अर्थात दुसरं महायुद्ध सुरु असताना जपानी सैनिक इतक्या जवळ पोहोचल्याचं जाहीर झालं तर होणार्‍या परिणामांचा विचार करुन ब्रिटीश अधिकार्‍यांचं हे अनुमान दाबून टाकण्यात आलं! अर्थात अवघ्या काही महिन्यात आणि तेही बर्फाच्छादीत प्रदेशात केवळ हाडंच शिल्लक राहणं अशक्यंच होतं. काही संशोधकांच्या मते हे सांगाडे किमान शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे होते. काश्मिरचा सेनानी जनरल जोरावर सिंग आणि त्याची सेना १८४१ मध्ये तिबेटच्या मोहीमेवर गेलेली असताना गायब झाली होती. हे सांगाडे जनरल जोरावर सिंगाच्या त्या मोहीमेतील सैनिकांचे असावेत असं प्रतिपादन करण्यात आलं. परंतु जनरल जोरावर सिंग आणि त्यांच्या लष्कराचा ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीमुळे तिबेटमध्ये पराभव झाल्याचं नंतर निदर्शनास आलं. भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० च्या दशकात यापैकी काही हाडांचं कार्बन डेटींग पद्धतीने वय काढण्याचा प्रयत्नं करण्यात आला. अर्थात हे तंत्रज्ञात त्यावेळी इतकं प्रगत नसल्याने नेमका काळ सांगणं शक्यं नसलं तरी हे सांगाडे सुमारे १२ व्य ते १५ व्या शतकांच्या दरम्यानच्या कालवधीतील असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. जनरल जोरावरसिंग आणि त्याच्या लष्कराचे हे अवशेष नव्हते हे आपसूकच सिद्ध झालं. १२ - १५ व्या शतकादरम्यानच्या काळात हिंदुस्थानवर अनेक परकीय आक्रमणे झाली होती. अनेक इतिहास संशोधकांच्या मते महंमद तुघलकाने गढवालवर केलेला हल्ला अपयशी ठरला होता. खूप नुकसान सोसून त्याला ही मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली होती. रुपकुंडच्या परिसरातील सांगाडे हे तुघलकाच्या फौजेतील सैनिकांचे असावे असं मत मांडण्यात आलं. त्याच्या जोडीला हा चंगेजखानाच्या हल्ल्याचा फसलेला प्रयत्नं असावा असाही एक मतप्रवाह होता. कुमांऊ प्रदेशातील प्रचलीत लोककथेनुसार कनौजचा राजा जशधवल हा आपल्या गर्भवती पत्नी बालंपा आणि इतर लवाजम्यासह नंदादेवीच्या दर्शनास निघाला होता. कनौजच्या राजपुत्राचा येऊ घातलेला जन्मसोहळा साजरा करण्यापूर्वी नंदादेवीचं दर्शन घेण्याची राजा-राणीची मनिषा होती. नंदादेवीच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलासीपणा अथवा रंगेलपणा करु नये असा संकेत होता. परंतु राजा-राणीच्या ताफ्यात अनेक नर्तिकांचा समावेश होता. दर मुक्कामावर नृत्य-गायनाचे कार्यक्रम होत होते. आपल्या पवित्रं मुलखात हा नियमभंग झाल्याजने नंदादेवी कोपली आणि तिने या संपूर्ण जथ्यावर मोठ्या दगडांचा वर्षाव करुन त्यांचा नायनाट केला! या सांगाड्यांविषयीचा आणखीन एक तर्क होता तो म्हणजे एखाद्या विशिष्ट जमातीतील लोकांनी रुपकुंडच्या परिसरात सामुहीक आत्महत्या केली होती! हे सांगाडे हे त्या जमातीतील लोकांचे अवशेष होते! अर्थात या तर्काला कोणताही आधार मात्रं नव्हता. हा तिबेटी व्यापार्‍यांचा जथा असावा असाही एक तर्क होता. रुपकुंड सरोवराच्या परिसरात मृत्यू आलेले हे लोक नक्की होते कोण? नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांना मृत्यू आला होता? २००४ मध्ये नॅशनल जॉग्रॉफीकने या रहस्याचा छडा लावण्यासाठी एक शास्त्रीय मोहीम हाती घेतली. जर्मन मानववंशशास्त्रज्ञ विल्यम सॅक्स, पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ प्रमोद जोगळेकर आणि सुभाष वाळींबे, गढवाल युनिव्हर्सिटीचे फॉरेन्सिक शास्त्रज्ञ राकेश भट्ट आणि बिश्त अशा अनेक संशोधकांचा या मोहीमेत समावेश होता. त्यांच्या जोडीला मिडीटेकचे