सार जग आता एका तणावग्रस्त व स्फोटक अवस्थेतुन जात आहे . या तणावग्रस्त परिस्थितीची आणि त्यात घडणाऱ्या घटनांची naustradamus ने वर्तवलेली अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहे .हिटलरचा , नेपोलियन चा उदय व अस्त, इंदिरा गांधींची हत्या तसेच नुकत्याच घडलेल्या ११ september २००१ ला अमेरिकेवर झालेला आतंकवादी हल्ला ही भाकिते naustradamus ने ५०० वर्षे आधीच नोंदवली होती . त्यामुळे जगाचे लक्ष पुन्हा naustrademus व त्याने गूढ भाषेत वर्तवलेल्या भाकीतांकडे गेले आहे . नुकत्याच संपलेल्या सहस्त्रकात सर्वाधिक रक्तपात झाल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे .. भीषण जातीय संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगातील अनेक गरजू देश लाचार झाल्याचे जगाने पाहिले आहे . आणि म्हणूनच ही भाकिते ४ शतके पूर्व नोंदवणार्या naustradamus चा परिचय करून देणे महत्वाचे वाटते ...... आपल्या भविष्यकथनसिद्धीने जगाला हादरवून ठेवणाऱ्या या ज्योतिषाचे नाव होते . michel D naustrademus . या जन्म १४ डिसेंबर १५०३ रोजी दुपारी मीन लग्नावर फ्रान्सच्या सेंट रेमी या प्रांतात झाला . ग्रेगेरियन पंचांगाप्रमाणे २३ डिसेम्बर १५०३ . घरची परिस्थिती जेमतेम . आजोबा धान्याचे घाऊक व्यापारी . हा नऊ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाने धर्मांतर केल . तो ज्यू चा क्रिश्चन झाला . चार भावंडांमध्ये हा सर्वात थोरला होता . लहानपणी आजोबांनीच त्याला लेटीन , हिब्रू , ग्रीक या भाषा शिकवल्या तसेच गणित व पाश्चात्य ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक धडे दिले . पुढे १५२२ मध्ये हा वैद्यकीय शिक्षणासाठी मोन्तेपोलियर या शहरात गेला . पण ग्रंथालयात बसून हा तासंतास ज्योतिष , गूढ विद्या , किमया या संबंधीचे ग्रंथ वाचत असे . आपल्या अत: प्रेरणा तीव्र आहेत याची जाणीव त्याला होती . Naustrademus ने जीवनात दीर्घकाळ भटकंती केली . त्याच्या उपचारांना यश येत असल्यामुळे वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारस्थानान मुळे , आपल्या ज्योतिष शास्त्राच्या व्यासंगामुळे आलेली संकटे यामुळे त्याची ससेहोलपट चालू होती . वारंवार गाव बदलावी लागत होती. याच कालखंडात त्याची पहिली पत्नी प्लेग च्या साथीला बळी पडली . त्याच उद्विग्न मनः स्थितीत हा प्लेग ग्रस्थांची सेवा करीत होता . त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या २० वर्षात त्याला शांतता लाभली . त्यात त्याने दुसर लग्न केल . सेलोन येथे तो स्थायिक झाला . या त्याच्या दुसर्या बायकोने त्याला चांगली साथ दिली . याच वेळी त्यान आपल्या छताच मजल्यावरील भागच अभ्यासिकेत रुपांतर केल .. आणि इथेच अद्भुत भविष्याचा जन्म झाला . १५४६ ते १५६६ हा वीस वर्षांचा काळ Naustrademus च्या जीवनातला महत्वाचा अंतिम टप्पा . याच कालखंडात त्याने जगाला शतकानु शतके हादरवून टाकणारी भाकिते नोंदवली . आपल्या घराच्या तिसर्या मजल्यावरच्या जागेत रात्री तो समाधी लागल्या सारखा बसत असे . नेमक त्याच वेळी त्याला त्याच्या अतींद्रिय शक्ती मुळे भविष्य दिसत असे . भाकिते ऐकायला येत असत . naustrademus सेन्चुरीज मध्ये स्वतः असे सांगतो की " प्रोफेटिक स्पिरीटने मला शब्द न शब्द सांगितला आणि तो मी लिहून घेतला एवढच नव्हे तर आगामी २ हजार वर्षातील संभाव्य घटना मला दिसल्या. " आपल्या ऋषी मुनींनी अशाच अतींद्रिय शक्तींनी ज्ञान प्राप्त झाले होते . आजही अशा घटना घडतात . naustrademus