naustrademus ने लिहील आहे की , " माझ्या कानांवर पडणाऱ्या भाकितांचा प्रभाव एवढा आहे, की सर्व भाकिते उघड करण्याचे धाडसच होत नाही . " naustrademus ने आपल्या सीझर या पुत्राला उद्देशून एक अर्पण पत्रिका लिहिली . त्यात हा दाष्ट्र म्हणतो की " मी भाकीत वर्तवत आलो , पुढे तसेच घडल्याचे अनुभवला आले . नजीकच्या आणि दीर्घकाळच्या भकितन्बद्दल मौन पाळाव अस मला वाटत . आज अस्तित्वात असलेली राष्ट्रे , धर्म आणि पंथ यांच्या बाबतीत मी विपरीत भाकीत क्ले तर ते आजच नष्ट केले जाइल . माझ्या भाकितांचे पुस्तकच ते पुढच्या पिढीसाठी ठेवणार नाहीत आणि म्हणूनच मी ही सर्व भाकिते गूढ व सांकेतिक भाषेक लिहिली आहेत ." " मला भविष्यात घडून येणाऱ्या घटना , घटनेला जबाबदार व्यक्तींची नावे , तारीख आणि तपशील सांगता येईल ; पण मला असे करता येणार नाही . " १९९९ ते २०२५ हा भाग naustrademus च्या दृष्टीने कमालीचा उलथापालथीचा आहे. म्हणुनच आपल्या भकितान पैकी जवळजवळ ६० टक्के त्याने याच कालखंडा साठी खर्च केले *** १९०० ते १९९९ हा सर्वात जास्त रक्तलांच्छित कालखंड होता . त्यात २ महायुद्धे झाली . याचा naustrademus च्या भाकीतांत सूचक उल्लेख आहे . भारता संबधी ही अनेक घटना त्याने आधीच वर्तवल्या होत्या . त्यात शिवाजी महाराज , १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध , म. गांधी , देशाची फाळणी , इंदिरा व राजीव गांधी यांची हत्या या घटनांचा उल्लेखही त्याने सांकेतिक भाषेत केला आहे . जागतिक पटावरची प्यादीही अशी हलत आहेत , कि संघर्ष आता अटळ आहे , हे सुचित होत आहे . हे तसरे महायुध्द किती भयानक असेल याचे naustrademus ने केलेले वर्णन थरकाप उडवणारे आहे . त्यावर त्याने तब्बल २७० श्लोक लिहिले आहेत . रशिया आणि अमेरिका विरुद्ध चीन व अरब राष्ट्रे यांच्यात कमालीचे विनाशक आणि विश्व हादरवून टाकणारे युद्ध छेडले जाईल .यातील महत्वाचे संघर्ष युरोपच्या भूमीवर होतील . या युद्धात अण्वस्त्रे , जंतू अस्त्रे , रासायनिक अस्त्रे यांचा बेहिशोबी वापर होईल . जगातील प्रत्येक देशावर याचा काहीना काही परिणाम होणारच . भारतालाही त्याची झाल सोसावी लागणार आहे . या तिसर्या महायुद्धाचे वर्णन naustrademus ने अत्यंत विलक्षण रीतीने केले आहे आणि ते त्याच्या दहाही ' सेञ्च्युरिज मध्ये पसरलेले आहे. ते एकत्र केले तर पंधराव्या शतकात मागमूसही नसलेल्या ; पण आज अस्तित्वात आलेल्या अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख आहे , हे लक्षात येईल , पहिल्या शतकाच्या २९ व्या श्लोकात तो म्हणतो की " एक मासा असा उत्पन्न होईल , की जो पाण्यावरून व जमिनीवरून सारख्याच वेगाने पळेल . त्याची उत्पत्ती विदेशी भूमीवर झाली असेल . हा मासा भयानक आग ओकेल . हा सर उल्लेख पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे याचा आहे . ' पौलेरीज ' आणि ' सबरोक ' ही क्षेपणास्त्रे अमेरिकेत विकसित केली गेली असून ती खोल समुद्रात , भूमीवर व अवकाशात वापरता येतात . " नागासाकी व हिरोशिमावरील अग्निवर्षाव , पिनाटुबो ज्वालामुखी जागृत होणे , माणसाने चंद्रावर जाणे या सार्या घटना naustredemus च्या भाकीतांप्रमाणे तंतोतंत खर्या ठरल्या . *** naustredemus ने नवव्या सेञ्चुरिज च्या ५१ व्या श्लोकात म्हंटले आहे , " लाल शक्ती विरुद्ध सगळे एकत्र येतील. जल - स्थळ व अवकाशाद्वारे युद्ध होईल . शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कमी पडतील . या महविनशात एकच अपवाद वगळता सारेच विनाशग्रस्त होतील . " याचा अर्थ तिसरे महायुद्ध चीन सुरु करणार असे naustradmus ने स्पष्ट म्हंटले आहे , आता लाल शक्ती म्हणावा असा एकच देश उरला आहे . चीन मध्ये लाल रंग , लाल पुस्तक आणि लाल ध्वज याचे प्रचंड प्रस्थ आहे . या लाल शक्ती विरुद्ध तारे एकत्र येतील असा उल्लेख आहे . चीन हा कायम खिश्चन धर्माचा कायम विरोधक राहिला आहे . १९९९ - २००० च्या सुमारास पोप आशिया खंडात येउन गेले ; पण चीनने त्यांना आपल्या भूमीवर पाय ठेऊन दिला नाही हे लक्षात घेतले पाहिजे . naustrademus च्या भाकितांमध्ये वारंवार ३ ख्रिस्त विरोधकांचा वारंवार उल्लेख येतो . त्यात पहिला नेपोलियन , दुसरा हिटलर आणि तिसरा चेगीझखान आठवण करून देणारा , तिसरे महायुद्ध सुरु करणारा हा चिनी नेता . naustrademus च्या सेञ्चुरिज चे अनेक भाष्यकार आहेत . पण त्या सर्वांमध्ये तिसरे महायुद्ध , महान भारतीय नेता आणि इतर बाबतीत बहुतेकांचे बहुमत आहे . पण तो काल इ.स. १९९९ ते २०२५ हा असेल यावर त्यांची एकवाक्यता दिसून येत नाही . पण बहुतेकांच्या मते २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात या घटना घडतील हे ठाम आहे . naustrademus ने नेपोलियन चा उल्लेख सांकेतिक भाषेत केला होता . हिटलरचा 'हिल्लर' म्हणून . तसेच विविध क्षेपणास्त्रे , पाणबुड्या यांचा अतिशय संदिग्ध भाषेत केलेला आढळतो . एरिका चिथेम या naustrademus वरच्या नमन्तिक भाष्यकार आहेत .त्यांनी भाकितांवर त्या बोलतात की " या युद्धाची सुरवात new york वरच्या हल्याने होईल . newyork वर बोंब व रसायनांचा मारा होईल . " सहाव्या शतकातील ९७ व्या श्लोकात naustrademus म्हणतो की " ४५ अंशावर आकाश जळेल . बड्या नव्या शहरांवर अग्निप्रलय चालून येईल . " अमेरिकेतील newyork शहर हे ४० ते ४५ अंशावर आहे . याच ठिकाणी शिकागो , माद्रिद , रोम ,बुखारेस्त ही प्रसिध्द शहरे आहेत . सेञ्चुरिज च्या सातव्या शतकातील दुसर्या श्लोकात या लेसर किरणांच्या युद्धातील वापराचा उल्लेख केला आहे . तो म्हणतो , " युद्धात लेसर किरणांचा उपयोग करण्यात येईल . या किरणांना कुणीच प्रतिबंध करू शकणार नाही . सैनिक भयचकित होतील . शत्रू पासून स्वतः ला आणि आपले हल्लेच लपवू शकणार नाही . त्यांना ठार मारले जाईल ." naustrademus ने या श्लोकात लेसर ऐवजी ' एरलेस ' हा शब्द वापरला आहे . अशा इंग्रजी शब्दांना अनाग्राम म्हणतात . anagram म्हणजे शब्दांतील अक्षरांचा क्रम बडून तयार केलेला नवा शब्द . naustrademus च्या लिखाणात असे अनेक शब्द ठिकठिकाणी वापरलेले आढळतात . तिसर्या महायुद्धाच्या संदर्भात naustrademus ने वर्तवलेले आणखी एक हादरवून टाकणारे भाकित त्याच्या सेञ्चुरिज्च्य तिसर्या शतकाच्या ५६ व्या श्लोकात आहे . या श्लोकांत naustrademus म्हणतो की , " वीस वेळा तीन प्रतिशत , अनिष्ट प्लेग , वज्रपात आणि युद्ध , मोन्तबेन , पेरिस , लियन , मोंटे पोलेरीया ला भीती ." या