विमानाचा शोध कोणी लावला असा प्रश्न आला तर आपल्या तोडांत पटकन नाव येत ते अमेरिकेतील 'राईट बंधु' यांचं कारण शाळेत असताना आपल्याला हेच शिकवलं गेल आणि जास्त काही माहित असेल तर आपण त्याचं साल सांगतो १७ डिसेंबर १९०५. पण त्याच्या आठ वर्ष अगोदर एका मराठी व्यक्तीने विमानच यशस्वी उड्डाण करून दाखवलं त्यांचं नाव आहे 'शिवकर बापुजी तळपदे ' शिवकर बापुजी तळपदे याचा जन्म मुंबईतील चिरा बाजार येथे सन १८६४ साली झाला. त्यांनी संस्कृत आणि वेदांचा अभ्यास केला. विमानशास्त्रात त्यांना रुची होती. आपल्या देशात विमानशास्त्राचे सर्वात मोठे वैद्यानिक मानले जातात ते महर्षी भारद्वाज त्यांनी विमान शास्त्रावर आधारित सर्वात पहिले पुस्तक लिहिले तेही जवळपास १५०० वर्षांपूर्वी आणि त्यानंतर शेकडो पुस्तके लिहली गेली, पण त्यांचे मूळ पुस्तक शिवकर बापुजी तळपदे याना मिळाले त्यानी ते पुस्तकाचे पान अन पान वाचून काढले. या पुस्तकात आठ अध्याय आहेत आणि त्यामध्ये विमान बनवण्याचे सर्व तंत्रज्ञान आहे, आठ अध्यायात जवळपास १०० खंड आहेत ज्यामध्ये सर्व विस्तारित माहिती दिली आहे, आणि महर्षी भारद्वाज यांनी विमान बनवण्याचे ५०० सिद्धांत दिले आहे आणि त्यातील एका सिंधान्तावर एक विमान बनवता येते, या ५०० सिंधान्तावर ३००० श्लोक आहेत. प्रत्येक तंत्र विकसित करण्यासाठी जी प्रोसेस असते तशीच या प्रत्येक तंत्राला ३२ प्रकारची प्रोसेस आहे, असा हा भला मोठा ग्रंथ शिवकर बापुजी तळपदे यांनी वाचून काढला, आत्मसात केला आणि त्यावर त्यांनी प्रयोगही केले. त्यानीं शेवटी यशस्वीरित्या एक विमान बनवले ज्याच नाव 'मारुतसखा' असं ठेवलं ते विमान १८९५ साली त्यांनी मुंबईतील जुहु येथील समुद्रकिनाऱ्यावर १५०० फुट उंच उडवले आणि ते यशस्वीरित्या खाली सुधा उतरवले, ते विमान मानवरहित होते - त्यामध्ये कोणी बसले नव्हते आणि त्याचा पूर्ण कंट्रोल शिवकर तळपदे यांच्याकडे होता, त्या विमानाला जमिनीवर उतरवत असताना कोणतीही हानी झाली आणि आणि त्यामध्ये आग सुद्धा लागली नाही हे विशेष होते. हा प्रयोग पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते, त्यामध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री महादेव गोविंद रानडे आणि गुजरात बदोडा येथील संस्थानिक श्री महाराजे गायकवाड यासह विसेक मान्यवर लोक होते. हे पाहिल्यानंतर लोकांनी शिवकर तळपदे यांना लोकानी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं, महाराजे गायकवाड यांनी त्यांना एका जहागीर बक्षीस भेट देऊ केली तेव्हा शिवकर तळपदे आपण अशी अनेक विमान बनवू शकतो मात्र आपली आर्थिक स्तिथी ठीक नसल्याचे सांगितले. आणि तेथे उपस्थित लोकांनी भरपूर पैसा गोळा केला, त्याना आता आणखी विमान बनवण्यासाठी मदतीची गरज नव्हती. तेव्हा त्यांच्याबरोबर एक धोखा झाला तो म्हणजे तेव्हा