प्लॅन्चेट

प्लॅन्चेटचा शोध

Author:भगवान दादा

अमेरिकेत न्यू यॉर्क शहराजवळ हाईडव्हील या नावाचे एक खेडेगाव आहे . त्या खेड्यात फॉक्स आडनावाचे एक कुटुंब राहत असे . ३१ मार्च १८४८ ये दिवशी रात्रीच्या वेळी या कुटुंबाच्या घराच्या दारावर कुणीतरी हळूहळू ठोके मारीत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला . ठोके मारणारी व्यक्ती मात्र कुणालाच दिसत नव्हती .

त्यामुळे हा भुताटकीचा प्रकार असावा असे फॉक्स कुटुंबियांना वाटले व त्यांच्या मनात थोडी घाबरत निर्माण झाली ; परंतु त्या कुटुंबात केटी फॉक्स या नावाची एक धीट मुलगी होती . तिने या प्रकारचा छडा लावण्याचा जणू निश्चयच केला . त्यासाठी तिने एक युक्ती करण्याचे ठरवले . ती दरवाजाकडे पाहत मोठ्याने म्हणाली "बाबारे तू कुणीही असलास तरी चालेल ; परंतु मी टिचक्या वाजवीन तेवढेच ठोके तू दे"

असे म्हणून तीने बोटाने काही टिचक्या वाजविल्या आणि आश्चर्य असे , की दारावर देखील तेवढेच ठोके वाजले !

यावरून , हि ठोके मारणारी व्यक्ती अदृश्य असली तरी तिलाही थोडीफार बुद्धी असावी असा निष्कर्ष तिने काढला .

हा सारा प्रकार त्यांच्याच शेजारी राहणारे एक कल्पक गृहस्थ मोठ्या कुतूहलाने पाहत होते . त्यांच्या डोक्यात लगेच वक कल्पना स्पुरली . ते त्या अज्ञात पिशाच्चाला उद्देशून म्हणाले , " तू कोण आहेस हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे . तेव्हा मी आता A ते Z पर्यंतची सर्व मुळाक्षरे हळूहळू उच्चारतो . त्यात तुझ्या नावाचे अक्षर आले की तू लगेच ठोका दे . "

अशा प्रकारे काही विशिष्ठ अक्षरे उच्चारल्या नंतर त्या पिशाच्चाने ठोके दिले . नंतर ती सगळी अक्षरे जुळवून वाचल्यावर एका मनुष्याचे नाव तयार झाले . ते नाव काही वर्षापूर्वी खून झालेल्या एका फेरीवाल्याचे नाव होते ! पुढे त्या केटी फॉक्स ची मध्यम शक्ती बरीच वाढली व तिला परलोकांतील अनेक दिवन्गतांचे संदेश तिला मिळू लागले ; परंतु अशा प्रकारे अक्षरे उच्चारून व ठोके ऐकून एक एक शब्द तयार करणे फारच जिकीरीचे होऊ लागले . त्यामुळे काही कल्पक लोकांनी एक गुळगुळीत कागदावर सर्व मुळाक्षरे लिहून मध्यभागी एक छोटासा ग्लास ठेवला व मृतात्म्यांना आवाहन केले .

आश्चर्य असे की तो ग्लास हळुहळु एकेका अक्षरावरून फिरू लागला व त्या अक्षरांचे मिळून एक वाक्य तयार झाले ! अशाप्रकारे प्लांचेट या साधनेचा शोध लागला व गूढविद्येची आवड असणारे लोक या साधनेच्या द्वारे परलोकातील मृत व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्याकडून परलोक जीवनाची माहिती मिळवू लागले .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to प्लॅन्चेट


सुभाष पवार यांचे लेख

लेखक:सुभाष पवार 9767045327

आत्माराम

समर्थ रामदास कृत. "आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥" असे श्रीसद्गुरुनाथ श्रीसमर्थांच्या श्रीमुखातीलच शब्द आहेत. ते ह्या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्त्व दर्शविण्यास पुरेसे आहेत.

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

गांधी जयंती निबंध आणि भाषण

गांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. निबंध आणि भाषण

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.

सेक्युलरिझमचे प्रयोग

महात्मा गांधींचे तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचे प्रयत्न असतील, याच ऐक्यासाठी हिंदुस्थानाच्या जनतेवर लादलेली खिलाफत चळवळ असेल, जवाहरलाल नेहरूंची गंगा-जमूनी तहजीब असेल, भारतावर लादलेली फाळणी असेल, डाव्यांनी भारतीय इतिहासाचे केलेले विकृतीकरण असेल, की १९७६ मध्ये भारताच्या राज्यघटनेत टाकलेला 'सेक्युलर' हा शब्द असेल. असे किती प्रयोग मोजून दाखवावे? या विषयावर संशोधन करू तितके कमीच! त्यामुळे त्यात फारसे अडकून न पडता भविष्याचा विचार करून वर्तमानात काय करता येण्यासारखे आहे?

महात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड

शूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.