ने अनेक पंचांग प्रसिद्ध केले एवढच नव्हे तर हवामान , पीकपाणी यांवर चर्चा केलेली असे . त्याच भविष्य अतिशय सटीक असे . त्यामुळे त्याला कीर्ती आणि पैसा दोन्ही मिळाल्या . त्यानंतर त्याला अतींद्रिय शक्तींनी आणि प्रोफेटिक स्पिरीट ने पुढील २ हजार वर्षाचं जे दर्शन घडवल . ते इतक भयावह होत की ते प्रकट कस कराव याचा त्याला पेच पडला . हायड्रोमेन्सि नावच एक शास्त्र ज्यू , ग्रीक संशोधकांना , गूढविद्येच्या अभ्यासकांना अवगत होत . यात पाण्यात पाहून भविष्य वर्तवण्यात येत . naustrademus ला त्याविषयी आलेला पहिला अनुभव असा आला ..... रात्र वाढत होती . naustrademus तिसर्या मजल्यावरच्या खोलीत बसला होता . त्याच्या समोरच्या परातीतल पाण्यात लाटा उठत होत्या . पाण्यातील आंदोलन त्याला त्याच्या शरीरात जाणवत होती . त्याचे हात थरथरायला लागले . खोली धुक्याने भरून गेली . पाण्यातून वाफा यायला लागल्या . खोलीत चित्र विचित्र आकृत्या संचार करताहेत अस जाणवायला लागल .. आणि naustrademus ला काही ऐकू येऊ लागल . हा प्रकार रोज रात्री सुरु झाला . त्याच्यापुढे भविष्य उलगडत गेल . तो डोळ्यांनी पाहत होता व कानांनी ऐकत होता . जे ऐकायला येईल, दिसेल ते लिहित होता . आणि पूर्ण जागृत अवस्थेत आपण जे काही पाहिलं , ऐकल , लिहील ते पाहून थरारून जात होता . Naustrademus दररोज रात्री अभ्यासिकेत बसल्यावर Naustrademus ला विदेही अवस्था प्राप्त होत असे . त्या अवस्थेत तो कानांनी जे ऐकत होता , लिहित होता डोळ्यांनी पहात होता आणि हातांनी लिहित होता ते म्हणजेच भाकितांच्या ' सेन्चुरीज '. ज्याला आपण Naustrademus ची भाकीत म्हणून ओळखतो . त्या विदेही परिस्थितीत त्याला अत्यंत भयानक असलेला भविष्यकाळ दिसत होता . त्यात प्लेग चा प्रादुर्भाव , महा दुष्काळ , विनाशक नरसंहार करणारी युद्धे , राज्यक्रांती , वाढलेली गुन्हेगारी , धर्म भ्रष्टता , ३ जागतिक महा युद्धे दिसत असे . त्याची एक एक भाकिते म्हणजे एक प्रकारची कोडीच त्यातल्या काही मोजक्याच इथे उदाहरणासह सांगतो . तो सेन्चुरीज मध्ये एका ठिकाणी लिहितो " बुद्धिमान माणसेच संहारक शस्त्रे शोधून काढतील . मृत्यूचे पक्षी आकाशात किंचाळत राहतील . भूमीसाठी पाण्यात लढाया होतील . चाकांवरून किल्लेच किल्ले पुढे सरकतील . हवेत विष पसरून जीव गुदमरून जाईल . ढगातून अग्नीकडून शहरे बेचिराख होतील . लोक जमिनी खाली आसरा घेतील " बुद्धिमान माणसेच संहारक शस्त्रे शोधून काढतील . आपल्याला माहितच आहे कि einstain ने अनु उर्जेचा शोध लावला त्याचाच रुपांतर nuclear bomb सारख्या संहारक शस्त्रात झाल . म्रुतुचे पक्षी आकाशात किंचाळत राहतील . इथे तो जेट विमाने , super sonic विमाने तसेच पहिल्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या विमानांना चा तो पक्षी म्हणून उल्लेख करतो . याच विमानांच्या सहाय्याने २ महा युद्धात , शीत युद्धात स्फोटक शस्त्रांचा वर्षाव करून प्रचंड हानी करण्यात आली . आज समुद्र टाळला जमिनी खाली शहरे स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत . इराक ने bomb हल्यान पासून संरक्षण करण्यासाठी जमिनीखाली काही वसाहती बांधल्याचे उघड झालेच आहे. त्याची भाकिते हि अनेकदा घटना घडून गेल्या नंतर कळून येत . तरी काही घटना अगोदर कळून येण्या सारख्या होत्या. पहिले व दुसरे महायुध्द, फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी त्याच्या पुस्तकांना उत आला होता . बायबल नंतर आता पर्यंत जास्त आवृत्या निघालेलं सेन्चुरीज हे