माफ करा आजची ही पोस्ट दैवी शक्तीं बद्दल किंवा अध्यात्मिक नाही आहे पण काही घटना पृथ्वीतलावर अशा घडल्या आहेत की त्यांच्या अस्तित्वा बद्दल प्रश्न उभा राहतो ...... -------------------------------------- अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींचे अनुभव अनेकदा जहाजांच्याच वाट्याला येत असले तरी यात एका पाणबुडीचाही समावेश आहे - यूबी-६५ !! पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल्यावर जर्मनीने ज्या अनेक पाणबुड्या बांधण्यास सुरवात केली त्यापैकी एक म्हणजे यूबी-६५. १९१६ मध्ये या हॅम्बुर्ग इथे या पाणबुडीचं बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच या पाणबुडीवर ती शापित असल्याचा शिक्का बसण्यास सुरवात झाली. पाणबुडीचा मुख्य सांगाडा बांधण्याचंं काम सुरु झाल्यावर आठवड्याभरातच सांगाड्याला आधार देणारे दोरखंड तुटून वर असलेला भाग दोन कामगारांवर कोसळला! एक कामगार तत्काळ मरण पावला तर सुमारे तासभर त्या अवजड सांगाड्याखाली अडकून वेदनेने तडफडून दुसर्‍या कामगाराचा मृत्यू झाला! पाच आठवड्यांनी पाण्याखाली असतान इंजिनला चालना देणार्‍या बॅटर्‍यांची चाचणी सुरू असताना एका बॅटरीतून विषारी क्लोरीन वायूची गळती सुरु झाली! या तडाख्यात सापडून इंजिनरुममध्ये काम करणारे तीन कर्मचारी गुदमरुन घुसमटून प्राणाला मुकले! या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करण्यात आली, परंतु त्यातून कोणतंही निष्पन्नं झालं आही! सुदैवाने आणखीन कोणतीही अडचण न येता पाणबुडीचं बांधकाम पूर्ण झालं. बांधून पूर्ण झाल्यावर आपल्या सरावाच्या पहिल्याच सफरीवर निघालेली असताना पाणबुडी कोणत्याही पूर्वसूचनेविना अकस्मात वाद्ळाच्या तडाख्यात सापडली. कोनींग टॉवरवरुन टेहळणी करणारा टेहळ्या या वादळात डेकवर कोसळला आणि समुद्रात गडप झाला! पाण्यात बुडी मारल्यावर बॅटरीतून वायूची गळती होण्यास सुरवात झाली! पुढचे बारा तास अथक परिश्रम करुनही पाणबुडीवरील नौसेनिकांना गळती थांबवण्यात यश आलं नव्हतं! ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अत्यंत गंभीर परिस्थिती ओढवली होती. बारा तासांनी अचानक पाणबुडी धाडकन् सागरपृष्ठावर येऊन पोहोचली आणि बॅटरीतून होणारी गळती पूर्ण थांबली! या खेपेसही चौकशीतून काहीही निष्पन्नं झालं नाही! सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पाणबुडीचा जर्मन नौदलात समावेश करण्यात आला. आपल्या पहिल्या कामगिरीवर निघण्यापूर्वी आवश्यक तो दारुगोळा पाणबुडीवर चढवण्यास सुरवात झाली. टॉर्पेडो चढवले जात असतानाच दारुगोळ्याचा स्फोट होऊन अनेक नौसेनिक जखमी झाले. सेकंड ऑफीसर लेफ्टनंट रिचर या स्फोटात मरण पावला! या अपघाताच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पाणबुडीची पहिली मोहीम काहीशी लांबवण्यात आली. अखेर एकदाची पाणबुडी पहिल्या सफरीवर निघण्यास सज्ज झाली! पाणबुडीवरील टेहळ्याने किनार्‍यावरुन पाणबुडीवर येणार्‍या फळीकडे सहजच नजर टाकली आणि दिसलेलं दृष्यं पाहून तो नखशिखांत हादरला! लेफ्टनंट रिचर फळीवरुन सावकाश पावलं टाकत पाणबुडीवर चढत होता! कॅप्टन मार्टीन स्चेलला गाठून टेहळ्याने हे त्याच्या कानावर घातलं. टेहळ्या कॅप्टनशी बोलत असतानाच पाणबुडीचा गनर तिथे येऊन पोहोचला. किनार्‍यावरुन पाणबुडीकडे येणार्‍या फळीवरुन सेकंड ऑफीसर रिचर आपल्या पुढेच चालत पाणबुडीवर आल्याचं त्याने पाहीलं होतं! कोनींग टॉवरच्या दिशेने गेल्यावर सेकंड ऑफीसर हवेत विरघळून नाहीसा झाला! आपल्या पहिल्या कामगिरीवर पाणबुडी