गोव्यातील एका भल्यामोठ्या बंगल्याजवळ एक गाडी येऊन थांबली. बंगल्याच्या केअरटेकरने लगबगीने पुढे होऊन बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार उघडले. ती गाडी आत बंगल्याच्या दरवाज्या समोर थांबली. गाडीतून अमेय, त्याची पत्नी शारदा व १२ वर्षांची मुलगी किमया उतरले. "तर, हा आहे आपला  नवीन बंगला." अमेय हात फैलावत म्हणाला. शारदा बंगल्याच निरीक्षण करत होती. "छान आहे. तीन मजल्यांचा प्रशस्त आहे. पण थोडा जुना वाटतोय." शारदाने आपला रिमार्क दिला. "जुना तर आहेच. हा बंगला १८८४ मध्ये इंग्रजांनी बांधला होता." अमेय आपल ज्ञान पाजळत म्हणाला. "पण तरी मला आश्चर्यच वाटतय. एवढा मोठा बंगला आपल्याला इतक्या कमी किंमतीत कसा मिळाला." शारदाने आपला संशय व्यक्त केला. "अग आता तूच तर म्हणालीस ना कि हा बंगला जुना वाटतोय म्हणून. आणी काही लोकांनी या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत." अमेय म्हणाला.

शारदा: कसले गैरसमज ?

अमेय: हेच की या घरात भूत-प्रेत वगैरे आहेत म्हणून.

"बाबा, हे भूत खरच असतात का हो ?" छोटी किमया आपले छोटे डोळे मोठे करत म्हणाली.

अमेय: नाही बेटा, हे काही खर नसत. हे रिकामटेकड्या लोकांच्या रिकामटेकड्या गोष्टी आहेत. बर मग आपला इथेच मुक्काम करायचा विचार आहे का आतही जायच आहे.

एवढा वेळ विचारात गढलेली शारदा त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर आली. 

ते आता ग्रूहप्रवेशा साठी सज्ज होते.                                                                                             क्रमश:


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to मिस्ट्री हाऊस


कणाच्या आण्यावर
Featured

एलिएन्स

न न रुण
Featured

अरुण - काळ प्रवासी

पैलतीराच्या गोष्टी
Featured

या पुस्तकात मी विविध पाच कथांचा समावेश केला आहे, पाचही कथा वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत, तुम्हाला त्या हमखास आवडतील याची हमी मी देतो. एकदा हे पुस्तक वाचून झाल्यावर आपले मत नक्की कळवा. मी आपला सदैव आभारी आहे. आपण माझ्या पुस्तकांना जो प्रतिसाद देत आहात तो यापुढेही असाच रहावा, हीच ईच्छा, धन्यवाद!

कणी
Featured

कणी

वन
Featured

त्याला वरदान मिळते जे त्याला नकोसे होते.

गोष्टी
Featured

एक इनोदी कथा

वैद्य आणि राजा

चित्रपुरी नामक राज्याचा राजा चतुरवर्मा आपल्या नावाला साजेल असाच चतुर व हुशार होता. तो एक प्रजावत्सल राजा होता. प्रणेचे कष्ट सुख ओळखून घेण्यासाठी तो येष पालटून राज्यभर हिंडे व फिरे. एकदा राजा आजारी पडला आणि स्वतः हिंडून प्रजेचे कष्ट सुख ओळखून घेणे त्याला शक्य झाले नाही. म्हणून आपल्या मंत्र्याला व सेनापतीका जवळ बोलावून तो म्हणाला-" तुम्ही दोघे वेष पालटून राज्यात कोठे काय होत आहे हे पाहून या." राजाज्ञेप्रमाणे दोघे निघाले. हिंडत हिंडत ते सिंगवरम् या गावी आले. गावा- बाहेर एका डोंगरी ओव्याचे पाणी पिऊना व पोव्यांना पाजून त्यांना झाडाला बांधून ठेवले, आणि पाबीच गावात निघाले. ....

श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.

रत्नावली

Ratnavali is a Sanskrit drama about a beautiful princess named Ratnavali, and a great king named Udayana. It is attributed to the Indian emperor Harsha. It is a Natika in four acts. One of the first textual references to the celebration of Holi, the festival of Colours have been found in this text.

मनुस्मृति

मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांगून त्यांची निष्कृती कोणत्या उपायांनी करावी हे सुचविले आहे.

शिक्षकदिन विशेष

माझे आवडते शिक्षक