शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

**** भूतांचे प्रकार **** भाग १-

Author:संकलित

सर्वसाधारणपणे भारतीय व्यक्ती आणि ज्तोयीशशास्त्र हे अतूट बंधन आहे. पिढ्यानपिढ्या झालेला परिणाम असा भाग इथे येतो. त्यातून काही समाज गैरसमजहि होतात. कोणत्याही ज्योतिषाकडे गेल्यानंतर येणारे उत्तर म्हणजे पित्रबाधा किंवा भूतबाधा या बाधा आहेत हे जरी असले तरी या बाधा मृत व्यक्तींबद्दलच आहेत, असे असले तरी दोन्हीतील फरक मात्र खूप आहे हे लक्षात येत नाही. भूत आणि त्यांचे प्रकारही तितकेच आहेत आणि याचे स्वरूपही वेगवेगळे आहे. याचा होणारा त्रास हाही वेगवेगळ्या प्रकारे होते. त्यामुळेच यातील फरक लक्षात येणे गरजेचे आहे. देवचार हा प्रकार कोंकणातील आहे. कोकणात राहणाऱ्या कोणत्याही माणसाला देवचार माहित नही असे होत नाही. देवाच्या चालीने चालणारा तो देवचार असा प्रकार आहे. मानलेले देवाचाळा, चाळेगत, चालगत्या यासारख्या वेगवेगळ्या नावाने याला ओळखले जाते. याच्याकडे श्रध्येने सांगितले कि ते मिळते हा कोकणातील लोकांचा विश्वास आहे. या देव्चाराकडे मात्र देवाण घेवाण चालते याला नवस करण्याचा प्रकार मात्र फार विचारपूर्वक करावा लागतो. ज्याप्रकारे याला बोलले जाते त्याप्रमाणे याची परतफेड करावी लागते याकरता देवचाराकडे केकेला नवस फेडताना चूक झाली तर तो नवस फेडणे पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ एकाने नवस केला, माझे काम होऊ दे मी तुला बोलाचा मांडव घालून बोलाचा भात व बोलाचा सार देतो. तुझ्या इथे मी बोलाचीच पंगत उठवतो. त्या माणसाचे काम झाले म्हणून त्याने खरोखर मांडव घालून जेवणाची पंगत उठवली. पण हा नवस पूर्ण झाला नही याची सूचना त्याला लगेच मिळाली. म्हणजे ज्या प्रकारे आपण नवस करतो त्याच पद्धतीने तो फेडणे गरजेचे असते. त्याने प्रत्यक्ष जेवण घालून पंगत उठवली पण त्याने नवस मात्र बोलाचा मांडव व बोलाचा भात व सार घालून पंगत उठवण्याचा केला होता. ज्याप्रकारे नवस असेल तसा तो फेडला जातो. यामध्ये चुकल्यास त्याला माफी नाही. मानवजातीत सर्व भुते त्याच्या स्वाधीन असतात. सीमेवरील याचे ठिकाण आणि त्याचे असणारे मंदिर हाही भाग प्रमुख आहे. एखाद्या देवाच्या मंदिराप्रमाणे याचे मंदिर असते याची पूजा अर्चा होते आणि इथे नवस बोलून तो फेदालाही जातो. प्रत्येक वर्षी याची त्या ठिकाणी जत्राही भरली जाते. परमदयाळू चुकलेल्यास वाट दाखवणारा वैतास शिक्षा करणारा असा काहीसा भाग इथे येतो. यामध्ये चालगत्या देवचार असाही प्रकार दिसतो. काही विशिष्ट पूजेने साधनेने याचा पुजारी एका नारळात याचा प्रवेश करून तो नारळ देतो. ज्याठिकाणी हा नारळ ठेवला जातो त्या ठिकाणी भरभराट होते. पण शेजारच्या घरातील वस्तू नोटा मात्र कमी होण्यास सुरुवात होते व त्यांची उपरती कला सुरु होते. चालगत्या करणारी घराणी एक दोन पिढ्यातच नष्ट होतात त्यांना उतरती कळा लागते हा अनुभव आहे. कोकण सोडून देशावर ज्याप्रकारे चेटूक, भानामती, इटलाई, म्हसोबा पित्रे यांच्यामार्फत करणी केली जाते त्याप्रकारे या देवचारा मार्फत करणी केली जाते. याचा येण्या-जाणायचा मार्ग ठराविक असतो. समजा त्याच्या रस्त्यात जर कोणी त्याला अडचण केली तर त्याला तो शिक्षा करतो उदाहरणे आहेत तशी श्रद्धा आहे. देवचाराचे चालणे व वजन यामुळे त्याची पावले जमिनीवर उठलेली दिसतात एक फुटापासून तीन फुटापर्यंत असणारी पावले असतात. प्रत्यक्ष बघणारी माणसे आहेत त्यामुळे याची वाट हि एकच राहते. वडाच्या ओसाड झाडावर याचे वास्तव्य असते. जिवंतपणी सद्भावना तीव्र असणे हा प्रकारहि चांगला नाही म्हणावे लागते. देव सेवेचे कार्य केव्हाही चांगले पण त्यात वासना गुंतून राहणे हि गोष्ट कधीही वाईट. महापुरुषालाच ब्रम्हसंमंध असे दुसरे नाव आहे. हा प्रकार पिशाच योनीत मोडत नही. ज्याप्रकारे देवचार वासनेत गुंतलेला असतो तसा हा महा पुरुष वासनेत गुंतलेला नसतो.याचा वासना देह अत्यंत क्षीण झालेला असतो त्याला प्रगत होण्यास फार कष्ट पडतात. महापुरुषाचे दर्शन झाले आहे याची फार कमी उदाहरणे आहेत. उर्वरित कथा पुढच्या भागात........
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

जिन्न

आयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!