एकमेव पुस्तक . Naustrademus ने काही सेन्चुरीज मध्ये " व्हल्गर अडव्हेर " असा शब्द वापरला . लोकांना त्याचा अर्थ दोनशे वर्षानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाल्यावर समजला . त्यान वापरलेल्या ग्रेट ब्रिटन या शब्दच रहस्य शंभर वर्षानंतर समजल . अशी अनेक उदाहरण आहेत , तो एके ठिकाणी म्हणतो कि मानव जो पर्यंत खूप दुख्ख भोगणार नाही तो पर्यंत शांततेन जगायला शिकणार नाही . आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला त्याचा मृत्युदिन ही माहित होता . त्याने १७ जून १५६६ ला आपल मृत्यू पत्रक तयार केल , त्यात वाटणी तसेच आपला मृत्यू कधी येईल हे देखील नमूद केल . २ जुलै ला त्याने देह ठेवला . त्याच्या इच्छेनुसार त्याला चर्च च्या भिंतीत उभा गाडण्यात आल . त्याचा मुलगा सीझर याने त्या थडग्यावर त्याचा अर्ध पुतळा बसवला . त्याच्या आईने पुत्ल्याखालील संगमरवरी दगडावर पुढील मजकूर खोदून घेतला . " इथ मायकल Naustrademus ची हाडे विसावा घेत आहेत . मर्त्य लोकांमध्ये हा एकटाच प्रदीर्घ भविष्याचा अचूक वेध घेऊ शकत होता . ग्राहनक्षत्रांच्या आधारे तो अचूक भविष्य सांगू शकला . तो ६२ वर्षे , ६ महिने १७ दिवस जगला . सलोन इथे २ जुलै १५६६ रोजी मृत्यू पावला . तरी भावी पिढ्यांनी त्याची शांती ढवळू नये ." पण २२५ वर्षांनी एक रहस्यमय, अत्यंत गूढ भाकीत समोर आल . त्याची कथा रोमांच उभे करते यात शंका नाही . Naustrademus ने आपल्या डायरी मध्ये एक गोष्ट लिहून ठेवली होती . त्या पानावर लिहील होत " माझ्या मृत्यू नंतर बरोबर दोनशे पंचवीस वर्षांनी नास्तिक , उग्रवादी ख्रिश्चन लोक माझे थडगे पुन्हा उकरून काढतील आणि त्यानंतर त्यांचा लगेच मृत्यू ओढवेल ." naustrademus ला मृत्यू नंतर संतत्व प्राप्त झाले होते . त्यामुळे सर्व ठरतील राजकीय अधिकारी व राजघराण्याच्या व्यक्ती , सर्व ठरतील नागरिक त्याच्या कबरीवर फुल वाहायला येत असत , १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली . या क्रांतीचे भविष्य naustrademus ने नोंदवले होते . १७९१ मध्ये naustrademus च्या विरोधकांनी काही उग्रवादी सैनिकांना धरून त्याचे थडगे उकरायला लावले . त्यावेळी naustrademus च्या मृतदेहाच्या हातात एक पत्र सापडले . त्यात अस स्पष्ट लिहील होत की , मी १७९१ मध्ये हे थडगे उकरले जाईल . ते भविष्य वाचून ते सैनिक हादरले .त्यांना भयग्रस्त अवस्थेत उन्माद वायूचा झटका आला . त्यांनी भरपूर मद्यपान करून हसत खिन्दळत तिथ धिंगाणा घालायला सुरवात केली . अखेर हे सार अनावर झाल्याने त्यातच त्यांचा अंत झाला . दुसर्या दिवशी दर्शनाला आलेल्या काही लोकांना त्या सैनिकांचे म्रित्देह , उकरेले थडगे आणि naustrademus चा मृतदेह दिसला . लोकांनी पुन्हा saint laurence चर्च च्या कबर्स्थनत naustrademus थडग्याची पुन्हा उभारणी केली . आजही तिथे ते अस्तित्वात आहे . याचा जीवनप्रवास जितका रहस्यमय होता तेवढीच त्याची भाकितेही रहस्यमय व आश्चर्यकारक होती . यातली जवळ जवळ सगळी भाकिते पुढे सत्यात उतरली . यात त्याने २००० त २०२५ सालची आशचर्य कारक , बुद्धिवादाच्या पलीकडची , सत्यात उतरलेली आणि भविष्यकाळातल्या अद्भुत घटनांच्या वर्तवलेल्या भाकितांचा उद्या एक आढावा घेऊ . क्रमश:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

शिकारी साखळी

रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.

भूत कथा

भुताच्या गोष्टी, भूत कथा, भय कथा

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!