चंद्रमौली बासू हे देखील होते. या संशोधन मोहीमेचं संपूर्ण चित्रीकरण करण्याची जबाबदारी बासू यांच्यावर होती. या सर्व शास्त्रज्ञांनी रुपकुंड सरोवराला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि मानवी सांगाड्यांची काळजीपूर्वक पाहणी केली. रुपकुंडच्या तळाशीही अनेक मानवी अवशेष आढळून आले होते. यापैकी शक्यं तितक्या मानवी अवशेषांचे नमुने गोळा करण्यात आले. या सर्व नमुन्यांच निरीक्षण केल्यावर हा सामुहीक आत्महत्येचा प्रकार नव्हता हे सकृतदर्शनीच स्पष्टं होत होतं. काही सांगाड्यांवर अद्यापही मांसखंडाचे अवशेष, कातडी आणि कवटीवरील केस टिकून होते! या मोहीमेतून मिळालेले सांगाड्यांचे नमुने आणि त्यावरील पुढील संशोधनाअंती अनेक गोष्टींचा उलगडा झाला. कार्बन डेटींगच्या अत्याधुनिक संशोधनाद्वारे हे सर्वं सांगाडे सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे - इसवी सन ८५० च्या सुमाराला मरण पावलेल्या व्यक्तींचे होते! प्रत्येक कवटीवर फ्रॅक्चर झाल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या! कवटीवर जोरदार आघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हा आघात कोणत्याही शस्त्राने अथवा दरड कोसळल्यामुळे झालेला नव्हता. डोक्यावरील या जखमेव्यतिरीक्त इतर कोणत्याही जखमेच्या खुणा हाडांवर आढळून आल्या नव्हत्या. क्रिकेट किंवा गोल्फच्या चेंडूच्या आकाराच्या वस्तू थेट आकाशातून डोक्यावर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता! हे सर्व मृत्यू एकाच वेळेस झालेले होते! सुरवातीला हे सर्व मृतदेह तत्कालीन राजाच्या सैन्याच्या तुकडीचे असावेत असा अंदाज बांधण्यात आला. परंतु जास्तीत जास्तं अस्थींचं संशोधन केल्यावर त्यांच्यात स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता असं आढळून आलं. सुमारे ३०० वेगवेगळ्या व्यक्तींच्या अस्थी शास्त्रज्ञांना तिथे आढळून आल्या होत्या. तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केल्यावर या प्रदेशातून तिबेटकडे जाणारा कोणताही व्यापारी मार्ग अस्तित्वात नव्हता हे स्पष्टं झालं होतं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर हे सर्व जण यात्रेकरु असावेत या निष्कर्षावर सर्व शास्त्रज्ञांचं एकमत झालं. नंदादेवीच्या यात्रेच्या मार्गावर असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला होता. या सांगाड्यांवरुन हे सर्वजण दोन भिन्न जमातीतील लोक असल्याचंही आढळून आलं होतं. सांगाड्यांपैकी एका गटातील सांगाडे हे उंचापुर्‍या आणि मजबूत बांध्याच्या लोकांचे असल्याचं आढळलं. दुसर्‍या गटातील सांगाडे हे तुलनेने कमी उंचीच्या लोकांचे होते. शास्त्रज्ञांच्या मते उंच सांगाडे असलेले लोक हे यात्रेकरु होते. आपलं सामान वाहून नेण्यासाठी आणि या दुर्गम प्रदेशातून मार्गदर्शन करणार्‍यांसाठी त्यांनी स्थानिक जमातीतील वाटाड्ये आणि मजुरांची नेमणूक केली होती. आकाराने लहान असलेले सांगाडे हे या जमातीतील लोकांचे होते. तसंच या लहान सांगाड्यांच्या कवट्यांवर वर्षानुवर्षे डोक्यावरुन वजन वाहून नेल्यामुळे विशीष्ट खुणाही उमटल्या होत्या! सुरेश वाळींब्यांच्या संशोधनानुसार यापैकी अनेक व्यक्तींच्या मस्तकातील हाडांची ठेवण एकाच विशीष्ट प्रकारची होती. ही ठेवण पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांच्या सांगाड्यातही आढळून आली होती. यावरुन हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते असा निष्कर्ष निघाला. या सर्व सांगाड्यांची डि. एन. ए. टेस्टही करण्यात आली