच फळ थोड्या कमी प्रमाणात देतो. चण्याच्या आकारचा त्याहून कमी... पण कोणताही रुद्राक्ष हा फलद्रूप होतोच, हे विभाजन त्याच्या गुणावरून केले आहे हे लक्षात घ्या. रुद्राक्ष जेवढा लहान होत जाइल तेवढे अधिक फळ मिळेल. जेवढा लहान असेल तेवढे एक दशांश फळ अधिक वाढत जाइल. रुद्रक्षजबलोपनिशद सांगते की शेंडीत एक रुद्राक्ष धारण करावा. 3 डोकिवर माळे प्रमाणे ओवून धारण करावे. गळ्यात ३६ रुद्राक्षांची माळ, दोन्ही भुजांवर १६-१६ रुद्राक्षांची माळ धारण करावी..मणी-बंधावर १२-१२ तर खांद्यावर १५ -१५ धारण करावे. १०८ रुद्राक्षांची माळ उत्तम. ही गळ्यात जान्हव्या प्रमाणे धारण करू शकता.. २ पदरी, ३ पदरी, ५-७ पदरी माळा बनवून धारण केल्यास उत्तम. रुद्राक्ष माळे हून अन्य या जगात श्रेष्ठ काहीच नाहि. मुकुट किंवा कुंडलांच्या रुपात सुद्धा रुद्राक्ष धारणे हितकर आहे. काटील बाल्या , कंठ हार या रुपात सुद्धा रुद्राक्ष धारण करू शकता. जो मनुष्या ११०० रुद्राक्ष धारण करतो तो स्वतः रुद्रस्वरूप होऊन जातो. ५५० रुद्राक्ष धारण करणारा पुरुष श्रेष्ठ समजला जातो. ३०८ रुद्राक्षांची ३-पदरी माळ धारण करणारा सदा शंकराचा भक्त राहतो. त्याला कोणीही भक्ती मार्गावरून पदच्युत करू शकत नाहि. रुद्राक्ष कोणीही धारण करू शकतो.. स्त्रियाना सुद्धा रुद्राक्ष लाभदायक आहे. रुद्राक्षांचे प्रकार व त्यांचे सामर्थ्य.. रुद्राक्षाच्या मुख्यपरत्वे त्याचे प्रकार आणि त्याची देवता व गुणधर्म यांविषयी सांगतो... १ मुखी. अत्यंत दुर्मिळ समजला जातो... महान योगीच हा धारण करतात. यामुळे षड्रीपुनवर विजय मिळवता येतो. याची देवता परमात्मा शिव आहे. व धारण करणारा काहीच दिवसात विरक्त होतो. २ मुखी.. हा अर्धनारी नटेश्वर चे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो. धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो..पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य , दु:ख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगती साठी हा धारण करतात ३ मुखी... अग्निदेवतेचे प्रतिक... हा धारण करणार्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तहान व भूकेवर विजय मिळवता येतो. बुद्धी कुशाग्र होते. ४ मुखी... ब्रम्हदेवचे प्रतीक.... याचा प्रभाव धारण कर्त्याच्या जिभेवर होतो.. अल्पावधीतच तो वक्ता साहेस्रेशू या पदविला पोहोचतो. स्मरणशक्ती तीव्र होते.... ५ मुखी.. पंचानन शिवाचे प्रतीक. पंच महाभूतंचा यात समावेश होतो. धारणकर्त्याला मनःशांती प्रदान करतो. यात सर्व रुद्राक्षाचे गुण विद्यमान असतात. सर्वार्थाने उत्कृष्ट असतो. तरीही सहज उपलब्ध होतो म्हणून याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन्य रुद्राक्षाकडेच आकर्षित होतात. ६ मुखी., कार्तिकेय स्वरूप. या वर माता पार्वती व माता लक्ष्मी ची सुद्धा कृपादृष्टी आहे. हा काही जण विष्णू स्वरूपही मानतात. व्यापारी लोक हा रुद्राक्ष वापरतात. या रुद्राक्षाने गल्ला कधीच रिकामा रहात नाही ७ मुखी... सप्त मातृका , अनंत नागाचे प्रतीक . माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. दीर्घायुष्य व अपघातपासून रक्षण करतो. याच्या धiरणाने मस्ताकषूक, संधीवात, विषमज्वर बरा होतो. सर्प दांवशiपासून रक्षण होते. ८ मुखी.. गणेशाचे प्रतीक.... याला चिंतामणी रुद्राक्ष सुद्धा म्हणतात.याला अष्टमातृका, त्रिदेवांचा आशीर्वाद लाभला आहे. तांत्रिक लोक याला कुण्डलिणीजागृतीचे साधन मानतात. हा जवळ असेल तर समायसूचकता अंगी बाळगते. अनेक कलान्मधे नैपुण्य येते. ९ मुखी... भैरवाचे प्रतीक.