श्लोकाचा अर्थ बहुतेक भाष्यकारांनी सारखाच लावला आहे तो असा : वीस वेळा ३ प्रतिशत म्हणजे या युद्धात जगाची साथ टक्के लोकसंख्या नष्ट होईल . या युद्धाच्या शेवटी रोगराई , प्रचंड हानी यांचेच अवशेष पाहायला मिळतील . फ्रान्सच्या प्रचंड हानीचे यात संकेत आहेत . याच संदर्भात सातव्या शतकातील पाचवा शोक अधिक झगझगीत प्रकाश टाकणारा आहे . त्याचा अर्थ स्पस्थ असला तरी तो तितक्या स्पष्ट पणे सध्याच्या असहिष्णू आणि धर्मांध वातावरणात सांगणे योग्य होणार नाही . पहिल्या २ खिस्त विरोधकांनी जेवढी हानी केली त्या समोर हा तिसरा ख्रिस्त विरोधक जेवढी हानी करेल त्या समोर ती नगण्य वाटेल .त्याला अरब राष्ट्रांची साथ मिळणार आहे असे त्याने स्पष्टपणे म्हंटले आहे . त्याचे संपूर्ण जगावर्चे अमेरिका आणि पश्चिम यांचे वर्चस्व संपवणे हेच ध्येय असेल . आफ्रिकन देशही त्याला साथ देतील . कारण त्यांना गोर्यांच्या आपल्यावरील अत्याचाराचा सूड घ्यायचा असेल . naustredemus ने तिसर्या महायुद्धाला ' आर्म गेडन ' हा शब्द वापरला आहे . या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ सात आणि असत यातील निर्णायक आणि अखेरचे अति व्याप्त महायुद्ध असे करतो . बायबल मध्ये देखील या शब्दाचा उल्लेख आहे . naustrademus ने आपल्या सेन्तुरिज मधील दोनशे समर श्लोक या आर्म गेडन बद्दल भाकित व्यक्त करण्यासाठी लिहिले आहेत . तिसर्या महायुद्धापूर्वी रशियात क्रांती होईल , असे naustrademus ने म्हटले आहे . डोलारेस केननया सायकिक इंवेस्टीगेटर ने पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या naustrademus शी अतींद्रिय शाक्तिञ्च वापर करून संपर्क साधला . आणि त्याच्या कडून त्याच्या गूढ भाकितांचा अर्थ समजून घेतला . मेक्स फोन्तब्रुन आणि त्याचा मुलगा जीन चार्लस यांनीही naustredemus च्या भाकितावर अफाट परिश्रम , संशोधन आणि अभ्यास करून ग्रंथ लिहिले आहेत . मेक्स naustredemus च्या भाकीतांबाबत सांगतो कि " भविष्यकाळात उत्तर आफ्रिकेत बंद करून उठणार आहेत . पाश्चिमात्य खिश्चन संस्कृतीच्या विरुद्ध जे एक महा प्रचंड आणि अमानुष असे आंदोलन छेडले जाणार आहे त्याची ही नांदी आहे ." naustredemus चे तिसर्या महायुद्धाचे वर्णन अंगावर कट आणणारे आहे . चीन व अरब राष्ट्रे यांच्यामुळे ते सूरु होणार आहे . हे युद्ध काही टप्प्यानमध्ये लढले जाईल . यात अण्वशस्त्रांचा मर्यादित वापर झाला तरी प्रचंड हानी होणार आहे . गुरु आणि शनि जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा हे युद्ध सुरु होणार आहे असे naustredemus ने संकेत दिला आहे . प्रारंभीच्या मतभेदानंतर रशिया व अमेरिका एकत्र येतील . आणि चीन अरब देशांना आपल्या नेतृत्व खाली एकत्र आणण्यात यशस्वी होईल . या नव्या युती मुळे जगातील प्रचलित सत्तेचा समतोल ढळू लागेल . संयुक्त राष्ट्रसंघासारखी संघटना यापुढे निष्प्रभ ठरेल . मध्यपूर्वेत एक हुकुमशहा निर्माण होईल आणि तो पुन्हा इराण वर आक्रमण करेल . त्याच सुमारास हिंदी महासागरात प्रचंड उल्का कोसल्यने अनेक देशांची हानी होईल . मध्य पुर्वेतला हा नवा हुकुमशहा खिश्चन विरुद्ध मोहीम उघडेल . मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिका येथे युद्धाचा आगडोंब उसळेल . पाश्चात्यांच्या प्रवाभाखाली असलेली म्मोरोक्कोचॆ राजवट उलथली जाईल . इस्त्रायल वर ही हल्ला होईल . विजयी अरब फौजा दक्षिण आणि मध्य आफ्रिकेतील देशांना जबरदस्तिने आपल्या आघाडित सामील करून घेतील . याच सुमाराला मध्य आशियाला भूकंपाचा प्रचंड धक्का बसेल . त्यामुळे काही देशांची मोठी हानी होईल ; परंतु याच वेळी रशिया आणि अमेरिका लष्करी युती जाहीर करतील . त्यामुळे आक्रमक चीनी नेत्याच्या मनात धास्ती निर्माण होईल . या युद्धात चीनी व अरब फौजा रशिया आणि अमेरिकेवर क्षेपणास्त्रे फेकतील . तसेच जंतू अस्त्रांचा आणि रासायनिक अस्त्रांचाही वापर होईल . त्यामुळे कानडा , दक्षिण युरोप , रशिया , अमेरिका वगैरे भागात महाभयंकर रोगराई पसरेल . प्रुत्व्हिपसुन लांब २७० मैलावर फिरणाऱ्या स्थानका वरून हा हल्ला करण्यात येईल असेही naustredemus म्हणतो . अण्वस्त्रांच्या हल्यामुळे हल्लकल्लोळ माजला असताना पूर्वेच्या फौजा फ्रान्स च्या दिशेने आपली कूच करतील . या फ़ौजनकदे वेगळ्या प्रकारची शस्त्रे असतील . त्यांनी मोठी हानी होईल . चीनी व अरब फौजा तुर्कस्थान विरुद्ध मोहीम सुरु करतील . जंतू युद्धामुळे ग्रीसची हानी होईल . अथेन्स , अल्बेनिया , युगोस्लाविया , इटली यांनीही या पाशवी हल्ल्यातून वाचता येणार नाही . त्याच वेळी इटलीची फाळणी होईल . उत्तर इटली स्वतंत्र राष्ट्र घोषित होईल . आक्रमक चर्च व पोप यांना देशाबाहेर हल्कुन दिले जाईल . अशावेळी चर्च अमेरिकेकडून लष्करी सहाय्य मागेल . शत्रूच्या फौजा रोम उध्वस्त करतील .आकाशातून बोंब चा वर्षाव होईल .त्यावेळी फ्रान्स नौदल शत्रूची बरीच हानी करेल .या हल्ल्यात तोंड देण्यासाठी पाण्यावरून चालणार्या नव्या रणगाड्यांचा वापर शत्रू करेल .फ्रान्स व इटली शत्रूच्या फौजांना एकत्र येण्यासाठी तोंड देतील , तिसर्या महायुद्धाच्या काळी इंग्लंडचा दक्षिण भूभाग पाण्याखाली जाईल असे भाकीत केले आहे . अशावेळी तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला देशातील म्हणजे भारतातील नेता वादळ निर्माण करील . सत्ता , कीर्ती , उत्तम प्रशासन यामुळे या देशाची प्रगती होईल . हा थोर नेता स्वतः साठी आणि देशासाठी गुरवार हा सुट्टीचा वार जाहीर करील . naustrademus ने भारताचा उल्लेख करण्यासाठी अनेक शब्द वापरले आहेत . कधी तो सागरावरून ओळखला जाणारा धर्म म्हणतो . कधी तिन्ही बाजूंनी पाणी असलेला देश असाही उल्लेख करतो . ओरिएन्त , नेपच्यून , गोड चेरियन आणि eastern warrior एवढे हे उल्लेख आढळतात . भारतीय विश्व नेत्याच्या उदयाची ग्वाही naustrademus ने फिरवली आहे . हा नेता सर्व दुष्ट शक्तींचा नाश घडवून जगावर अधिराज्य गाजवेल . त्याच्या काळात जगात शांतता नांदेल , असेही naustrademus चे म्हणणे आहे .या भारतीय महापुरुषाचे वर्णन करायला या फ्रेंच द्रष्ट्याने ६० श्लोक खर्ची घातले आहेत . यावरून त्याला त्याचे किती महत्व वाटले असावे हे लक्षात येते . भारताचा तिसर्या महायुद्धातील सहभाग व naustrademus तसेच वेद पुराणांनी गौरवलेला तो ' अवतारी ' विश्वनेता याबद्दल माहिती पुढच्या सत्रात .... क्रमश:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.