हि पोस्ट तुम्हाला किळसवाणी वाटेल ..वा रागही येईल आमचा (म्हणजे पोस्ट करणा-याचा) पण जे खर आहे ते खर आहे ..... --------------------------------------- अघोरी (तांत्रिक, मांत्रिक) नेहमीसाठी लोकांच्या जीज्ञासेचा विषय ठरले आहेत. आघोरींचे जीवन जेवढे कठीण तेवढेच रहस्यमयी आहे. आघोरींची साधना सर्वात जास्त रहस्यमयी आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली, विधी आणि विधान आहे. ज्याला कशाचा घोर नाही अशा लोकांना अघोरी म्हणतात, म्हणजे एकदम सरळ आणि सहज असणे. मनामध्ये कोणाबद्दलही भेदभाव नसणारे. अघोरी प्रत्येक गोष्टीन समभाव ठेवतात. अघोरी सडलेले मांसही तेवढ्याच चवीने खातात, जेवढ्या चवीने पंचपक्वान खाल्ले जाते. अघोरींचे जगच नाही तर प्रत्येक गोष्ट निराळी आहे. ते ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला सर्वकाही देऊन टाकतात. अघोरींच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आम्ही तुम्हाला अघोरी लोकांच्या अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की, त्यांची साधना किती कठीण असते. तसेच काही स्मशानभूमींची माहिती सांगत आहोत, जेथे हे अघोरी मुख्य साधना करतात. - अघोरी मूलतः तीन प्रकारच्या साधना करतात. शिव साधना, शव साधना आणि स्मशान साधना. शिव साधना शवावर (मृत व्यक्तीचे शरीर) उभे राहून केली जाते. इतर विधी शव साधनेप्रमाणे असतात. या साधनेचे मूळ शिवच्या (महादेव) छातीवर पार्वतीने ठेवलेला पाय आहे. अशा साधनेमध्ये मृत शरीराला प्रसाद स्वरुपात मांस आणि मद्य (दारू) अर्पण केले जाते. - शव आणि शिव साधनेव्यतिरिक्त तिसरी साधना स्मशान साधना आहे. यामध्ये कुटुंबियांना सहभागी करून घेतले जाते. या साधनेमध्ये मृत शरिराएवजी शवपीठ (ज्या ठिकाणी शवावर दाह संस्कार केला जातो)ची पूजा केली जाते. त्या जागेवर गंगाजल अर्पण केले जाते. येथेसुद्धा प्रसाद स्वरुपात मांस आणि मद्य अर्पण केले जाते. - अघोरी मृतदेहांसोबत बोलतात हे फार कमी लोकांना माहिती असावे. ही गोष्ट ऐकायला किंवा वाचायला भलेही विचित्र वाटत असेल परंतु या गोष्टीला पूर्णपणे नाकारलेही जाऊ शकत नाही. अघोरींच्या विविध गोष्टी प्रसिद्ध आहेत, उदाहरणार्थ हे खूपच हट्टी असतात, एखाद्या गोष्टीवर अडून बसले तर पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. राग आल्यानंतर कोणत्याही थराला जाऊ शकतात. बहुतांश अघोरींचे डोळे लाल असतात. असे वाटते की, ते खूप रागात आहेत परंतु त्यांचे मन तेवढेच शांतही असते. काळे वस्त्र परिधान केलेले अघोरी गळ्यामध्ये धातुपासून तयार केलेली नरमुंडची माळ घालतात. - अघोरी सामान्यतः स्मशानभूमीतच वास्तव्य करतात. त्यांच्या झोपडीत एक धुनी सदैव पेटलेली असते. प्राण्यामध्ये हे केवळ कुत्रा पाळतात. त्यांच्यासोबत असणारे शिष्य त्यांची सेवा करतात. अघोरी वचनाला बांधील असतात. एखाद्या व्यक्तीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. अघोरी गायीचे मांस सोडून इतर सर्व प्राण्यांचे मांस खातात. मानवाच्या मलापासून ते मृतदेहाच्या मांसापर्यंत काहीही खातात. अघोरपंथामध्ये स्मशान साधनेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे स्मशानभूमीतच राहणे पसंत करतात. स्मशानभूमीत केलेल्या साधनेचे फळ लवकर प्राप्त होते. - स्मशानभूमीत सहसा कोणी जात नाही, त्यामुळे साधनेत विघ्न(अडथळे) येत नाहीत. त्यांच्या मनातील चांगल्या, वाईट गोष्टींचा भाव निघून जातो. अशा स्थितीमध्ये तहान