बेल्जीयमच्या किनारपट्टीच्या जवळ गस्त घालू लागली. लवकरच पाणबुडीला आपलं पहिलं लक्ष्यं नजरेस पडलं. दोन टॉर्पेडो मारुन तिने एका मालवाहतूक करणार्‍या जहाजाला जलसमाधी दिली. आणखीन दोनच दिवसांनी पाणबुडीच्या नजरेस जहाजांचा एक काफीला दिसला. टॉर्पेडो मारुन आघाडीवरील जहाजाची पाणबुडीने यशस्वी शिकार केली परंतु.... इंजिन रूममधील कर्मचार्‍यांना एक थरकाप उडवणारं दृष्यं दिसलं. सेकंड ऑफीसर लेफ्टनंट रिचर इन्स्ट्रूमेंट पॅनलच्या शेजारी त्याची नेमणूक असलेल्या जागी शांतपणे उभा होता! काही क्षणांनी तो हवेत विरुन जावा तसा अदृष्य झाला! इंजिनरुम मधील कर्मचारी लेफ्टनंट रिचरला पाहून इतके हादरले होते, की त्यांच्यापैकी काही जणांनी आपल्याला दुसर्‍या जागी काम देण्याची कॅप्टनला विनंती केली! कॅप्टन मार्टीन स्चेलने या सर्व प्रकरणाचा सखोलपणे विचार केला. पाणबुडीवरील कामगिरी ही अत्यंत जोखिमीची असते. त्यादृष्टीने सर्वांचं मनोबल टिकवून धरणं हे अतिशय महत्वाचं होतं. सेकंड ऑफीसर रिचरच्या अस्तित्वामुळे पाणबुडीवरील सर्वांच धैर्य गळाठलं होतं. या परिस्थितीवर तोडगा म्हणन कॅप्टन स्चेलने लेफ्टनंट रिचरबद्दल कोणतीही चर्चा करण्यास सर्वांना सक्तं मनाई केली! लेफ्टनंटच्या अस्तित्वाचा अनुभव आला तरीही त्याची कोणतीही वाच्यता अथवा चर्चा न करण्याची त्याने सर्वांना ताकीद दिली. पाणबुडीची मोहीम लष्करीदृष्ट्या यशस्वी ठरत होती. पाणबुडीवर असलेल्या लेफ्टनंट रिचरच्या अस्तित्वाविषयी नौसेनिकांना कोणतीही शंका नव्हती. एकदा कामगिरीवर असताना इंग्लिश बोटींना या पाणबुडीचा पत्ता लागला. त्यांनी डेप्थ चार्जेसचा मारा पाणबुडीवर करण्यास सुरवात केली. या मार्‍यातून वाचण्यासाठी पाणबुडीने खोल समुद्रात बुडी मारली. पाणबुडीच्या अंतर्भागात हिरव्या रंगाचा प्रकाश सर्वत्रं पसरला होता. अनेकांना त्यात सेकंड लेफ्टनंट्ची आकृती नजरेस पडली होती. मात्रं त्यावेळी कोणीही कॅप्टनकडे या घटनेची वाच्यता केली नाही. १९१८ च्या जानेवारी महिन्यात यूबी-६५ इंग्लिश खाडीत पोर्टलँड बिलच्या परिसरात गस्तं घालत होती. दोन दिवसांत कोणतंही लक्ष्यं न दिसल्याने कॅप्टनने टेहळ्याला कोनींग टॉवरमधून नजर टाकण्याची सूचना केली. कॅप्टनच्या सूचनेप्रमाणे टेहळ्याने वर जाऊन खाली नजर टाकली मात्रं... कोनींग टॉवरच्या बरोबर खालीच एक आकृती त्याच्या नजरेस पडली! कोनींग टॉवरची हॅच वगळता पाणबुडीची एकूणएक झडप बंद होती. त्याच वेळी त्या आकृतीने वळून त्याच्या दिशेला पाहीलं... सेकंड ऑफीसर लेफ्टनंट रिचर! लेफ्टनंट रिचर नजरेस पडताच टेहळ्याने खाली धूम ठोकली आणि घडला प्रकार कॅप्टनच्या कानावर घातला. वैतागलेल्या कॅप्टनने स्वतःच या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं आणि टेहळ्यासह तो कोनींग टॉवरवर परतला. लेफ्टनंट रिचर अद्यापही शांतपणे आपल्या जागी उभा होता. त्याची नजर कोनींग टॉवरच्या दिशेने रोखलेली होती. कॅप्टन स्चेल हा प्रकार पाहून स्तंभित झाला. आतापर्यंत त्याने ऐकलेल्या एकाही कथेवर त्याने विश्वास ठेवला नव्हता, परंतु आता प्रत्यक्षात लेफ्टनंट रिचर नजरेस पडल्यावर त्याला विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नव्हता! कॅप्टन स्चेल आणि टेहळ्या कोनींग टॉवरवरुन पाहत असतानाच लेफ्टनंट रिचर पाणबुडीच्या पुढच्या टोकाशी गेला आणि हवेत विरळत अदृष्यं झाला! कॅप्टन स्चेलने आपली मोहीम आवरती घेतली आणि तळ गाठला! लेफ्टनंट रिचरच्या घटनेचा रिपोर्ट त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केला. सुरवातीला जर्मन