होती. या टेस्टचे निष्कर्ष तर आणखीनच विस्मयकारक होते. या सांगाड्यांपैकी अनेक व्यक्तींचे डी. एन. ए. एकमेकांशी तंतोतंत जुळत होते! हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते या वाळींब्यांच्या संशोधनाला त्यामुळे पुष्टीच मिळाली होती. हे सर्व डी. एन. ए. महाराष्ट्रात आढळून येणार्‍या एका विशीष्ट जातीच्या लोकांचे होते! चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण! रुपकुंडच्या परिसरात बळी पडलेल्या यात्रेकरुत महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राम्हण परिवाराचा समावेश होता! सरोवराच्या परिसरातून अनेक प्रकारच्या हाडांव्यतिरीक्त इतरही अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या होत्या. यात विविध प्रकारच्या लाकडी वस्तूंचा समावेश होता. तसेच एक भाल्याचा फाळ, चामड्यापासून बनवलेली पादत्राणंदेखील आढळून आली. या सर्व वस्तूदेखील १२०० वर्षांपूर्वीच्या असल्याचं कार्बन डेटींगद्वारे सिद्ध झालं. परंतु या सर्वांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आकाशातून नेमकी कोणती गोष्ट त्यांच्या डोक्यावर येऊन आदळली? आणि ती देखील इतक्या मोठ्या संख्येने? याचं उत्तर होतं मोठ्या आकाराच्या गारा किंवा बर्फाचे गोळे! क्रिकेटच्या बॉलच्या आकाराचे! सर्व संशोधनाचा एकत्रित विचार केल्यावर शास्त्रज्ञांनी नेमकी घटना काय घडली असावी याविषयी रुपरेषा मांडली... नंदादेवीच्या यात्रेसाठी निघालेले सर्व यात्रेकरु आणि त्यांनी बरोबर घेतलेले वाटाड्ये आणि मजूर रुपकुंड जवळ पोहोचले होते. पुढे मजल मारण्यापूर्वी पाणी भरुन घेण्यासाठी आणि थोडासा विसावा घेण्यासाठी सर्वजण उतार उतरुन रुपकुंडच्या काठी पोहोचले. दुर्दैवाने याच वेळी आभाळ फाटलं! मोठमोठ्या गारांचा जोरदार वर्षाव सुरु झाला. या परिसरात कोणताही आडोसा उपलब्ध नसल्याने गारांपासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्यापाशी उरला नाही. अचानक सुरु झालेल्या गारांच्या मार्‍यापासून बचावाची संधीच कोणाला मिळाली नसावी. सरोवर खोलगट भागात असल्याने जीव वाचवण्यासाठी पळून जाणं म्हणजे चढावरुन धावत सुटणं हा एकच मार्ग होता. परंतु काही हालचाल करण्यापूर्वीच वर्मी बसलेल्या गारांच्या आघातामुळे बहुतेकजण कोसळून मरण पावले. उतारावर मरण पावलेल्यांचे मृतदेह गडगडत येऊन सरोवरात कोसळले. कुमाऊं लोककथेतील नंदादेवीच्या शापामुळे दगडांचा पाऊस पडणे हा बर्‍याच अंशी श्रद्धेचा भाग असला तरी रुपकुंडच्या परीसरात मोठमोठ्या गारा पडल्याची अनेकदा नोंद करण्यात आली आहे. अशाच गारांच्या पावसाने या यात्रेकरुंचा आणि त्यांच्या सहाय्यकांचा बळी घेतला असावा. एक प्रश्न मात्रं बाकी राहतो तो म्हणजे यापैकी काही जण वाचले का? गारांचा अफाट पाऊस पडण्यास सुरवात झाल्यावर कोणताही आडोसा उपलब्ध नव्हता. पण यात्रेकरुंचं सामान तिथेच होतं. या सामानाखाली कोणी आश्रय घेतल्यास ते वाचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. स्थानिक वाटाड्ये आणि मजुरांना तर हे सहज शक्यं होतं. कदाचित काही जण वाचले असतील.. कदाचित सर्वजण प्राणाला मुकले असतील... हे यात्रेकरु नेमके होते तरी कोण? कोकणस्थ ब्राम्हणांच्या कुठल्या घराण्यातील होते? राजा जशधवलच्या घराण्यातील कोणाचा यात समावेश होता का? आजही रुपकुंडच्या परिसरात अनेक सांगाड्यांचे अवशेष आढळतात... आपल्या मृत्यूची नेमकी कहाणी सांगण्यास असमर्थ... एक दुर्दैवी घटनेचे बळी असलेले... संदर्भ :- स्पार्टाकस (मायबोली )
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.