लागल्यास हे स्वतःचे मुत्रही पितात. अघोरी सामान्य जगापासून दूर राहणेच पसंत करतात. ते स्वतःच्या जगातच मस्त राहणारे, दिवसा झोपणारे आणि रात्री स्मशान साधना करणारे असतात. हे सामान्य लोकांशी जास्त चर्चा करत नाहीत. अघोरी लोक जास्तीत जास्त वेळ सिद्ध मंत्राचा जप करण्यात घालवतात. - आजही असे अनेक अघोरी आणि तंत्र साधक आहेत, जे परशक्तींना वश करतात. या सर्व साधना स्मशानभूमीत होतात आणि जगामध्ये केवळ चार स्मशान घाट असे आहेत, जेथे तंत्र क्रियांचे फळ लवकर प्राप्त होते. हे चार स्मशान पुढीलप्रमाणे आहेत. 1. तारापीठ स्मशान (पश्चिम बंगाल), 2. कामाख्या पीठ (आसाम), 3. त्र्यंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र) आणि 4. उज्जैन (मध्य प्रदेश) तारापीठ हे मंदिर पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. येथे तारा देवीचे एक मंदिर आहे. या मंदिरात देवी कालीचे एक रूप तारा देवी स्वरुपात स्थापित आहे. रामपूर घाटपासून तारापीठ 6 किलोमीटरवर आहे. पौराणिक मान्यतेनुसार येथे देवी सतीचे नेत्र (डोळे) पडले होते त्यामळे या ठिकाण 'नयन तारा' असेही संबोधले जाते. तारापीठ मंदिराचा परिसर स्मशान घाटाजवळ स्थित आहे. या ठिकाणाला महास्मशान घाट या नावानेही ओळखले जाते. या स्मशानभूमीत जळणार्‍या चितेचा अग्नी कधीही विझत नाही असे मानले जाते. येथे येणार्‍या लोकांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. मंदिराच्या बाजूनेच द्वारका नदी वाहते. या स्मशानभूमीत साधना करण्यासाठी विविध तांत्रिक येतात. कामाख्या मंदिर आसामची राजधानी दिसपूरजवळ गुवाहाटीपासून 8 किलोमीटरवर कामाख्या मंदिर आहे. हे मंदिर एका पर्वतावर असून यांचे तांत्रिक महत्त्व आहे. प्राचीन काळापासून कामाख्या मंदिर तंत्र सिद्धीचे सर्वोच्च ठिकाण आहे. पूर्वोत्तर भागाचे मुख्यद्वार मानल्या जाणार्‍या आसाम राज्याची राजधानी दिसपूरपासून 6 किलोमीटर अंतरावर स्थित नीलांचल आणि नीलशैल पर्वतरांगांमध्ये स्थित देवी भगवती कामाख्याचे सिद्ध शक्तीपीठ सतीच्या 51 शक्तीपिठांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. येथे भगवतीची महामुद्रा(योनिकुंड) स्थित आहे. हे स्थान तांत्रीकांसाठी स्वर्गासमान आहे. त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात आहे.येथील ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरीचा उगम झाला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात तीन छोटे-छोटे लिंग आहेत. हे तिन्ही लिंग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक मानले जातात. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सातशे पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यानंतर रामकुंड आणि लक्ष्मणकुंड दिसते आणि सर्वात उंच पोहोचल्यानंतर गोमुखातून निघणार्‍या भगवती गोदावरीचे दर्शन होते. महादेवाला तंत्रशास्त्राचे देवता मानले जाते. तंत्र विद्यचे जन्मदाता महादेवच आहेत. येथील स्मशानभूमी तंत्र क्रियांसाठी प्रसिद्ध आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगामधील एक आहे. हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात स्थित आहे.स्वयंभू, भव्य आणि दक्षिणमुखी असल्यामुळे महाकालेश्वर पुण्यदायी मानले जाते. याच कारणामुळे महादेवाच्या या शहरात तंत्रशास्त्राचे फळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट

हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559