दुर्गेचा पूर्ण आशीर्वाद.हा रुद्राक्ष धारण करणार्याच्या आसपास दु:ख दैन्य दारिद्र्य कधीच फिरकत नाही. १० मुखी..... यमराज चे प्रतीक.अष्टदीक्पाल चा आशीर्वाद. हा धारण केला तर तामसी शक्तिंपासून रक्षण होते. अनिष्ट ग्रह शांत होतात, ११ मुखी... ११ रुद्रांचे प्रतीक.,, इंद्राचे प्रतिकहि मानतात. हा अतिशय दुर्मिळ असून धारण कर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो. १२ मुखी….महाविष्णू तसेच १२ ज्योतिर्लिंगाचे प्रतीक. हा धारण केला असता व्यक्तिमत्व तेजपुंज होते. शत्रूघात व अपघातपासुन रक्षण होते. १३ मुखी.. कामदेव स्वरूप...याला इंद्रiचा आशीर्वाद लाभला आहे.. हा श्रiध्याच्या वेळी धारण केला तर पितरांना सद्गती प्राप्त होते. १४ मुखी... हनुमानाचे प्रतीक. हा शेंडीत धारण करतात. योग विद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करतात. गौरी शंकर रुद्राक्ष... हे दोन रुद्राक्ष नैसर्गिक रित्या एकमेकांना चिकटलेले असतात, धारण करर्त्याला शिव-शिवाच्या अनुग्रहाने पूर्ण सुखशांती लाभते. हा धारण न करता देवघरात ठेवतात. त्रिभुजी रुद्राक्ष...हा अतिशय दुर्मिळ समजला जातो. ३ रुद्राक्ष एकमेकांना चिकटलेले असतात. याला ब्रम्हा-विष्णू-महेशाचे प्रतीक समजले जाते....हा रुद्राक्ष धारण करर्त्याला काहीही कमी पडू देत नाही रुद्राक्षाच्या प्रभावामुळे आज त्याची मागणी खूप वाढली आहे. जगाच्या काना कोपरयातून आज रुद्राक्षाला मागणी येत आहे. याचाच फायदा घेऊन अनेक ठग खोटे रुद्राक्ष विकत आहेत. रुद्राक्षी किंवा रुद्रक या नावाने ओळखले जाणारे वृक्षफळ तंतोतंत रुद्राक्षा सारखे दिसते. .. हे रंगाने काळे असल्याने त्यांना काळा रुद्राक्ष म्हणतात. हा रुद्राक्ष हृषिकेश, हरिद्वार सारख्या ठिकाणी सर्रास मिळतो. हा काळा रुद्राक्ष वजनाला हलका असतो.चपट्या रुद्राक्षiस लोक अद्न्यानाने भद्राक्ष असे संबोधतात. हा भद्राक्ष उत्तर प्रदेश मध्ये मिळतो. याची बी रुद्राक्षiपेक्षा हलकी असते. त्यावर मुखे कोरून पांढरा रुद्राक्ष म्हणून चढ्या भावाने विकतात.या रुद्राक्षी व भद्राक्षी पासून सावधान. कारण हे रुद्राक्ष धारण केले तर खूप कमी गुण येतो. अथवा येतच नाही.खरया रुद्राक्षाचे उत्पादन गंगोत्री , यमुनोत्री येथे मोठ्या प्रमाणावर् होते. इंडोनेशिया , जावा, सूमाट्रा व चीनच्या काही प्रदेशात रुद्राक्षाचे वृक्ष आढळतात. आकाराने सर्वात मोठा व जड वृक्ष जावा मधून निर्यात होतो. नेपाळ मध्ये भोजपूर जिल्ह्यात सर्वात जास्त रुद्राक्षाचे उत्पादन होते. रुद्राक्ष परीक्षा....1. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये चटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही.जे पाण्यात डुंबत बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. २. रुद्राक्ष हे पाच -दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो. ३.तांब्याच्या २ भांड्यामध्ये व तांब्याच्या २ पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. ४. खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही. आणि रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत नाही वा वाकत नाही. ५. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. ६.रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी पण ते काटे बोथट असतात, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट

हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559