धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख – समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण!’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्‍या आहेत. आचरा (ता. मालवण) गावाची गावपळण राज्यात प्रसिद्ध आहेआचरा गावातील रामेश्वर मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. रामेश्वराची परंपरा म्हणून दर पाच वर्षांनी या गावात 'गावपळण'ची प्रथा आजही पाळली जाते. रामेश्वराच्या कृपेने गावकऱ्यांवर कोणतंही अरिष्ट येत नाही अशी श्रद्धा आहे. शिवाय मालवण तालुक्यातील मसुरे – बिळवस गावाच्या गावपळणीत वेगळेपण आहे. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. आजारी व्यक्ती, लहान मुलांना घरी राहण्यास मुभा आहे. पाच दिवस ही ‘गावपळण’ चालते. कुठल्याही घरात पाच दिवस कचरा काढला जात नाही. घरातील चुलीवर जेवण बनवले जात नाही. त्यासाठी दुसरी चूल थाटतात. विशेष म्हणजे या कालावधीत घरच्या देवाची पूजा होत नाही. देवासमोर दिवा पेटत नाही. तसे बंधन आहे. रात्रीच्यावेळी गरजेपुरती वीज वापरली जाते. गावात, सुख, समाधान, शांती लाभावी हा या परंपरेमागचा उद्देश असल्याचे गावकरी सांगतात. गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीची पूजाही पाच दिवस बंद ठेवली जाते. बिळवसची ‘गावपळण’ म्हणजे पूर्वी मसुरे गावाचीच ही ‘गावपळण!’ वाड्यांचा पसारा वाढल्याने बिळवस गावाने ही प्रथा सुरू ठेवली. देव दीपावलीला श्री देवी सातेरी मंदिरात गाव जमा होतो. धार्मिक विधीनंतर भात, काकडा, नारळ व दिवा ओवाळून बिळवसनजिक माळगाव – हुमरस सीमेवर ही ‘खोरणी’ घातली जाते. तिसर्‍या दिवशी गावपळणीस सुरुवात होते. गावभरणीच्या दिवशी ‘डाळ’ बसवतात. देवीला नारळ ठेवून पळण मान्य असेल तर कौल घेतला जातो. कौल दिल्यास त्याच दिवशी गाव भरतो. गावपळणीच्या दिवसांत गावातील ग्रामस्थ गुरेढोरे घेऊन माळगाव – हुमरस भागात छोट्या झोपड्या बांधून राहतात. जेवणासाठीचे साहित्य बरोबर असते. गुरेढोरे गावात गावपळण पूर्ण होईपर्यंत प्रवेश करत नाहीत. नित्य व्यवहार चालूच असतात. थंडीच्या दिवसांतही ग्रामस्थ थंडी सहन करीत ही परंपरा जोपासतात. जंगली भागात ते वास्तव्य करतात, पण देवीच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्या मनाची तयारी आधीच झालेली असते. पूर्वी एक महिना ‘गावपळण’ असायची. आज ती पाच दिवसांवर आली आहे. ग्रामस्थांनी उभारलेल्या छोट्या झोपड्यांत रात्रीच्यावेळी गोष्टी, गायनाचे फड रंगतात. एकमेकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी कथन करण्यासाठी शेतकर्‍यांना हीच तर एक संधी असते. ज्येष्ठांच्या गप्पांत युवकांबरोबरच छोटी मुलेही सहभागी होतात. जेवणाच्या पंगती एकत्रच बसतात. त्यामुळे एकत्रित राहण्याची परंपरा या प्रथेने जपली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. गावातील रोगराई नष्ट होऊन गाव समृद्ध बनतो तो गावपळणीमुळेच अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गाव! या गावाचीही ‘गावपळण’ होते. देवीची चाकरी करणारे दर तीन वर्षांनी एकदा सहकुटुंब गावपळणीला जातात. तीन दिवस सीमेबाहेर राहिल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांना गुरव, घाडी आणण्यासाठी जातात. त्यानंतर नौबत होते. पारधी कौलप्रसाद होतो. एका बाजूला समुद्र तर दुसर्‍या बाजूला डोंगर, नारळी, पोफळीच्या बागायतीमध्ये मुख्य रस्त्यावरच भगवती देवीचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ५०० वर्षांचा इतिहास असणारी देवीची मूर्ती पश्‍चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभार्‍यात काळ्या पाषाणात कोरलेल्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील कोरीवकाम असलेली पाषाणमूर्ती ४ फुटी आहे. प्राचीन शिल्पकलेचा तो अमूल्य ठेवाच आहे. देवालयाचे बांधकाम हेमाडपंथीय आहे. श्रीदेवी शिव यांच्या पूजेचे पाणी जमिनीखालून गोमुखाकडे उत्तरेकडे बाहेर येते. या गोमुखी शिवस्थानामुळे देवीला सोममुखी प्रदक्षिणा घालतात. पालखीचा मार्गही तसाच असतो. पश्‍चिमाभिमुख असलेल्या या मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. भगवती मंदिर आवारात श्री देवी पावणाई, भावय, अनभवणी, देव गांगो, देव गिरावळ, बायची आदी श्रद्धास्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिरातील देवीची पूजा लिंगायत, गुरव, पाध्ये यांच्याकडून होते. देवी दर तीन वर्षांनी मुणगे, करविणेवाडी येथील पाडावे यांच्या घरी आपल्या लवाजम्यासहित माहेरवाशीण बनून राहायला येते. या गावातील ‘गावपळण’ प्रसिद्ध आहे. वैभववाडी तालुक्यापासून १४ कि. मी. अंतरावर असलेले शिराळे गाव! येथेही ‘गावपळण’ होते. साधारणत: जानेवारी महिन्यांत ही गावपळण होते. गाव सुना सुना होतो. त्यांची ‘गावपळण’ सात दिवसांची असते. दरवर्षी पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत शिराळेवासीय आपल्या लवाजम्यासह गाव सोडून नजीकच्या सडुरे गावाच्या हद्दीवर वास्तव्य करतात. हा त्यांच्यासाठी ‘सण’ असतो. त्यांची ग्रामदेवता दौडोबा. पाटील, मानकरी कौल घेतात. त्यानंतर गुराढोरांसह, लहान मुलांसह सर्वजण घर सोडून गावाबाहेर राहतात. विशेष म्हणजे मोकाट सोडलेली गुरे या गावपळणीच्या काळात गावाकडचा रस्ता विसरतात. तेथे पायही ठेवत नाहीत. गेली ४५० वर्षे ही ‘गावपळण’ येथे सुरू आहे. गावपळणीचा कालावधी संपला की भोरपी समाजाचा पारंपरिक ‘घोरीप’ खेळ सादर होतो. त्याला तेथे ‘नाडे घोरीप’ म्हणतात. गावचे गावपण बिघडू नये याची दक्षता गावकरी घेतात. गाव सोडून दुसर्‍या ठिकाणी राहणे या कल्पनेमागे गावकर्‍यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे. गावात सुख, शांती, समाधान लाभावे, एकोप्याची भावना प्रत्येकात निर्माण व्हावी या हेतूनेच ही ‘गावपळण’ होते. गावातील शेतकर्‍यांसाठी ही एकप्रकारची ‘टूर’ म्हणावयास हरकत नाही. गावातील ग्रामदैवतांशी बांधील असणारा हा समाज तेथील चालीरीती आणि शिस्तीचे पालन करतो. त्यातूनच सुख-समृद्धी प्राप्त होतील या आशेवरच तो जगतो. साभार : सिंधुदुर्ग स्वर्गाहून सुंदर ...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.