नौदलातील कोणाचाही या घटनेवर विश्वास बसला नाही. परंतु पाणबुडीवरील प्रत्येक नौसैनिकाशी स्वतंत्रपणे चौकशी केल्यावर लेफ्टनंट रिचरविषयीच्या अनुभवात काहीतरी तथ्यं असावं अशी नौदल अधिकार्‍यांची खात्री पटली असावी. पाणबुडीवरील कॅप्टनसह सर्व नौसेनिकांची इतरत्रं बदली करण्यात आली. या घटनेविषयी गुप्तता बाळगण्याचं त्यांना बजावून सांगण्यात आलं. त्यानंतर जर्मन नौदलाने उचललेलं पाऊल अगदीच अनपेक्षीत होतं. एका धर्मगुरुकरवी पाणबुडीची शापातून सुटका होण्यासाठी विधिवत प्रार्थना करण्यात आली. धर्मगुरुने पाणबुडी कोणत्याही शापातून तसेच लेफ्टनंट रिचरपासून मुक्तं झाल्याचं सांगितल्यावर नवीन कॅप्टन आणि नौसेनिकांसह पाणबुडी पुन्हा कामगिरीवर निघाली. कॅप्टनचा अपवाद वगळता नवीन खलाशी आणि अधिकार्‍यांपैकी कोणालाही पाणबुडीचा इतिहास माहीत नव्हता. सुरवातीचे काही दिवस कोणतीही अडचण आली नाही. १९१८ च्या मे महिन्यात इंग्लिश जहाजांचा मागोवा घेत असताना चीफ पेटी ऑफीसरला एक विलक्षण दृष्यं दिसलं. आपल्या बंकरवर तो विश्रांती घेत पडलेला असताना लेफ्टनंटच्या दर्जाचा एक अधिकारी बंकरमधून बाहेर पडून टॉर्पेडो रुममध्ये शिरलेला त्याच्या नजरेस पडला. पेटी ऑफीसरने त्या लेफ्टनंटला पूर्वी कधीही पाणबुडीवर पाहीलेलं नव्हतं. कुतूहलाने टॉर्पेडो रुममध्ये शिरुन त्याने शोध घेतला, परंतु तो अधिकारी अदृष्यं झाला होता! आपला अनुभव चीफ पेटी ऑफीसरने कॅप्टनच्या कानावर घातला. दोनच दिवसांनी टॉर्पेडो गनरच्या आरोळ्यांनी पाणबुडी दणाणून गेली. एका अज्ञात आकृतीने त्याला धक्का देऊन कंट्रोल पॅनलपासून बाजूला ढकललं होतं! टॉर्पेडो गनर इतका प्रक्षुब्ध झाला होता, की त्याला एका बंकरमध्ये बंदिस्तं करुन ठेवण्यात आलं. परंतु दुसर्‍याच दिवशी त्याने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि डेक गाठून समुद्रात उडी टाकली! १० जुलै १९१८ या दिवशी आयर्लंडच्या किनार्‍याजवळ गस्तं घालणार्‍या अमेरिकन पाणबुडीला दूर समुद्रात अंतरावर एक वस्तू नजरेस पडली. सुरवातीला तो एखाद्या बुडालेल्या जहाजाने सोडलेला बुऑय असावा अशी अमेरिकन अधिकार्‍यांची कल्पना झाली. परंतु जवळ जाऊन निरीक्षण केल्यावर ती एक जर्मन पाणबुडी असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. पाणबुडी कोणाचंही नियंत्रण नसल्यासारखी हेलकावे घेत होती. अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो हल्ल्याच्या दृष्टीने योग्य ती पोझीशन घेतली. परंतु टॉर्पेडो सोडण्यापूर्वीच जर्मन पाणबुडीवर एक प्रचंड स्फोट झाला! स्फोटामुळे निर्माण झालेल्या लाटेच्या तडाख्याने अमेरिकन पाणबुडीदेखील गदागदा हलली! स्वतःला सावरुन अमेरिकन अधिकार्‍यांनी पेरिस्कोपमधून नजर टाकली. जर्मन पाणबुडी पुढच्या बाजूने पाण्याखाली जात हळूहळू दिसेनाशी झाली. पाणबुडीच्या ब्रिजवर लेफ्टनंटच्या दर्जाचा एक जर्मन अधिकारी हाताची घडी घालून शांतपणे उभा होता! त्याची नजर अमेरिकन पाणबुडीच्या पेरिस्कोपच्या दिशेने रोखलेली होती. पाणबुडीचा ब्रिज पाण्यात जाण्यापूर्वी अमेरिकन अधिकार्‍यांच्या नजरेसमोर तो अदृष्यं झाला! अमेरिकन पाणबुडीवरील अधिकार्‍यांनी दिवसभर शोध घेतला, परंतु स्फोटाचं कारण अथवा पाणबुडीवरील ३४ नौसेनिकांपैकी एकही जण जिवंत अथवा मृत त्यांना आढळून आला नाही! सेकंड ऑफीसर लेफ्टनंट रिचर त्यानंतर कधीही कोणालाही दिसला नाही! साभार :- मायबोली - स्पार्टाकस
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट

हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559