शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये

Author:संकलित

देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये गावात इतिहासकालीन श्री देव रामेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला व स्वयंभू रामेश्वराच्या पिंडीला दैदिप्यमान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. भक्तांना पावणारा व संकटाचे निवारण करणारा म्हणून या देवस्थानाचा लौकिक आहे. पंचक्रोशीतील पवित्र व जागृत देवस्थान आहे. या देवस्थान आहे. या देवस्थानची ख्याती सिंधुदुर्गप्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, गोवा या भागातही पसरली आहे. या ठिकाणाचे भाविक हजारोंच्या संख्येने श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात. रामेश्वर मंदिराचा जवळ जवळ 300 वर्ष जुना इतिहास आहे. मंदिराची बांधणी कोकणातल्या सर्व मंदिरांपेक्षा वेगळी अशी आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. हे मंदिर खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून मंदिर दिसत नाही.रस्त्यावरून फक्त मंदिराची हल्लीच्या काळातच रंगवलेली कमान दिसते. कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजुन एक छोटी कमान दिसते. त्या कमानीला एक मंदिराच्याच वयाची घंटा लावली आहे. त्या भव्या कमानीतून आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग बनविलेला आहे. खाली उतरून गेल्यावर आत शिरताच मंदिराच्या आवारात 5-6 दीपस्तंभ दिसतात. कौलारू मंदिराच्या चारी बाजूस घनदाट झाडी आणि जंगल आहे. आत शिरल्यावर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेले त्या काळ्चे कोरीव काम देखील लक्ष वेधून घेणारे आहे. गाभार्यात शिरल्यावर आत मध्ये अजुन एक छोटा गाभारा आहे त्यात प्राचीन काळीन शंकराची पिंडी दिसते. बाहेर एक भव्य नंदी आहे. उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवारा आहे, त्यात पुर्वी रामेश्वराची नंदीवर स्वार झालेली सुमारे 3 फुट उंच 50 व किलो वजनाची शुध्द चांदीची बनवलेली,चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती ती आता तिथून हलवण्यात आली आहे.. तेथील पुरातनकाळाचे साक्षात्कार देणारे देखावे, चोहोबाजूंच्या उत्तुंग कडा, ऐतिहासिक दस्तऐवज, प्रत्येक पावलावर येथे इतिहासाची वैशिष्टये भरलेली आहेत. याच मंदिराच्या परिसरात आंग्रेंच्या घराण्यातील सती गेलेल्या सखीची समाधी, मंदिराच्या चार दिशांचेचार बंगले, मंदिराच्या प्रवेशद्वारी बांधलेली कमान, भव्य बंगली आणि रामश्वराची मन आकर्षून घेणारी मनोहारी चांदीची मूर्ती या सर्व गोष्टी म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्हींचा सुंदर संगम होय. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे. इतिहास :- इ. स. १६ व्या शतकात मंदिराची स्थापना झाली असावी. मंदिराच्या वास्तूस्वरूपावरून या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा करण्यात आला. इ. स. १६ शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी देवस्थानाच्या मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा उभारला आहे. त्याच कालावधीत कान्होजी आग्रेंचे पुत्र सरखेल संभाजी व सखोजी आंग्रे यांनी गाभाऱ्यापुढे कलाकुसरीने मढविलेला लाकडी चार खांबांचा सुंदर मंडप उभारला आहे. सभोवताली प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले. मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम व दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली आहेत. इ. स. १७६३ साली माधवराव पेशवे यांनी सरदार आनंदराव धुळप यांना आरमार सुभ्याचे प्रमुख नेमले तर इ. स. १७७५ साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी गंगाधर पंत भानू यांना विजयदुर्ग प्रांताचे मुलखी सुभेदार नेमले. इ. स.१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सरकार आनंदराव धुळप व गंगाधरपंत भानू या उभयतांनी रामेश्वर मंदिरात बरीच कामे केली. सुभेदार गंगाधरपंत यांनी पुन्हा इ. स. १७८० च्या सुमारास मंदिरासमोर अत्यंत देखणा लाकडी सुरुदार खांब व महिरीपी कमानीने सजविलेला भव्य सभामंडप उभारला. सन १८२७ साली अनंतराव धुळप यांनी इंग्रजांच्या गलबताचा पाडाव करून जप्त केलेल्या एका जहाजावर अजस्र घंटा सापडली. त्या गलबतावरील आणलेली घंटा आनंदराव धुळपांचे वारस कृष्णराव धुळप यांनी ती घंटा इ.स. 1827 साली रामेश्वरला अर्पन करून मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजही चांगल्या स्थितीत आहे. सध्या त्या मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असलेली दीड मणाची घंटा धुळपांचा शौर्याची आजही साक्ष देत आहे. तसेच मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठ्यांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी व छत्री आहे. या मंदिराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पेशवे कालीन चित्रे. मराठा शैलीतील ही चित्रे अतिशय दुर्मिळ आहे. मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. श्री देव रामेश्वर मंदिर कोकणी व पेशवाई वास्तुशिल्प शैलीचा मिलाफ दर्शविणारा देखणा वास्तूविष्कार असून अशी मंदिरे अभावानेच आढळून येतात. .... संकलण :-Dipesh Ghadigaonkar.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

जिन्न

आयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!