ब्रिटिश राजवट होती त्यांची एक कंपनी होती 'रयाली ब्रदर्स'. ती कंपनी शिवकर तळपदे यांच्याकडे आली आणि त्यांनी विमान बनवण्याचे 'drawing' त्यांना मागितले साहजिकच त्यांनी प्रश्न केला कशासाठी? तर 'रयाली ब्रदर्स' यांनी हे आपण तंत्र विकसित करू आणि हवी असलेली आर्थिक मदत कंपनीकडून देऊ असे आश्वासन दिले आणि एक समझोता करून घेतला, तळपदे हे खूप साधे गृहस्थ होते त्यांनी यावर विश्वास ठेवला आणि ते डिझाईन आणि 'drawing' घेऊन कंपनी लंडनला गेली आणि शिवकर तळपदे आणि कंपनी मध्ये झालेला समझोता दोन्ही विसरली. 'रयाली ब्रदर्स' कंपनीकडून ते डिझाईन आणि 'drawing' लंडनहून अमेरिकेतील राईट बंधु च्या हाथी आले आणि त्यावरून राईट बंधुनी विमान बनवले आणि आपल्या नावाने सर्व जगात रजिस्ट्रर केले. शिवकर तळपदे यांचं दुर्दैव कि त्यानी या कंपनी वर विश्वास ठेवला. राईट बंधुनी हे बनवलेले विमान १७ डिसेंबर १९०५ रोजी अमेरिकेतील 'साउथ क्यारोलिना' समुद्राजवळ उडवले जे फक्त १२० फुट उडाले आणि ते जमिनी वर कोसळले. आज जरी तांत्रिकदृष्ट्या विमान आणि त्याचे प्रकार खूप प्रगत झाले असले तरी त्याचा मुळ जनक त्यापासून वंचित राहिला. आजवर आपल्या देशातील बहुसंख्य लोकांची हीच शोकांतिका आहे कि हुशारी, असामान्यत्व असून त्यांना वाव मिळत नाही. हे सर्व समजल्यानंतर अस वाटत लहान मुलांच्या धड्यात सर्व चुकीची माहिती काढून टाकावी आणि त्यामध्ये अजून एक माहिती अशी टाकावी कि विमानाचा शोध 'शिवकर तळपदे' या भारतीय व्यक्तीने लावला. तळपदे यांनी त्यांची कलाकृती महादेव गोविंद रानडे यांनाही दाखवली होती; पण याच दिवसांत तळपदे यांच्या पत्नीचे निधन झाले आणि विमानाच्या पुढील आविष्काराकडे तळपदे यांचे दुर्लक्ष झाले. पुढे १७.९.१९१७ ला शिवकर तळपदे यांचेही देहावसान झाले. इ.स. १८९५ साली उडालेले मरुत्सखा हे विमान त्याचे आराखडे, विमान रचनेची टिपणे, सांगाडा, आणखी बर्‍याच टिपण वह्या त्यांच्या वंशजांकडे होत्या. त्या पाश्‍चात्त्यांनी बळकावल्या. त्यानंतर त्यांच्या वारसदारांनी विमानाचे मॉडेल राईट ब्रदर्स या ब्रिटीश कंपनीला विकून टाकले. त्यावरून राईट बंधूंनी विमान उड्डाण केले. पहिल्या विमानाची निर्मिती करण्याचा मान मराठी माणसाचा असूनही तो राईट ब्रदर्स या ब्रिटिशांना दिला जाणे, ही निश्‍चितच खेदाची बाब असल्याचे गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे शिवकर तळपदे यांच्या अखेरपर्यंत (१९१६) आणि मृत्यूनंतर हे 'मारुतसखा' विमान त्यांच्या घरी ठेवण्यात आले, पुढे ते विलेपार्ले येथे 'मारुतसखा' विमानाचे model प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. यां संबधित चा एक दस्तेवज हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने जतन करून ठेवला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.